पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी लालसें । एकें संहारकें सावेगें । साक्षिभूतें एकें ॥ १३० ॥ एवं नानाविधें परि बसें । आणि दिव्यतेजप्रकाशे । तेवींचि एकएक ऐसे । वर्णही नव्हे ॥ ३१ ॥ एक तोतलें साडेपंधरें । तैसीं कपिलवर्णे अपारें । एकें सर्वांगी जैसें सेंदुरें । डवरलें नभ ॥ ३२ ॥ एके सांवियाचि चुकीं । जैसे ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं । एकें अरुणोदयासारिखीं । कुंकुमवर्णे ॥ ३३ ॥ एके शुद्धस्फटिकसोज्वळें । एके इंद्रनीळसुनी। एक अंजनवर्णे सकाळें । रक्तवर्णे एकें ॥ ३४ ॥ एकें लसत्कांचनसम पिंवळीं । एकें नवजलदश्यामळीं । एके चांपेगौरी केवळीं । हरितें एकें ॥ ३५ ॥ एकें तप्तताम्रतांवडीं । एकं श्वेतचंद्र, चोखडीं । ऐसीं नानावर्णे रूपडीं । देखें माझीं ॥ ३६ ॥ हे जैसे कां आनान वर्ण । तैसें आकृतींही अनारिसेपण | लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसीं सुंदरें एकें ॥ ३७ ॥ एके अतिलावण्य साकारें । एकें स्निग्धवपु मनोहरें । शृंगारश्रियेची भांडारें । उघडिलीं जैसीं ॥ ३८ ॥ एके पीनावयव मांसाळें । एके शुष्के अतिविक्राळें । एक दीर्घकंठें विताळें । विकटें एकें ॥ ३९ ॥ एवं नानाविधाकृति । इया पाहतां पारु नाहीं सुभद्रापति । ययांच्या एकेकी आंगप्रांतीं । देख पां जग ॥ १४० ॥ केवळ तटस्थपणे सर्व मजा पाहणारी; १३० अशीं नानाप्रकारचीं असंख्य रूपें यांत आहेत. शिवाय, कांहीं दिव्य तेजाने तळपत आहेत, आणि त्यांचे प्रकाशाचे रंगही एकमेकांपासून निरनिराळे आहेत. ३१ कोणी जणूं काय तापलेलें चोख सोनेंच आहेत, कोणी अगदीं पिंगट आहेत, तर कोणी शेंदूरचर्चित आकाशासारखीं सर्वांगानें शोभत आहेत. ३२ सर्व ब्रह्मांड माणकांनी भूषवावें तशीं- कोणी स्वाभाविकच सुंदर आहेत, तर कोणी कुंकवाच्या रंगानें अरुणोदयाच्या प्रभेसारखीं चमकत आहेत. ३३ कोणी स्वच्छ स्फटिकासारखीं निर्मळ, कोणी इंद्रनीलमण्यासारखी निळीं, कोणी काजळासारखी काही कुट्ट, तर कोणी तांबडी लाल; ३४ कोणी लखलखीत सोन्यासारखी पिंवळीं, कोणी पावसाळी ढगांसारखी सांवळीं, कोणी सोनचाफ्याप्रमाणे गोरीं, तर कोणी नुसती हिरवीगार. ३५ कांहीं तापलेल्या तांब्याप्रमाणें तांबडी, कांहीं शुभ्र चंद्राप्रमाणे पांढरीफेक; अशीं नानारंगांचीं माझीं रूपें अवलोकन कर. ३६ हे वर्ण जसे निरनिराळे आहेत, तशा यांच्या आकृतीही भिन्न भिन्न आहेत. कांहीं इतकी सुंदर आहेत कीं, मदनानेही लाजून त्यांना शरण यावें. ३७ कांहींची ठेवणच फार सुबक आहे, कांहींचीं कान्तिमान् शरीरं अतिशय मनोहर आहेत, तर कांहीं रूपें म्हणजे जणूं काय शृंगारलक्ष्मीचीं खुलीं केलेलीं भांडारेंच भासतात ! ३८ कांहीं अवयवांनीं पुष्ट व मांसाल आहेत, तर कांहीं अगदीं लुकडीं आहेत. कांहीं अक्राळविक्राळ, कांहीं लांबमानी, कांहीं मोठ्या डोक्यांची, तर कांहीं विलक्षण बेडौल ! ३९ अर्जुना, अरे, या नानाप्रकारच्या आकृति पाहूं लागलों तर त्यांना अंतच नाहीं. आणि या आकृतींपैकीं प्रत्येक आकृतीच्या शरीरप्रदेशावर तुला सर्व जगत्र दिसून येईल. १४० १ तावलेले. २ नोख सोनं. ३ स्वभावतः ४ सुंदर, ५ मदन. ६ विशाळ मस्तकाची,