पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी देखावयाची ॥ ६ ॥ तेथ भाग्यनिधि पार्था । कां विफलत्व होईल मनोरथा । काय पिनाकपाणीचिया भातां । वायकांडें आहाती ॥ ७ ॥ ना तरी चतुराननाचिये वाचे । काय आहाती लटिकिया अक्षरांचे सांचे । म्हणोनि साद्यंतपण अपाराचें । देखिलें तेणें ॥ ८ ॥ जयाची सोय वेदां नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे । अर्जुनाचे दोन्ही डोळे | भोगिते जाहले ॥ ९ ॥ चरणौनि मुकुटवरी । देखत विश्वरूपाची थोरी | जे नाना रत्नअलंकारीं । मिरवत असे ॥ २९० ॥ परब्रह्म आपुलेनि आंगें । ल्यावया आपणचि जाहला अनेगें । तिये लेणीं मी सांगें । काइसयासारिखीं ॥ ११ ॥ जिये प्रभेचिये झळाळा । उजाळू चंद्रादित्यमंडळा । जे महातेजाचा जिव्हाळा । जेणें विश्व प्रगटे ॥ १२ ॥ तो दिव्यतेजशृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु | देव आपणपेंचि लेइले ऐसें वीरु | देखत असे ॥ १३ ॥ मग तेथेंचि ज्ञानाचिया डोळां । पहात करपलवां जंव सरळां । तंव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा । तैसीं शस्त्रे झळकत देखे ॥१४॥ आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हतियार । आपण जीव आपण शरीर | देखे चराचर कोंदलें देवें ॥। १५ ।। जयाचिया किरणांचे निखरपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे । तेजें खिरडला वन्हि म्हणे । आवड उत्सुकतेनें वाढतच चालली. ६ आणि या प्रसंगीं अर्जुन म्हणजे सुदैवाचें भांडारच झाला होता, मग त्याचे मनोरथ निष्फळ कां होतील ? शंकराच्या भात्यांत कधीं फुसके बाण असतात काय ? ७ किंवा ब्रह्मदेवाच्या जिभेवर कधीं खोटे शब्द ठरतात काय ? तेव्हां अर्जुनानें तत्काळ त्या अपार मूर्तीचं संपूर्ण दर्शन घेतलें. ८ ज्याचा थांग वेदांनाही लागत नाहीं, त्याचे एकून एक अवयव अर्जुन दोन डोळ्यांनी एकेच वेळीं एकदम पाहता झाला. ९ चरणापासून मस्तकापर्यंत त्या स्वरूपाचें ऐश्वर्य पहातांना असे दिसलें, कीं, मूर्ति नानाप्रकारच्या अलंकारांनी नटलेली आहे. २१० तो परब्रह्मस्वरूप देव आपले शरीरावर धारण करण्याकरितां आपणच नानातऱ्हेचीं अलंकारभूषणें झाला होता. तीं भूषणें कशासारखीं होतीं म्हणून मीं सांगावें ? ११ ज्या तेजानें चंद्रसूर्याला उजळा चढतो, आणि विश्वाचें जीवन होणाऱ्या महातेजाचें जें जीवितसर्वस्व, तें तेज म्हणजेच हा विश्वरूपाचा शृंगार होय. याचें ज्ञान कोणाच्या बुद्धीला होईल बरें ? असा तेजस्वी शृंगार देवांनी धारण केला आहे, असें त्या शूर अर्जुनानें पाहिलें. १२,१३ मग ज्ञानदृष्टीने जेव्हां अर्जुन त्या विश्वरूपाने सडक सरळ हात पाहू लागला, तो जणूं काय कल्पांतींच्या ज्वाळाच निसटत आहेत, अशीं शस्त्रे झळकतांना त्याला दिसली. १४ अंग व अलंकार, हात व हत्यार, जीव व शरीर, या प्रत्येक जोडीतील दोन्ही वस्तू आपणच, अशा थाटानें त्या देवानें सर्वत्र स्थावर जंगम विश्व ठांसून भरून व्यापिलं आहे, असें अर्जुनाला आढळले. १५ त्या हत्यारांच्या किरणांच्या रखरखीत आगीनें