पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जे अनंगुही सर्वांगीं धरी । तया सुगंधाची थोरी । कवण वानी ॥ २५ ॥ ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहतां अर्जुन जातसे क्षोभा । तेवींचि देवो वैसला कीं उभा । कां शयालु हैं नेणवे ॥ २६ ॥ बाहेर दिठी उघडोनि पाहे । तंव आघवें मूर्तिमय देखत आहे । मग आतां न पाहें म्हणोनि उगा राहे । तरी आंतुही तैसेंचि ॥ २७ ॥ अनावरें मुखे समोर देखे । तया भेणें पाठीमोरा जंव ठाके । तंव तयाहीकडे श्रीमुखें । करचरण तैसेचि ॥ २८ ॥ अहो पाहतां कीर प्रतिभासे । एथ नवलावो काय असे । परि न पाहतांही दिसे । चोज आइका ॥ २९ ॥ कैसें अनुग्रहाचें करणें । पार्थाचें पाहणें आणि न पाहणें । तयाहीसकट नारायणें । व्यापूनि घेतलें ॥ २३० ॥ म्हणोनि आचर्याच्या पुरी एकीं । ठायेंाव थडी टाकी । तंव चमत्काराचिया आणिकीं । महार्णवीं पडे ॥ ३१ ॥ ऐसा अर्जुनु असाधारणें । आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें । कवळूनि घेतला तेणें । अनंतरूपें ॥ ३२ ॥ तो विश्वतोमुख स्वभावें । आणि तेंचि दावावयालागी पांडवें । प्रार्थिला आतां आघवें । होऊनि ठेला ॥ ३३ ॥ आणि दीपें कां सूर्य प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेंचि खूंटे | तैसी दिठी नव्हे जे वैकुंठें । दिधली आहे ॥ ३४ ॥ म्हणोनि किरीटीसि दोहीं परी । तें देखणें देखे आंधारीं । हें संजयो हस्तिनापुरीं । त्या सुगंधाच्या थोरवीचें वर्णन कोण करूं शकेल ? २५ अशी एकेका शृंगाराची शोभा पाहतां पाहतां अर्जुन इतका गांगरून गेला, कीं, त्याला देव उभे आहेत, बसले आहेत कीं निजले आहेत ही नीटसे कळेना. २६ बाहेरचे चर्मचक्षु उघडून पहावें तों सर्व देवमूर्तिमयच दिसे. बरं आतां डोळ्यांनी पहावयाचंच नाहीं असा निश्चय करून स्वस्थ राहावं, तर अंतर्यामीही सर्व देवमयच ! २७ समोर अपरंपार बहनें दिसतात, म्हणून त्यांच्या भीतीनें अर्जुनानें पाठमोरं व्हावें, तो तिकडेही देवाची तोंडें, हात पाय इत्यादि सर्व तशींच आहेत ! २८ अहो, डोळे उघडून पाहात असतां दिसलें, तर त्यांत नवल कसले ? पण ऐकण्यासारखा चमत्कार हा, कीं, न पाहातांही, डोळे मिटले असतांही, दर्शन घडावें ! २९ अहो, काय ही प्रभुकृपेची करणी ! अर्जुनाचें पाहणें आणि न पाहणें, या दोन्ही क्रिया नारायणानें पूर्णपणे व्यापून टाकल्या, म्हणजे या दोन्ही क्रियांत त्याला नारायणाचें दर्शन घडेच. २३० म्हणून चमत्काराच्या एका पाणलांड्यांतून निसटून अर्जुन हातोहात तीरावर येतो आहे, तोच दुसऱ्या एका चमत्काराच्या महासागरांत तो पडे ! ३१ अशा प्रकारे त्या अनंतस्वरूपी नारायणांनीं आपल्या दर्शनाच्या अलौकिक सामर्थ्यानें अर्जुनाला अगदीं गुरफटून टाकिलें. ३२ प्रभु तर स्वभावतः विश्वतामुख, म्हणजे सर्वव्यापी आहेत आणि तशांत अर्जुनानें 'आपले विश्वरूप मला दाखवा, ' म्हणून प्रार्थिले, तेव्हां सहजच देव सर्व विश्वच आपण होऊन तेथे प्रकट झाले; ३३ आणि दिव्याच्या किंवा सूर्याच्या साह्यानें प्रकाशित व्हावें, किंवा त्याचें साह्य नसेल तर पाहाणेच संपावें, अशा प्रकारची स्थूल दृष्टि कांहीं नारायणांनी अर्जुनाला दिली नव्हती. ३४ म्हणून डोळे मिटले काय, न मिटले काय, दोन्ही स्थितींतही अर्जुनाला पाहण्यावांचून गत्यंतरच