पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी भूतग्राम एकेक | भूतसृष्टीचे ॥ ६० ॥ जी सत्यलोकु तुजमाजीं आहे । देखिला चतुराननु हा नोहे । आणि येरीकडे जंब पाहें । तंत्र कैलाही दिसे ||६१ || श्रीमहादेव भवानियेशीं । तुझ्या दिसतसे एके अंशीं । आणि तूतेंही गा हृषीकेशी । तुजमाजीं देखें ।। ६२ ।। पैं कश्यपादि ऋषिकुळें । इयें तुझिया स्वरूपीं सकळें । देखत पाताळें । पन्नशीं ॥ ६३ ॥ किंबहुना त्रैलोक्यपति | तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती । इयें चतुर्दशभुवनें चित्राकृती | अंकुरलीं जाणों ॥ ६४ ॥ आणि तेथिंचे जे जे लोक । ते चित्ररचना जी अनेक । ऐसें देखतसें अलोकिक । गांभीर्य तुझें ॥ ६५ ॥ अनेकवाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् । नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् ॥ १६ ॥ सम० – अनेक बाहू मुख नेत्र पोटें वद्रूप सर्वत्र अनंत मोटें । न आदि मध्यांतहि तूज पाहें विश्वेश्वरा विश्वशरीर तूं हैं ॥ १६ ॥ आर्या - बहु कर उदर नयन मुख अनंत रूपा चहूंकडे दिससी। आद्यंत मध्य न तुला विश्वेशा विश्वरूप तूं अससी ॥ १६ ॥ ओवी - अनंत बाहू उदरें नेत्रें मुखें । अनंतपरींचीं देखें । आदि अंत नोळखे विश्वेश्वरा ! ऐसें विश्वरूप ॥ १६ ॥ त्या दिव्यचक्षूंचेनि पैसें । चहुंकडे जंब पाहत असें । तंव दोदंडिकां जैसें । आकाश कोंभैलें ॥। ६६ || तैसे एकैकचि निरंतर | देवा देखतसें तुझे कर । करीत आघवेचि व्यापार | एकेचि काळीं ॥ ६७ ॥ मग महाशून्याचेनि पैसारें । उघडली ब्रह्मकटाहाचीं भांडारें । तैसीं देखतसें अपारें । उदरें तुझीं ॥ ६८ ॥ जी सहस्रशीर्पयाचे देखिलें । कोडीवरी होताति एकिवेळे । कीं आहे. २६० महाराज, तुमच्या सर्व शरीरांत सत्यलोक आहे, मग त्यांत दिसणारा तो ब्रह्मदेव नाहीं असें कसें होईल ? या दुसऱ्या बाजूला पहावें, तों कैलासही नजरेस येतो. ६१ देवा, तुमच्या शरीराच्या एका लहानशा कोपऱ्यांत गौरीसहित श्रीशंकर दिसत आहेत, इतकेंच नव्हे, तर, हे नारायणा, तुम्हीही या आपल्या विश्वरूपांत आढळून येतां ! ६२ येथे कश्यपादि सर्व ऋषींची कुळें आणि नागसमुदायासह पाताळ हींही आढळतात. ६३ थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे, हे त्रिभुवननाथा, या तुमच्या रूपाच्या एकेका अवयवाच्या भिंतीवर चवदा भुवनांचीं चित्र उमटलेली दिसतात. ६४ तसेंच या भुवनांतील प्रत्येक प्रकारचे लोकही येथें चितारलेले आढळतात. तुमच्या अगाध मोठेपणाचे अलौकिकत्व अशा प्रकारें माझ्या अनुभवास येत आहे. ६५ या दिव्य दृष्टीच्या साह्यानें जो मी चहूंकडे बघतों, तो आकाशाच्या कोंबाप्रमाणें बाहुदंडापासून निघालेले तुमचे एकेक अग्रहस्त सर्व तऱ्हेचे व्यवहार एकदमच करीत आहेत, असें मला दिसून येते. ६६, ६७, मग अव्यक्त ब्रह्माच्या विस्ताराने जशीं ब्रह्मांडांची कोठारें उघडावींत, तशींच तुमचीं अगाध खोलीचीं उदरें मला भासतात. ६८ अहो, या शरीरांत सहस्रशीर्षत्वाच्या एकाच वेळीं