पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् । अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥ १० ॥ सम - नाना नेत्रमुखं ज्यांत नाना अद्भुतदर्शमें नाना आभरणं दिव्यें नाना धरिलि आयुर्वे ॥ १० ॥ ३६५ आर्या- माना ज्यांत मुख नयन बहु अद्भुत दर्शनेंहि जे युक्त । नाना दिव्याभरण नाना दिव्यायुधेहि उयुक्त ॥१०॥ भवी — अनेक नयन मुखै । अनेक अद्भुत रूपें देखे । दिव्याभरणं अनेकें । दीप्तिवंत आयुधे ज्यामाजी ॥ १० ॥ मग तेथ सैंध देखे वदनें। जैसीं रमानायकाची राजभुवनें । नाना प्रगटली निधानें । लावण्यश्रियेचीं ।। ९७ ।। की आनंदाचीं वनें सासिन्नलीं । जैसी सौंदर्या राणीव जोडली । तैसीं मनोहरें देखिलीं । हरीचीं वक्त्रे ॥ ९८ ॥ तयांहीमा एकैकें । सावियाचि भयानकें | काळरात्रीची कटकें । उठावली जैसीं ॥ ९९ ॥ कीं मृत्यूसीचि मुखें जाहलीं । हो कां जे भयाची दुर्गे पन्नासिलीं । कीं महाकुंडें उघडलीं । प्रळयानळाचीं ॥ २०० ॥ तैसीं अद्भुतें भयासुरें । तेथ वदनें देखिलीं वीरें । आणिके असाधारणें साळंकारें । सौम्यें बहुतें ॥ १ ॥ पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें । परि वदनांचा शेवटु न टके | मग लोचन ते कवतिकेँ । लागला पाहीं ॥ २ ॥ तंव नानावर्णे कमळवनें । विकासली तैसें अर्जुनें । नेत्र देखिले पालिंगनें । आदित्यांचीं जैशीं ॥ ३ ॥ तेथेंचि कृष्णमेघा चिया दाटी | माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी । तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळीं ॥ ४ ॥ हें एकैक आश्चर्य पाहतां । तिये एकचि रूपीं पांडुसुता । दर्शनाची अनेकता । प्रतिफळली ॥ ५ ॥ मग म्हणे चरण ते कवणेकडे । उते मुकुट के दोर्दंडें । ऐसी वाढविता हे कोडें । चाड या विश्वरूपाला किती तरी तोंडें होतीं. जशीं काय लक्ष्मीपतीचीं राजमंदिरें, किंवा सौंदर्यलक्ष्मीचीं अनेक भांडारे, किंवा तरारलेलीं आनंदाचीं वनें किंवा लावण्याचीं साम्राज्यें, अशीं प्रभूचीं सुंदर सुंदर वदनं अर्जुनानें पाहिली. ९७.९८. पण या सुंदर वदनांबरोबरच, मध्ये मध्ये त्याने दुसरी स्वभावतःच भयंकर अशीही वदने पाहिलीं. जशीं काय काळरात्रीचीं सैन्यंच उसळलीं आहेत, किंवा प्रत्यक्ष मरणालाच तोंडें फुटलीं आहेत, किंवा भीतीचे किल्ले उभारले आहेत, किंवा प्रळयानींचीं प्रचंड कुंडे उघडलीं आहेत, ९९,२०० अशीं विलक्षण विक्राळ, भयंकर तोंडें त्या विश्वमूर्तीत वीर अर्जुनाने पाहिलीं; दुसरींही त्या मूर्तीला अलौकिक, शृंगारलेली, किंवा सौम्य, अशीं असंख्य तांडे होती. १ खरोखर त्या ज्ञानदृष्टीलाही या तोंडांचा अंत सांपडेना ! मग अर्जुन मोठ्या कोडकौतुकाने त्या विश्वरूपाचे डोळे पाहू लागला. २ तों, नानारंगांच्या फुललेल्या कमळवनाप्रमाणें, सूर्याच्या रांगाच असे तेजस्वी डोळे अर्जुनाने पाहिले. ३ आणि त्याच डोळ्यांत, काळ्या रंगाच्या दाट गर्दीत जसे कल्पांतकाळीं विजांचे फांटे फुटावे, तसे काळ्या वक्र भिवयांखालून विस्तवाप्रमाणें पिंगट अशा दृष्टीचे किरण सरसावत होते. ४ अशा प्रकारे त्या एकाच रूपांत हे एकेक निरनिराळे चमत्कार पाहून, अर्जुनाला त्या रूपाचं अनेकत्व पूर्णपणे पटलें. ५ मग तो मनांत म्हणाला, "याचे पाय कोठें आहेत, मुकुट कोठे आहेत, आणि हात तरी कोठे आहेत ? " अशा रीतीनें त्याची विश्वरूपदर्शनाची