पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३६३ म्हणोनि तो देवांचा रावो । म्हणे पार्थातें तुज दृष्टि देवों । जया विश्वरूपाचा ठावो | देखसी तूं ॥ ७६ ॥ ऐसीं श्रीमुखौनि अक्षरें । निघती ना जंब एकसरें । तंव अविद्येचें आंधारें । जावोंचि लागे ॥ ७७ ॥ तीं अक्षरें नव्हती देखा | ब्रह्मसाम्राज्यदीपिका । अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया श्रीकृष्णं ॥ ७८ ॥ मग दिव्यचक्षुप्रकाशु प्रगटला । तया ज्ञानदृष्टी फांटा फुटला । ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुलें ॥ ७९ ॥ हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ । विश्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥ १८० ॥ जिये अनादिभूमिके नीटे ' । चराचर हैं चित्र उमटे | आपण श्रीवैकुंठें । दाविलें तया ॥ ८१ ॥ मागां बाळपणीं येणें श्रीपती । जैं एक वेळ खादली होती माती । तैं कोपोनियां हातीं । यशोदा धरिला ॥ ८२ ॥ मग भेणें भेणें जैसें । मुखीं झाड द्यावयाचेनि मिसें । चवदाही भुवनें सावकारों । दाविलीं तिये ॥ ८३ ॥ ना तरी मधुवनीं ध्रुवासि केलें । जैसें कपोल शंखें शिवतलें । आणि वेदांचियेही मती ठेलें । तें लागला बोलों ॥ ८४ ॥ तैसा अनुग्रहो पैं राया । श्रीहरी केला धनंजया । आतां कवणेकडेही माया । ऐसी भाप नेणेचि तो ।। ८५ ।। एकसरें ऐश्वर्यतेजें पाहलें । त्याला म्हणाले, “ अर्जुना, मी तुला आतां दिव्य दृष्टि देतों, हिच्या योगानें तूं माझें विश्वरूप पाहूं शकशील.” ७६ अशीं अक्षरें श्रीकृष्णांच्या तोंडून निघतात न निघतात, तोंच एकदम अज्ञानाचा काळोख विरघळूं लागला. ७७ अहो, श्रीकृष्णांच्या तोंडून निघालेलीं तीं अक्षरं नव्हत, तर जो ब्रह्मस्वरूपाच्या साम्राज्याचा दिवा त्याची ही ज्ञानरूपी ज्योत श्रीकृष्णांनीं अर्जुनाकरितां उजळली होती. ७८ मग त्या अर्जुनाला अलौकिक ज्ञानडोळा प्रकट झाला, आणि या डोळ्याला ज्ञानदृष्टीचे फांटे फुटले. अशा रीतीनें श्रीकृष्णांनीं अर्जुनाला आपले विश्वरूपयोगाचे वैभव दाखविलें. ७९ ईश्वराचे निरनिराळे अवतार ज्या सागरांतले तरंग आहेत, ज्याच्या किरणांच्या योगानें या विश्वरूप मृगजळाचा आभास उत्पन्न होतो, १८० ज्या अनादिसिद्ध, स्वयंभू, सारख्या, सपाट भूमिकेवर हें चराचरात्रें चित्र उमटतें तें आपलें विश्वरूप वैकुंठाधिपति नारायणांनी अर्जुनाला दाखविलें. ८१ मागें एकदां बाळपणीं जेव्हां श्रीकृष्णांनी माती खाली होती, तेव्हां यशोदेनं रागावून त्यांचे मनगट धरलें. ८२ मग आपल्या asi कांहीं नाहीं असा पुरावा देण्याकरितां भीत भीत झाडा देण्यासाठी तोंड उघडलें असतां जसं त्या तोंडांत चौदाही भुवनांचे दर्शन त्या यशोदेला घडविलें, ८३ किंवा मधुवनांत जशी ध्रुवावर कृपा केली, कीं, त्याच्या गालाला शंखाचा स्पर्श करतांच तो, वेदांनाही जे स्पष्ट जाणतां येत नाहीं, ही भराभर बोलूं लागला, ८४ त्याप्रमाणेच, हे धृतराष्ट्रा, श्रीकृष्णांनी अर्जुनावर प्रसाद केला आणि त्यामुळे त्या अर्जुनाला कोठेही 'माया' हा शब्दच नाहीं, असें झालें. ८५ १ नीट, सपाट, समपातळीच्या २ भीतभीत. ३ वेदांनाही जे जाणता येत नाहीं. ४ प्रकाशलें. मग एकदम