पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६० सार्थ श्रीज्ञानेश्वरी देख विस्तारेंशीं । आणि विश्वाहीपरौतें मानसीं । जरी देखावें वर्ते ॥ १५० ॥ तरी इयेही विपयींचें कांहीं । एथ सर्वथा सांकडें नाहीं । सुखें आवडे तें माझिया देहीं । देखसी तूं ॥ ५१ ॥ ऐसें विश्वमृती तेणें । बोलिलें कारुण्यपूर्णे | तंव देखत आहे कीं नाहीं न म्हणे । निवांतुचि येरु ॥ ५२ ॥ एथ कां पां हा उगला । म्हणोनि श्रीकृष्ण जंव पाहिला । तंव आतीचें लेणें लेइला | तैसाच आहे ॥ ५३ ॥ न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनेव स्वचक्षुषा । दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥ ८॥ सम०—परि याच स्वदृष्टीनें पाहों न शकसी मज । दिव्य दृष्टी तुर्ते देतों पाहें ईश्वरयोग हा ॥ ८ ॥ आर्या-पार्था या दृष्टीनें मला पहाया समर्थ तूं नाहीं । देतों तुजला चक्षू दिव्य तयानेंहि रूप हें पाहीं ॥ ८ ॥ ओंवी — या चर्मचक्षूनें न देखवे मज । ज्ञानचक्षु देतों तुज । मग ईश्वरयोग सहज | पाहसील तूं ॥ ८ ॥ मग म्हणे उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे । परि दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ॥ ५४ ॥ हें बोलोनि देवो हांसिले | हांसोनि देखणियातें म्हणितलें । आम्हीं विश्वरूप तरी दाविलें । परि न देखसी तूं ॥ ५५ ॥ यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासि तें उणें । तुम्ही काकरवी चांदिणें । चरखूं पहा मा ॥ ५६ ॥ हां हो उटोनियां आरसा | आंधळया दाऊं बैसा । बहिरियापुढे हृषीकेशा । गाणीव करा ॥ ५७ ॥ मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा । वायां धाडा अवयवाच्या प्रदेशांत विश्वाचा विस्तार दिसून येतो. आतां, विश्वापलीकडे जे आहे त्याचेंही दर्शन घडावे, अशी तुझी मनीषा असेल, १५० तर या बाबतीतही कठीण असें कांहींच नाहीं, कारण या माझ्या स्वरूपांत तुला पाहिजे ते दिसून येईल. " ५१ असें दयामय श्रीकृष्ण म्हणाले, परंतु 'पाहात आहे कीं नाहीं, ' याबद्दल अर्जुनानें कांहींच उत्तर दिलें नाहीं. ५२ तेव्हां 'अर्जुन कां बरें मुक्यासारखा स्तब्ध झाला आहे,' अशी शंका येऊन जेव्हां श्रीकृष्णांनीं त्याच्याकडे नजर टाकली, तेव्हां त्यांना असे दिसून आलें कीं, तो पूर्वीप्रमाणेच जशाचा तसाच उत्कंठेने नटलेला आहे. ५३ मग श्रीकृष्ण म्हणाले, " याची उत्कंठा अजून ओसरली नाहीं. याला अद्याप आत्मसुखाचा लाभ घडला नाहीं. जे खरंखरं सत्य स्वरूप याला मी प्रकट दाखविलें आहे, तें आकलन करण्याची याला शक्तीच दिसत नाहीं. " ५४ असें म्हणून देव हंसले, आणि ते त्या प्रेक्षकाला ( म्हणजे पाहणाऱ्या अर्जुनाला ) म्हणाले, “अरे, आम्हीं तुला विश्वरूप दाखविलें परंतु तूं तें पहातच नाहींस ! " ५५ हे देवांचं भाषण ऐकून तो चतुर अर्जुन म्हणाला, "अहो, हा दोष कोणाचा ? तुम्हीं बगळ्याला चांदणं भरविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहां ! ५६ अहो, तुम्हीं घांसलापुसलेला आरसा आंधळ्यापुढं धरीत आहां, किंवा, हे प्रभो, बहिऱ्यापुढे गाण्याचे आलाप काढीत आहां! ५७ मधाचे कण जाणूनबुजून बेडकाला मुद्दाम चारावयाचे आणि आपणच ते १ घासून पुसून.