पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३६७ समुद्रीं रिघों ॥ १६ ॥ मग काळकूटकल्लोळीं कवळिले | नाना महाविजूंचे दांग उमटले | तैसे अपार कर देखिले । उदितायुधीं ॥ १७ ॥ दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् । सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥ ११ ॥ सम- दिव्य पुष्पं दिव्य वस्त्रं दिव्य गंधे विभूषित । ञ्य सर्वाश्चर्यमय अनंत जगदात्मक ॥ ११ ॥ आर्या- धरि दिव्यलेप द्योतक जे धरिती दिव्य ज्यांत पुष्पवट । जे सर्वाश्चर्यमयहि जें विश्वोन्मुख अनंत निष्कपट ॥११॥ ओवी - दिव्यमाळा आणि पीतांबरधारण । दिव्यगंधाचे लेपन । सर्व अपूर्व रूप पाहातां गहन । दशदिशांमध्ये सन्मुख ११ कीं भेणें तेथूनि काढिली दिठी । मग कंठमुगुट पहातसे किरीटी । तंव सुरतरूची सृष्टी । जयापासोनि का जाहली ।। १८ ।। जिये महासिद्धीचीं मूळपीठें । शिणली कमला जेथ वावटे । तैसीं कुसुमें अति चोखटें । तुरंविलीं देखिलीं ॥ १९ ॥ मुगुटावरी स्तवक । ठायीं ठायीं पूजाबंध अनेक | कंठीं रुळतात अलोकिक | माळादंड ॥ २२० ॥ स्वर्गे सूर्यतेज वेढिलें । जैसें पंधरेनें मेरूतें मढिलें । तैसें नितंबावरी गाढिलें । पीतांवर झळके ॥ २१ ॥ श्रीमहादेवो कापुरें उटिला । कां कैलासु पारजें डवरिला । नाना क्षीरोदकें पांघरविला । क्षीरार्णवो जैसा ॥ २२ ॥ जैसी चंद्रमयाची घडी उपलविली । मग गगनाकरवी बुंथी घेवविली । तैसी चंदनपिंजरी देखिली । सर्वांगीं तेणें || २३ || जेणें स्वप्रकाशा कांति चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे । जयाचेनि सौरभ्यें जीवित जोडे । वेधवतीये ॥ २४ ॥ जयाचे निर्लेप अनुलेपु करी । नक्षत्रांचे फुटाणे उडत होते आणि तिचा चाट लागून पोळलेला अग्नि समुद्रांत घुसण्याचा बेत करीत होता. १६ नंतर, जणूं काय काळकूट विषाच्या लाटांनीं गुरफटलेले किंवा अनेक प्रचंड विजांच्या फांट्यांनी रेघाटलेले, असे शस्त्रे उगारणारे देवाचे असंख्य हात अर्जुनाने पाहिले. १७ जणूं का भीतीनेच त्या शस्त्रयुक्त हातांवरून आपली दृष्टि अर्जुनानें आंवरून घेतली आणि मग प्रभूचा गळा व मस्तक अर्जुन पाहूं लागला; तो, ज्यांपासून कल्पवृक्षांची उत्पत्ति झाली, १८ जीं आत्मप्राप्तीचीं आदिस्थानेच आहेत, आणि जेथें शिणलेली लक्ष्मी विसांवा घेते, अशीं अत्यंत स्वच्छ व सुंदर फुलें त्यानें धारण केलेली दिसली. १९ मस्तकावर गुच्छ, निरनिराळ्या अवयवांवर जाळ्या, गजरे झालरी इत्यादि प्रकार, आणि गळ्यांत दिव्य पुष्पमाळा रुळत होत्या. २२० स्वर्गानें जसें सूर्याचं तेज परिधान करावें, किंवा मेरूला जसें सोन्यानं मढवावे, तसें देवाच्या ढुंगणावर पिवळें वस्त्र झळकत होते. २१ कर्पूरगौर शंकराला कापरामें घांसावा, किंवा कैलासाच्या धवलगिरीवर पाऱ्याचा लेप चढवावा, किंवा दुग्धसमुद्राला दुधासारख्या पांढऱ्या वस्त्राचें पांघरूण घालावें, २२ किंवा जशी चांदण्याची घडी उलगडून तिची खोळ आकाशाला घालावी, तशी चंदनाची पातळ उटी प्रभूच्या सर्वांगाला लावलेली दिसली. २३ ज्या सुगंधानें आत्मस्वरूपाच्या तेजाला विशेष तजेला चढतो, ज्यानें ब्रह्मानंदाचा दाह शांत होतो, ज्यानें पृथ्वीला चैतन्य लाभतें, विरक्त संन्याशीही ज्याचा संग धरतात, २४ आणि अनंग मदनसुद्धां जो आपल्या सर्व अंगाला चोपडतो