पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३६१ शार्ङ्गधरा । कोपा कवणा ॥ ५८ ॥ जें अतींद्रिय म्हणोनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटलें । तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखें ॥ ५९ ॥ परि हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें । एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ।। १६० ।। साच विश्वरूप जरी आम्हीं दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें । परि बोलत बोलत प्रेमभावें । 'धसाळ गेलों ॥ ६१ ॥ काइ जालें न वाहतां भुई पेरिजे । तरी तो वेल विलया जाइजे । तरी आतां माझें निजरूप देखिजे । ते दृष्टि देवों तुज ॥६२॥ मग तिया दृष्टी पांडवा | आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा । देखोनियां अनुभवा । माजिवडा करी ॥ ६३ ॥ ऐसें तेणें वेदांतवेधें । सकळलोकआयें | बोलिलें आराध्यें | जगाचेनि ॥ ६४ ॥ संजय उवाच- एवमुक्त्वा ततो राजन्महायोगेश्वरो हरिः । दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥ ९ ॥ सम० - ऐसे बोलोनियां राया महायोगेश जो हरी । पार्थासि दाविता झाला रूप जे परमेश्वर ॥ ९ ॥ आर्या- श्रीपति योगेश्वर तो बोलुनि ऐसें पृथातनूजाला । अपुलें ईश्वररूप प्रेमें मग त्यासि दाविता झाला ॥ ९ ॥ ओंवी – संजय म्हणे राया । ऐसें वासुदेव बोलोनियां । आपलें ईश्वरख धनंजया । निजविश्वरूप दाखविता झाला ।। ९ ।। पैं कौरवकुळचक्रवर्ती | मज हाचि विस्मयो पुढतपुढती । जे श्रियेनि त्रिजगतीं । सदैव असे कवणी ॥ ६५ ॥ ना तरी खुणेचें वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं । ना सेवकपण तरी आंगीं । फुकट दवडावयाचे; मग, हे नारायणा, दुसऱ्यावर उगाच राग कां म्हणून करावा ? ५८ जे केवळ इंद्रियांपलीकडचें म्हणून ठरलेले आहे, आणि जे एकट्या ज्ञानदृप्रीच्याच वांट्याला येतें, तें तुम्हीं माझ्या जड चर्मचक्षूंपुढे मांडलंत, तर मला दिसावें तरी कसें ?५९ परंतु तुमचें उणें काढून तुम्हांला दोष द्यावा हे योग्य नाहीं. मी स्वस्थ राहाणंच चांगलें. " हे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, " वा अर्जुना, तूं म्हणतोस तंच खरं आहे. १६० खरं खरं विश्वरूप आम्हीं तुला दाखवावयाचें, म्हणजे पहिल्या प्रथम तं पाहण्याचें सामर्थ्य तुला दिले पाहिजे होते; पण प्रेमाच्या ऐन भरांत बोलतां बोलतां तें मी अगदीच विसरून गेलों. ६१ त्यामुळे काय झाले, तर जमीन न नांगरतां तींत बी पेरलें म्हणजे तींत उगवलेला वेल जसा फुकट जातो तसेच येथे झाले आहे. पण, आतां ज्या दृष्टीने माझं विश्वरूप पाहतां येईल अशी इटि तुला देतों. ६२ मग, अर्जुना, त्या दृष्टीच्या साह्याने आमचा विश्वव्यापक ऐश्वर्ययोग प्रत्यक्ष पाहून, तूं खुशाल आत्मानुभवामध्यें प्रवेश करशील. ६३ ज्यांचं प्रतिपादन वेद करण्यास पाहतात, जे सर्व विश्वाचें मूळवीज आहेत, आणि जे सर्व जगाला वंद्य आहेत, ते श्रीकृष्ण अशा रीतीनं बोलले. ६४ मग संजय धृतराष्ट्रास म्हणाला, “ह कौरवकुलश्रेष्ठ राजा, मला एका गोष्टीचं पुन्हां पुन्हां मोठे नवल वाटतं, ती गोष्ट ही, कीं, असे पहा, या त्रिभुवनांत लक्ष्मीहून अधिक भाग्याची कोण आहे बरें ? ६५ आत्मस्वरूपाची खूण पटण्याजोगें वेदांवांचून दुसरें कांहीं तरी साधन आहे काय ? १ भलतीकडेच, चुकून, विसरून. ४६