पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी शेपाच्याच आथी ॥ ६६ ॥ हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पाहार योगी जैसे | अनुसरलें गरुडाऐसें । कवण आहे ॥ ६७ ॥ परि तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें । जिये दिवृनि जन्मले | पांडव हे ॥ ६८ ॥ परि पांचांही आंतु अर्जुना । श्रीकृष्ण सावियाचि जाहला अधीना | कामुक कां जैसा अंगना । आपता कीजे ॥ ६९ ॥ पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले। कैसें दैव एथें सुरवाडलें । तें जाणों नये ।। १७० ।। आजि परब्रह्म हे सगळे । भोगावया सदैव याचेच डोळे | कैसे वाचेचे हन लळे | पाळीत असे ॥ ७१ ॥ हा कोपे की निवांतु सा । हा रुसे तरी बुझावित जाये । नवल पिसें लागलें आहे | पार्थाचें देवा ॥ ७२ ॥ एहवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले । ते वियो वानितां जाहले । भाट ययाचे ॥ ७३ ॥ हा योगियांचें समाधिधन । कीं होऊनि ठेलें पार्थाअधीन । यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ॥ ७४ ॥ तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथें कौरवेश | श्रीकृष्ण स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ।। ७५ ।। तसेंच खरें खरें सेवकपण जें म्हणतात, तें एकट्या शेषाच्याच अंगी आहे, नव्हे काय ? ६६ अहो, नारायणाविषयींच्या प्रेमाच्या नादाने आठी प्रहर योगिजनाप्रमाणें एकतंत्रीने त्याची सेवा करणारा गरुडासारखा दुसरा कोणी भक्त आहे का ? ६७ परंतु ही सर्व मंडळी बाजूस राहून, हे पांडव जन्माला आल्या दिवसापासून सांप्रत नारायणाच्या सुखाला एकवट करणारे नवीन स्थळ उदयास आले आहे. ६८ आणि त्यांतही या पांच पांडवांपैकी या अर्जुनाच्या कह्यांत हे श्रीकृष्ण आपण होऊनच सर्वस्वी गेले आहेत; जणूं काय हा एक विषयी मनुष्यच एका लावण्यवतीनं लंपट करून टाकला आहे ! ६९ शिकवलेलं पांखरूंही असं बोलत नाहीं, करमणुकीसाठीं लाडाने पाळलेलें हरिणही असे बागडत नाहीं, इतके हे श्रीकृष्ण अर्जुनाच्या नावीं लागून पटापट बोलतात व त्याच्या संगतीं नाचतात बागडतात ! या अर्जुनाचे एवढे कोणतं दैव उदयाला आले आहे, कांहीं कळत नाहीं. १७० अहो, हें एकंदर परब्रह्म पाहाण्याचा सोहळा भोगण्याचें भाग्य याच्या डोळ्यांना लाभले, पहा, त्याचा प्रत्येक शब्द श्रीकृष्ण कसे लाडाकोडानें झेलीत आहेत ! ७१ अर्जुन रागावला तर देव तं खुशाल सहन करितात. अर्जुन रुसला, तर देव त्याची समजूत घालतात. अर्जुनाचे इतके वेड देवांना लागावें हें मोठेंच आश्चर्य आहे. ७२ अहो, विषयवासनेवर विजय मिळवून जे शुकादि योगिजन सामर्थ्यवान झाले, तेच या श्रीकृष्णांच्या रासक्रीडादि विषयविलासांचें वर्णन करीत करीत यांचे स्तुतिपाठक बनले. ७३ योगी लोक आत्मचिंतनाची समाधि लावून या श्रीकृष्णांचें ध्यान करतात, आणि तेच श्रीकृष्ण आज अगदीच अर्जुनाच्या पंगस्तीस गेले, याचं, राजा धृतराष्ट्रा, मला फारच नवल वाटतं. " ७४ पण यानंतर लागलाच संजय म्हणाला, “अथवा हे कौरवश्रेष्ठा, यांत नवल तरी कसले ? श्रीकृष्णांनी ज्याचा स्वीकार केला त्याचा असाच भाग्योदय होतो. ७५ म्हणून तर ते देवाधिदेव