पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् । पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १० ॥ सम० - असमर्थ तयांचं तें समर्थ बळ आमुचें । जे सैन्य रक्षिलें भीष्म त्यांचें तो भीम रक्षिता ॥ १० ॥ आर्या-दिसती अपूर्ण अमुची भीष्मं रक्षोनि भीम सेना ही । पूर्ण दिसे पार्थाची अनुसरतां जाण भीमसेनाही ॥१०॥ ओंवी- आमुची सेना असे गाढी । भीष्म रक्षिताहे प्रौढी । त्यांची सेना बलहीन थोडी । भीम राखी बलानें १० वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु | जो जगजेठी जगीं सुभटु । तया देळवे- पणाचा पाट | भीष्मासि पैं ॥ १५ ॥ आतां याचेनि वळे गवसलें । हें दुर्ग जैसें पैन्नासिलें । येणें पौडें कुलें । लोकत्रय ॥ १६ ॥ आधींचि समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं । मग वडवानळु तैसेयाही | विरजा जैसा ॥ १७ ॥ ना तरी प्रलयवन्हि महावातु । या दोघां जैसा सांघांतु । तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥ १८ ॥ आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडवसैन्य कीरें थोकडें । परि ओईचिलें अपोडें । दिसत असे ॥ १९ ॥ वरी भीमसेन वेथं । तो जाहला असे सेनानाथु । ऐसें बोलोनियां मातु । सांडिली तेणें ।। १२० ।। अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः । भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त सर्व एव हि ॥ ११ ॥ सम॰—तथापि सैन्यरक्षेचीं स्थानें जीं ज्यांस दीधलीं । भीष्मातेंचि तुम्ही रक्षा सर्व त्या त्या स्थळाहुनी ॥११॥ आर्या - अपुल्या अपुल्या स्थानीं तिष्ठति युद्ध धरोनि दृढ लक्षा । अवघे मिळोनि एका भीष्मालागीं जपोनि संरक्षा ओवी-ठायीं ठायीं रणभूमीसीं । जतन करावें भीष्मासी । तो तुम्हां समस्तांसी । रक्षील जाणा प्रतापें ॥११॥ मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांतें म्हणितलें । आतां दळ- भार आपुलाले । सैरसे कैरा ॥ २१ ॥ जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आणी । वरगण कवणकवणी | महारथियां ॥ २२ ॥ तेणें तिया आव- रिजे । भीष्मातळीं राहिजे । द्रोणातें म्हणे परिसिजे । तुम्हीं सकळीं ॥ २३ ॥ शांत, सर्व क्षत्रियश्रेष्ठ व जगांतील महावीर जगजेठी जे पितामह भीष्म, त्यांना सेनाधिपतीचा मान देण्यांत आला आहे. १५ आणि आतां या भीष्मांच्या बळाने आच्छादलेलें हें सैन्य एकाद्या किल्ल्यासारखे रचलेले दिसत आहे, आणि याच्यापुढें हें त्रिभुवन सुद्धां थोडेंच भासतं. १६ समुद्र हा मूळचाच सर्वाना अलंघ्य वाटतो, त्यांत त्यास जसा वडवानळ सहाय व्हावा, १७ किंवा प्रळयाग्नि व प्रचण्ड वावटळ या दोघांचा जसा मेन्ट व्हावा, तसाच प्रकार गंगापुत्र भीष्मांनीं सेनाधिपति होण्यांत घडून आला आहे. १८ मग या आमच्या सैन्याशीं कोण भिडूं शकेल ? उलट पक्षीं, हें पांडवसैन्य तर अगदीच थोडें आहे ! पण तें इवलेंसें सैन्यही मला अपरंपार दिसतें, १९ तशांत, जो दांडगा भीमसेन, तो या सैन्याचा नायक झाला आहे. " असें बोलून दुर्योधनानें भाषण संपविलें. १२० नंतर तो पुन्हां सर्व सैनिकांना म्हणाला, कीं, " आतां तुम्ही आपापले दळभार व्यवस्थित करा. २१ ज्यांच्याकडे सैन्याच्या जितक्या अक्षौहिणी दिल्या असतील, त्यांनी त्यांच्या रक्षणा- करितां ज्या कोणा महारध्याची जशी वांटणी केली असेल, २२ त्याप्रमाणें त्यानें सैन्याचा आवर आणि भीष्मांच्या आज्ञेत वागावें. " यानंतर दुर्योधन द्रोणाचार्याकडे वळून म्हणाला, " ऐका, करावा, १ सेनापतीच्या जागेचा. २ मान. ३ बांधलें, रचलें. ४ याच्या मानानें. ५ लहान, तुच्छ ६ मेळ, ७ अगदी. ८ अत्यन्त• अल्प. ९ अपार, १० दांडगा, १२ सज्ज करा. १३ युद्धभूमीवर.