पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७० सार्थ श्रीज्ञानेश्वरी भूतळीं पिपीलिका बांधे घर । नाना मेरूवरी सपुर । परमाणु वैसले ॥ ४३ ॥ विश्व आघवेंचि तयापरी । तया देव चक्रवर्तीचिया शरीरीं । अर्जुन तिये अवसरीं । देखता जाहला ॥ ४४ ॥ ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः । प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत ॥ १४ ॥ सम०---आश्वर्यै उठिले कांटे देहीं तो मग अर्जुन । वंदूनि मस्तकीं देवा बोलियेला कृतांजली ॥ १४॥ आर्या - मग तो विस्मय झाला उठले रोमांच व्यास नरदेवा । करुनी साष्टांग नमन बोले जोडोनि हस्त नर देवा ॥ १४॥ ओवी - त्यानंतर आश्चर्य वाटलें । अर्जुना रोमांच दाटले । मग दोन्ही कर जोडिले । केला नमस्कार ॥ १४ ॥ तेथ एक विश्व एक आपण । ऐसें अळुमाळ होतें जें दुजेपण । तेंही आटोनि गेलें अंतःकरण । विरालें सहसा ॥ ४५ ॥ आंतु आनंदा चेहरें जाहलें । बाहेरि गात्रांचें बळ हारपोनि गेलें । आपाद पां गुंतलें । पुलकांचलें ॥ ४६ ॥ वार्षिये प्रथमदशे । वोहळल्या शैलांचें सर्वांग जैसें । विरूढे कोमलांकुरीं तैसे | रोमांच आले ॥ ४७ ॥ शिवतला चंद्रकरी | सोमकांतु द्राव धरी । तैसिया स्वेदकणिका शरीरीं । दाटलिया ॥ ४८ ॥ माजीं सांपडलेनि अलिकुळें । जळावरी कमळकळिका जेंवि आंदोळे । तेंवि आंतुलिया सुखोमचेनि बळें | बाहेरि कांपे ॥ ४९ ॥ कर्पूरकर्दळीची गर्भपुढें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें । पुलिका गळती तेंवि थेंबुटे । नेत्रौनि पडती ॥ २५० ॥ उदयलेनि सुधाकरें | जैसा भरलाचि समुद्र भरे । तैसा वेळोवेळां ऊर्मीभरें । उचंबळत असे ॥ ५१ ॥ ऐसा सात्त्विकां आठांहि भावां । परस्परें वर्ततसे हेवा । अथवा जमिनीवर मुंग्या वारूळ करतात, किंवा मेरुपर्वतावर भरपूर परमाणु राहातात, ४३ त्याप्रमाणें संपूर्ण विश्व त्या देवदेवाच्या शरीरांत त्या वेळीं अर्जुन पाहाता झाला. ४४ त्या वेळी, विश्व हे एक निराळें, आणि मी हा एक निराळा, अशा तन्हेचा भेदभावनेचा जो अल्प अंश उरला होता, तोही आतां नाहींसा झाला, आणि अर्जुनाचें अंतःकरण एकदम विरघळून गेलें. ४५ अंतर्यामांत आनंदाचा संचार झाला, बाहेरच्या शरीरावयवांचें बळ तत्काळ गळून गेलें; आणि सर्व शरीर नखशिखांत रोमांचित झाले. ४६ पावसाळ्याच्या पहिल्या हंगामांत पाझर सुटलेल्या पर्वतांचे सर्व भाग कोमल तृणांकुरांनी आच्छादतात, तसे त्याच्या शरीरावर रोमांचाचे अंकुर उभारले. ४७ चंद्रकिरणांच्या स्पर्शानें जसा चंद्रकांत मणि द्रवतो, तसें त्याचें शरीर धर्मविनीं भरलें, ४८ कमलकोशांत अडकलेल्या भुंग्याच्या चळवळीनें जशी कमळाची कळी पाण्यावर डोलते, तसें अंतर्यामींच्या सुखाच्या उसळीनें त्याचं शरीर बाहेर थरथरत होते. ४९ कापुर केळीच सोपटे सोलू लागले म्हणजे जसे दाबून ठेवलेल्या कापराचे कण गळूं लागतात तशीं अर्जुनाच्या डोळ्यांतून टपाटप टिप पडली. २५० चंद्र उगवला म्हणजे जसा भरपूर भरलेला समुद्र अधिक भरून येतो, तसा अर्जुन आनंदाच्या लहरींनीं उचंबळून आला. ५१ अशा रीतीनं आठी सात्त्विक भाव परस्परांशीं जणूं काय चढाओढ करीत त्याच्या अंगीं भरले, आणि