पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा पश्यादित्यान्वसून्रुद्रानश्विनौ मरुतस्तथा । बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥ ६ ॥ सम० पाहें देव वसू रुद्र मरुत् अश्विनिपुत्रही । पाहें नाहीं देखिलीं तीं नवलें बहु भारता ॥ ६॥ आर्या - माझे रूप पाहा तूं वसु रुद्रां मरुद्गणां सत्य । पूर्वी न देखिलीं जीं आश्वर्ये भारता महासत्य ॥ ६ ॥ ओवी - आदित्य, रुद्र, वसु, पाहें। अश्विनीदेव, मरुद्गुण, ते हे । हें पूर्वी देखिलें नोहे । आश्चर्यरूप ॥ ६ ॥ ३५९ जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टि । पुढती निमीलनी मिठी । देत आहाती ॥ ४१ ॥ वदनींचिया वाफेसवें । होत ज्वाळामय आघवें । जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचा ॥ ४२ ॥ आणि भ्रूलतांचे शेवट । कोपे मिळों पाहती एकवट । तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखें ॥ ४३ ॥ पैं सौम्यतेचा बोलावा । मीति नेणिजे अश्विनौदेवां । श्रोत्रीं होती पांडवा | अनेक वायु ॥ ४४ ॥ यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांचीं कुळें । ऐसीं अपारें आणि विशाळें । रूपें यें पाहीं ॥ ४५ ॥ जयांतें सांगावया वेद वोवडे । पहावया काळाचेंही आयुष्य थोकडें । धातयाही परि न सांपडे । ठाव जयांचा ॥ ४६ ॥ जयांतें वेदत्रयी कधीं नायके । तियें इयें प्रत्यक्ष देख अनेकें । भोगीं आश्चर्याचीं कवतिकें | महासिद्धि ॥ ४७ ॥ कस्थं जगत्स्नं पश्याद्य सचराचरम् । मम देहे गुडाकेश यच्चान्यद्दन्दुमिच्छसि ॥ ७ ॥ सग० - एकत्र माझ्या या देहीं पाहें आजि चराचर । विश्व सर्व गुडाकेशा जं पाहों अन्य इच्छिसी ॥ ७ ॥ आर्या-माझ्या एकावयवीं जग सारें तूं पहा चराचर तें । आणिक पाहों इच्छिसि जे तूं तेंही इथेंचि संचरतें ॥ ७ ॥ ओवी - जग अवघें एका ठायीं । चराचर व्यापोनही । याहूनि आणिक इच्छिसी कांहीं । तें माझे देहीं पाहीं पार्था ७ इया मूर्तीींचिया किरीटी । रोममूळीं देखें पां सृष्टि । सुरतरुतळवटीं । तृणांकुर जैसे ॥ ४८ ॥ चंडवाताचेनि प्रकारों । उडत परमाणु दिसती जैसे । 'भ्रमत ब्रह्मकटाह तैसे । अवयवसंधीं ॥ ४९ ॥ एथ एकैकाचिया प्रदेशीं । विश्व या रूपांपैकी एकाद्या रूपाची जेव्हां दृष्टि उघडते, तेव्हां आदित्यादि बारा सूर्य उत्पन्न होतात, पण तीच दृष्टि मिटली, कीं ते सर्व आदित्य एकवटून लीन होत आहेत. ४१ रूपाच्या तोंडांतील उष्ण श्वासावरांवर सर्वत्र ज्वाळाच ज्वाळा होतात, आणि त्याच ज्वाळांत पावकप्रभृति आठ वसूंचा जन्म होतो. ४२ आणि या स्वरूपाच्या बांकदार भिवयांची टोकं जेव्हां रागाने एकत्र मिळतात, तेव्हां अकरा रुद्रांचा अवतार होतो ४३ परंतु याच्या ठिकाणीं सौम्यपणाचा ओलावा आला कीं अश्विनीकुमारांसारखे असंख्य जीवनदाते उत्पन्न होतात. याच्या कानांतून वारे सुटतात. ४४ अशा प्रकारे एकाच रूपाच्या सहज खेळाने देव व सिद्ध निर्माण होतात. आणि अशीं रूपें तर या माझ्या विश्वरूपांत असंख्य व अनंत आहेत, पहा. ४५ ज्यांचें वर्णन करतांना वेदांचीही बोबडी वळली, काळाचेही आयुष्य अपुरें पडलें, आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही थांग लागला नाहीं, ४६ आणि ज्यांची वार्ताही वेदत्रयीच्या कधीं कानावर आली नाहीं, तीं हीं अनेक रूपं तूं प्रत्यक्ष पहा, आणि आश्चर्यानंदाचा आणि पूर्ण सफलतेचा उपभोग घे. ४७ अर्जुना, कल्पवृक्षाखालीं जसे गवताचे अंकुर उगवावे, तसेच या मूर्तीच्या रोमरंधांत सृष्टीचे अंकुर आहेत. ४८ छपराच्या झरोक्यांतून येणाऱ्या किरणांत जसे परमाणू उडतांना दिसतात, तसेच या मूर्तीच्या अवयवांच्या संधिस्थानी ब्रह्मांडें उडतांना दिसत आहेत. ४९ हिच्या प्रत्येक