पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला ११ करूनी | मुख्य जे जे ॥ ४ ॥ हा भीष्म गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु । रिपुगज - पंचाननु । कर्ण वीरु ॥ ५ ॥ या एकेकाचेनि मनोव्यापारें । हें विश्व होय संहरे । हा कृपाचार्य न पुरे । एकलाचि ॥ ६ ॥ एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहे । याचा आडदरु सदा वाहे । कृतांतु मनीं ॥ ७ ॥ समितिंजयो सौमदत्ति । ऐसे आणीकही बहुत आहाती । जयांचिया वळाची मिती । धाता नेणे ॥ ८ ॥ अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः । नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ ९ ॥ सम० - आणिकही बहू शूर समर्थ मरणार जे । नानाशस्त्रें हाणणारे युद्ध कुशळ सर्वही ॥ ९ ॥ आर्या- आणिक शस्त्रास्त्रीं हे बहूत जे शूर निपुण समरा या । माझ्या अर्थासाठीं धरुनी आलेहि मानस मराया ९ ओवी - आणिकही बहुत वीर । माझ्या निमित्ते मरणार । नानाशस्त्रांचे प्रेरणार । सकल कुशल युद्धासी ॥ ९ ॥ जे शस्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त । हो का जें अजात । एथूनि रूढ ॥ ९ ॥ हे अप्रतिमल्ले जगीं । पुरता प्रतापु अंगीं । परी सर्व प्राणें मजचि - लागीं । आराइले ।। ११० ।। पतिव्रतेचें हृदय जैसें । पतीवांचूनि न स्पर्शे । मी सर्वस्व यां तैसें । सुभटांसी ॥ ११ ॥ आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोडें । ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त ॥ १२ ॥ झुंजती कुळकणी जाणती । कळे कीतींसी जिती । हें बहु असो क्षात्रवृत्ती । एथो- नियां ।। १३ ।। ऐसे सर्वेपरी पुरते । वीर दळीं आमुतें । आतां काय गणूं ययांतें । अपार ॥ १४ ॥ दिग्दर्शनापुरताच उल्लेख करितों. ४ हे गंगापुत्र भीष्म पितामह यांच्या प्रतापाचें तेज सूर्यतेजासारखें आहे. हा वीर कर्ण तर शत्रुरूप हत्तींचा संहर्ता सिंहच आहे. ५ यांच्यापैकीं एकेकानें जरी मनांत आणले, तरी तो विश्वाचा संहार करूं शकेल. किंबहुना, हे कृपाचार्य एकटेच या कामास पुरे पडण नाहीं कीं काय ? ६ शिवाय, हा वीर विकर्ण आहे; हा पलीकडे अश्वत्थामा पहा, प्रत्यक्ष सर्वविध्वं- सक काळही याचा धाक मनांत वागवितो. ७ आणखी समितिंजय, सौमदत्ति, इत्यादि पुष्कळ वीर असे आहेत कीं, त्यांच्या सामर्थ्याचें माप प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही होत नाहीं. ८ जे शस्त्रविद्येत निष्णात आहेत, मंत्रविद्येत जे प्रत्यक्ष अवतारच वाटतात, आणि समग्र अस्त्र- समूह ज्यांनी जगांत रूढ केला आहे, ९ ते हे अंगीं पुरा प्रताप बाणलेले, अप्रतिम वीर सर्वजीवाभावानें माझे अनुयायी झाले आहेत, ११० ज्याप्रमाणें पतिव्रतेचे हृदय पतीवांचून इतरांस स्पर्श करीत नाहीं, त्याप्रमाणें या महायोद्ध्यांचं मीच भक्तिसर्वस्व झालों आहें. ११ आमच्या कार्यापुढें, हे स्वतःच्या प्राणांना कः पदार्थ समजतात, याप्रमाणें हे स्वामिनिष्ठेत निःसीम व निर्दोष आहेत. १२ हे युद्धकौशल्य जाणतात, युद्धकलेची कीर्ति यांनीच जीवन्त राखिली आहे. किंबहुना, क्षत्रिय बाण्याचा उगम यांच्या- पामृनत्र झाला आहे. १३ एवंच, आमच्या सैन्यांत असे सर्वतोपरी पठ्ठे वीर आहेत, त्यांची गणती काय करावी ? हे केवळ असंख्य आहेत. १४ १ प्रतिमाल (जोडीचा माल ) ज्यांना नाही असे, २ कला, कौशल्य,