पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३६९ सांगतसे राया ।। ३५ ।। म्हणे किंबहूना अवधारिलें । पार्थे विश्वरूप देखिलें । नाना आभरणीं भरलें । विश्वतोमुख || ३६ || दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता । यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२ ॥ सम० - नभीं सूर्यसहस्रांचे तेज एकसरें उठे । महात्मयाच्या तेजाची तरि ते न करी सरी ॥ १२ ॥ आर्या - जेव्हां गगनामाजीं एकसरें उगवती सहस्र रवी । तेव्हां महात्मयाच्या कांतीची सरि न कांति ते मिरवी ॥१२॥ ओंवी - सहस्रसूर्यप्रभा आकाशीं । उगवोनि दीप्त होय एकसरसी । तरीच साम्यता घडे कांहीं त्यासी । ऐसें तेज परम याचे तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसयाऐसा सांगावा । कल्पांती एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ॥ ३७ ॥ तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी। जरी उदयजती कां एकेचि अवसरी । तन्ही तया तेजाची थोरी । उपभृं नये ॥ ३८ ॥ आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयामीची सर्व सामग्री आणिजे । तेवींचि दशकुही मेळविजे । महातेजांचा ॥ ३९ ॥ ती तिये अंगप्रभेचेनि पाडें । हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें । आणि तयाऐसें कीर चोखडें । त्रिशुद्धी नोहे ॥ २४० ॥ ऐसें माहात्म्य या श्रीहरीचें सहज । फांकतसे सर्वांगींचें तेज । तें मुनिकृपा जी मज । दृश्य जाहलें ॥४१॥ 1 तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा । अपश्यदेवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ॥ १३ ॥ सम- एकीं अनेकधा तेथें विश्व सर्व पृथक् पृथक् । शरीरीं देवदेवाच्या देखे पांडव तेधवां ॥ १३॥ आर्या-त्या देवाच्या देहीं एकावयवीं अनेकधा भिन्न । पाहे पांडव तेव्हां हें सारें विश्वही परिच्छिन्न ॥ १३ ॥ - तेथे सर्व एके ठायीं पाहिलें । जग सर्वत्रहि वेगळालें । देवाचे देहीं देखिलें । पांडुपुत्रं ॥ १३ ॥ आणि तिये विश्वरूपीं एकीकडे । जग आघवें आपुलेनि पवाडें । जैसे महोदधीमाजीं बुडबुडे | सिनाने दिसती ॥ ४२ ॥ कां आकाशीं गंधर्वनगर । नव्हतें, ही गोष्ट, राजा धृतराष्ट्रा, ध्यानीं घे.” असें संजय हस्तिनापुरांत धृतराष्ट्रराजाला सांगत आहे. ३५ संजय पुढे म्हणाला, ', राजा, फार नको, पण इतके तरी ध्यानीं घे, कीं, अर्जुनानें प्रभूचें विश्वरूप पाहिलें, आणि तें परीपरीच्या अलंकारांनीं खचलेले असून सर्वव्यापी होतें. ३६ राजा, विश्वरूपाच्या त्या अंगकांतीचा अद्भुत देखावा कशासारखा होता म्हणून सांगावा ? अरे, महाप्रळयाच्या वेळी बारा सूर्य एकत्र मिळतात, ३७ तसले दिव्य सूर्य जरी एकदम हजारों उदय पावले, तरी त्यांनाही त्या विश्वस्वरूपाच्या तेजाच्या महिम्याचा थांग लागणार नाहीं. ३८ विश्वांतल्या सर्व विजा एकत्र कराव्या, आणि कल्पांतींच्या अग्नीचा सर्व मालमसाला एकत्र जुळवावा, आणि त्यांतच प्रसिद्ध दहा महातेजेंही कालवावी, ३९ म्हणजे कदाचित् त्या विश्वरूपाच्या अंगप्रभेच्या तेजाच्या कांहीं अल्प तोलाचे तेज सिद्ध होईल, परंतु तंतोतंत त्याच्या पासंगाला उतरेल असे तेज खचितच कोठेही नाहीं. २४० असें अपार थोरपण या श्रीकृष्णांच्या ठिकाणीं स्वाभाविकच आहे. त्यांच्या सर्वागींचें तें सर्वत्र पसरणारें तेज मला पाहायला सांपडलें, हें त्या महामुनि व्यासाच्या कृपेचें फळ होय. ४१ आणि त्या विश्वरूपांत एका कोपऱ्यांत हे सर्व जग आपल्या संपूर्ण विस्तारासह सांठवलें होतें. जसे महासागरामध्ये निरनिराळे बुडबुडे दिसतात, ४२ किंवा आकाशांत निरनिराळे मेघ असतात, ४७