पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६४ सार्थ ज्ञानेश्वरी तया चमत्काराचें एकार्णव जाहलें । चित्त समाजीं बुडोनि ठेलें । विस्मयाचिया ॥ ८६ ॥ जैसा ह्म पूर्णोदकीं । पव्हे मार्कंडेय एकाकी । तैसा विश्वरूपकौतुकीं । पार्थ लोळे ॥ ८७ ॥ म्हणे केवढें गगन एथ होतें । तें कवणें नेलें पां केउतें । तीं चराचरें महाभूतें । काय जाहलीं ॥ ८८ ॥ दिशांचे ठावही हारपले । अधो काय नेणों जाहले । इलिया स्वप्न तैसे गेले । लोकाकार ॥ ८९ ॥ नाना सूर्यतेजप्रतापें । सचंद्र तारांगण जैसें लोपे । तैसीं गिळिलीं विश्वरूपें । प्रपंचरचना ॥ १९० ॥ तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपण न सांवरे । इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ॥ ९१ ॥ तेथ ताटस्थ्या ताटस्थ पडिलें । टकासी टक लागलें । जैसें मोहनास्त्र घातलें। विचारजातां ॥९२॥ तैसा विस्मितु पाहे कोडें । तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें । तेंचि नानारूप चहुंकडे । मांडोनि ठेलें ॥ ९३ ॥ जैसें वर्षाकाळीचे मेघडें । कां महाप्रळयींचें तेज वाढे । तैसें आपणावीण कवणीकडे । नेदीचि उरों ॥ ९४ ॥ प्रथम स्वरूपसमाधान | पावोनि ठेला अर्जुन | सवेंचि उघडी लोचन । तं विश्वरूप देखे ॥ ९५ ॥ इहींचि दोहीं डोळां । पाहावें विश्वरूपा सकळा । तो श्रीकृष्ण सोहळा | पुरविला ऐसा ॥ ९६ ॥ प्रभुस्वरूपाची ऐश्वर्यप्रभा उघडली, आणि एकंदर जिकडे तिकडे चमत्कारच पसरलेला दिसला; त्यामुळें अर्जुनाचे चित्त आश्चर्यभावनेत गर्क होऊन गेलें. ८६ ज्याप्रमाणें ब्रह्मदेवाच्या सत्यलोकापर्यंत तुडुंब भरलेल्या पाण्यांत एकटे मार्कडेयच एकदा पोहत राहिले अशी कथा आहे, त्याप्रमाणेंच आज विश्वरूपाच्या महोत्सवांत अर्जुन लोळत होता. ८७ तो म्हणूं लागला, कीं, "अरे, येथें केबढें तरी अफाट आकाश होतें, तें कोणी व कोठें नेलें ? ती स्थावरजंगम भूतसृष्टीही कोठे गेली ? ८८ दिशांच्या खुणाही लोपल्या. वर खालीं ही कल्पनाच उरली नाहीं. जागे झाल्यावर जसें स्वप्न नाहींसें व्हावें, तसा आज सृष्टीचा आकारच लोपला ! ८९ किंवा ज्याप्रमाणें सूर्याच्या तेजाच्या प्रभावानें चंद्र व तारे अदृश्य होतात, त्याप्रमाणे प्रभूच्या या विश्वरूपाने सर्व सृष्टि रचना गिळून टाकलेली दिसते !” १९० तेव्हां मनाचें मनपण हरपलें; बुद्धीला आपला तोल संभाळवेना; आणि इंद्रियांचे ओढे उलटे हृदयाच्या आंत भरू लागले ! ९९ तेव्हां स्तब्धपणाची व एकाग्रतेची परमावध झाली, जणूं काय सर्व तऱ्हेच्या विचारांवर कोणी मोहनास्त्राचाच प्रयोग केला होता ! ९२ अशा प्रकारें आश्चर्यात गर्क झालेला अर्जुन कौतुकानें पाहूं लागला, तो त्याला समोर चार हातांचं श्रीकृष्णांचे नाजूक स्वरूप दिसलं, पण तेंच चहूंकडे नानाप्रकारची रूपें थाटून राहिलें होतें. ९३ जसे पावसाळ्यांतील मेघांचे ढीग वाढत जातात, किंवा महाप्रळयाच्या समयीं सूर्याचें तेज अधिकाधिक पसरत जातें, तसें या प्रभूच्या विश्वस्वरूपाने आपल्याशिवाय दुसरें कांहींच उरू दिले नव्हते. ९४ प्रथमतः आत्मस्वरूपाचा असा साक्षात्कार घडल्यामुळे अर्जुन समाधान पावून स्तब्ध झाला. नंतर त्यानें सहज डोळा उघडला, तां विश्वरूपाचे प्रत्यक्ष दर्शन घडले. ९५ ' या दोन डोळ्यांनी विश्वरूप पाहावें,' ही जी अर्जुनाच्या मनाची मोठी हौस, ती श्रीकृष्णांनी अशी पुरविली. ९६