पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३७१ तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली ॥ ५२ ॥ तैसाचि तया सुखानुभवापाठीं । केला द्वैताचा सांभाळु दिठी | मग उसासौनि किरीटी । वास पाहिली ॥ ५३ ॥ तेथ बैसला होता जिया सवा । तियाचिकडे मस्तक खालविला देवा । मग जोडूनि करसंपुट वरवा । बोलतु असे ॥ ५४ ॥ अर्जुन उवाच - पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वास्तथा भूतविशेषसङ्घान् । ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् ॥ १५ ॥ सम - देहीं तुझ्या मी सुर देखता हें समस्त भूतें सचराचरें हैं । पद्मासनीं जो विधि आणि शर्व भुजंग जे दिव्य मुनींद्र सर्व ॥ १५ ॥ आर्या- तुझिया देहीं पाहें सुरभूतविशेष सर्व संघ जग । कमलासनस्थ विधि हर देव ऋषी दिव्य सर्व ते भुजग ॥१५॥ ओंवी – तुझे देहीं सर्व देखिले । ब्रह्मदेव नाभीं बैसले । ऋषिआदि नागकुळातें पाहिलें । तुझ्या देहीं ॥ १५ ॥ I म्हणे जयजयाजी स्वामी । नवल कृपा केली तुम्हीं । जे हैं विश्वरूप कीं आम्हीं । प्राकृत देखों ॥ ५५ ॥ परि साचचि भलें केलें गोसाविया । मज परितोषु जाहला साविया । जी देखिलासि जो इया । सृष्टीसि तूं आश्रयो ॥ ५६ ॥ देवा मंदराचेनि अंगलगें । ठायीं ठायीं श्वापदांचीं दांगें । तैसीं इयें तुझ्या देहीं अनेगें । देखतसें भुवनें ॥ ५७ ॥ अहो आकाशाचिये खोळे | दिसती ग्रहगणांची कुळें । कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीचीं ॥ ५८ ॥ तयापरी श्रीहरी । तुझिया विश्वात्मकीं इये शरीरीं । स्वर्ग देखतसें अवधारीं । सुरगणेंशीं ॥ ५९ ॥ प्रभु महाभूतांचे पंचक । येथ देखत आहे अनेक । आणि त्यामुळें अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचें साम्राज्यच लाभलें. ५२ पण अशा आत्मानंदाच्या अनुभवानंतरही त्याच्या दृष्टीनें देव व भक्त या द्वैताचा प्रतिपाळ केला, आणि म्हणून अर्जुनानें एक उसासा टाकून इकडे तिकडे पाहिलें; ५३ आणि ज्या बाजूला श्रीकृष्ण बसले होते, त्या बाजूला त्यानें प्रभूंना नमन केलें, आणि मग हात जोडून बोलता झाला. ५४ अर्जुन म्हणतो, " हे प्रभो, मी तुमचा जयजयकार करतों. तुम्हीं आमच्यावर खरोखरच विलक्षण कृपा केली आहे, कारण, त्या कृपेनें आज आमच्यासारख्या सामान्य जीवांना हें अद्भुत विश्वरूपदर्शन घडत आहे. ५५ पण महाराज, तुम्हीं फारच चांगली गोष्ट केली आहे, आणि मलाही अत्यंत संतोष झाला आहे, कां कीं तुम्हींच या सर्व सृष्टीला आधार आहां, ही गोष्ट आज प्रत्यक्ष आमच्या दृष्टीस पडली आहे. ५६ देवा, जसे मंदारपर्वताच्या पठारावर ठिकठिकाणीं वनचर जनावरांचे कळप जमलेले असावे, तसे चवदाही भुवनांचे अनेक संघ तुमच्या शरीराला लटकलेले दिसत आहेत. ५७ अहो, आकाशाच्या विस्तारांत जसे ताऱ्यांचे समूह असतात, किंवा एकाया विशाळ वृक्षाला जशीं अनेक पक्ष्यांची घरटीं लोंबत असतात, तसे, हे नारायणा, तुमच्या या विश्वमय शरीरांत स्वर्ग व त्यांतील देवगण हे माझ्या दृष्टीस येत आहेत. ५८, ५९ अहो प्रभो या शरीरांत महाभूतांच्या अनेक पंचकड्या आणि भूतसृष्टीतील प्रत्येक भूतसमुदाय मला दिसत