पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३७३ परब्रह्मचि वदनफळें । मोडोनि आलें ॥ ६९ ॥ तैसीं व जेउतीं तेउतीं । तुझीं देखत विश्वमूर्ती । आणि तयाचिपरी नेत्रपंक्ति । अनेका सैंघ ॥ २७० ॥ हें असो स्वर्ग पाताळ । कीं भूमी दिशा अंतराळ । हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसें ॥ ७१ ॥ तुजवीण एकादियाकडे | परमाणुहि एतुला कोडें । अवकाशु पाहतसें परि न सांपडे । ऐसें व्यापिलें तुवां ॥ ७२ ॥ इये नानापरी अपरिमितं । जेतुली सांठविली होतीं महाभूतें । तेतुलाही पैवाडु तुवां अनंतें । कोंदला देखतसें ॥ ७३ ॥ ऐसा कवणे ठायाहूनि तूं आलासी । एथ बैसलासि कीं उभा आहासी । आणि कवणिये मायेचिये पोटीं होतासी । तुझें ठाण केवढें ॥ ७४ ॥ तुझें रूप वय कैसें । तुजपैलीकडे काय असे । तूं काइसेयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां ॥ ७५ ॥ तंव देखिलें जी आघवेंचि । तरि आतां तुझा ठावो तूंचि । तूं कवणाचा नव्हेसि ऐसाचि । अनादि आयता ॥ ७६ ॥ तूं उभा ना बैठा । दिघड़े ना खुजटा । तुज तळी वरी वैकुंठा । तूंचि आहासी ॥ ७७ ॥ तूं रूपें आपणयांचि ऐसा । देवा तुझी तूंचि वयसा । पाठी पोट परेशा । तुझें तूं गा ॥ ७८ ॥ किंबहुना आतां । तुझें तूंचि आघवें अनंता । हें पुढत पुढती पाहतां । देखिलें मियां कोट्यवधि आवृत्ति होतात, जणूं काय या परब्रह्मरूप वृक्षाला हीं हजारों मस्तकरूपी फळें भारावून वाकवीत आहेत ! ६९ हे विश्वरूपा देवा, अशा प्रकारचीं तुमचीं जेवढीं तोंडें, तेवढीं सर्व मला दिसतात, आणि त्यांच्या डोळ्यांच्या रांगांचे अनेक समुदायही मी पाहात आहें. २७० इतकेंच नाहीं तर स्वर्ग, पाताळ, जमीन, दिशा, आकाश, इत्यादि सर्व भेदांची बोली येथें खुंटून, सर्व येथें मूर्तिमयत्र दिसत आहे. ७१ तुमच्यावांचून एकादा परमाणूएवढा तरी अवकाश कोठें तरी सांपडेल म्हणून पाहात आहे, पण हें पाहाणें व्यर्थ आहे, कारण, सर्वाला तुम्हीं ओतप्रोत व्यापिलें आहे. ७२ ज्यांच्या विस्ताराला गणतीच नाहीं अशीं महाभूतें अनंत प्रकारांत जेवढीं म्हणून सांठविलेली आहेत, तेवढा त्यांचा सारा विस्तार, हे अनंत देवा, तुम्हीं आपल्या ठिकाणीं चोंदलेला दिसतो. ७३ असे तुम्हीं कोटून आलां, तुम्हीं काय येथें वसले आहां कीं उभे आहां, तुम्हीं कोणत्या आईच्या पोटीं होता, आणि तुमचें स्थान किती मोठें होतें, ७४ तुमचें रूप आणि वय कसें आहे, तुमच्या पलीकडे काय आहे, आणि तुमचा मूळाधार काय आहे, हे सर्व मी जों पाहूं लागलों, ७५ तों सर्वत्र मला एकदम दिसलें, आणि कळून आलें कीं, तुम्हीं स्वतःच स्वतःचे मूळाधार आहां; तुमची दुसऱ्या कोणापासूनही उत्पत्ति झालेली नाहीं. असे तुम्ही अनादि, स्वयंसिद्ध आहां. ७६ तुम्ही उभे नाहीं, कीं बसलेलेही नाहीं. तुम्ही उंच नाहीं, कीं खुजटही नाहीं. खालीं, तळवटीं, किंवा वर, हे प्रभो, सर्व तुम्हीच आहां. ७७ देवा, तुमचें रूप, तारुण्य, पाठ, पोट, हीं सर्व तुम्हीच आहां. ७८ फार काय सांगावें ? हे अनंत देवा, तुमचं सर्व तुम्हीच आहां, असें पुन्हां पुन्हां पाहतां माझ्या दृष्टोत्पत्तीस आलें. ७९ १ भाषा, बोली. २ विस्तार. ३ उंच, धिपाइ