पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३५७ सोडिली । आणि स्थूळदृष्टीची जेवनिका फेडिली । किंबहुना उघडिली । योगऋद्धि ॥ २१ ॥ परि हा हैं देखेल की नाहीं । ऐसी सेचि न करी कांहीं । एकसरां म्हणतसे पाहीं । स्नेहातुर ॥ २२ ॥ श्रीभगवानुवाच - पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः । नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ ५॥ सम० - पाहें माझीं शतशर्ते रूपें पार्थ सहस्रशा। नाना प्रकारचीं दिव्यें जीं नानावर्ण आकृती ॥ ५ ॥ आर्या - माझी रूपें पाहा कौंतेया तूं सहस्रशा शतशा । नाना वर्ण जयांतहि प्रकार नानाहि आकृतीहि तशा ॥ ५ ॥ ओवी - देव म्हणे पार्था रूप पाहें । शतसहस्र अनुपम हैं । नानावणांची सोये । नानाकृती आसति ॥ ५ ॥ अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें । आणि तेंचि दावूं तरि काय दाविलें । आतां देखें आघवें भरिलें । माझ्याच रूपीं || २३ || एकें कुरों एकें स्थूळें । एकें हस् एकें विशाळें । पृथुतरें सरळें । अप्रांतें एकें ॥ २४ ॥ एके अनावरें प्रांजळें । सव्यापारें एक निवळें । उदासीनें स्नेहाळें । तीव्रं एके ॥ २५ ॥ एके घूर्णितं सावधें । अॅसलगें एकें अगाधें । एके उदारें अतिवद्धे । क्रुद्धे एकें ||२६|| एक शांत सैन्मदें । स्तब्धं एके सानंदें । गर्जितें निशब्दें । सौम्ये एकें ॥ २७ ॥ एकें साभिलायें विरक्तें । उन्निहितें एक निद्रिते । परितुष्टें एके आर्तें | प्रसन्ने एकें ॥ २८ ॥ एकें अशस्त्रे सशस्त्रें । एकें रौद्रे अतिमित्रें । भयानकें एकै विचित्रे । यस्यें एकें ।। २९ ।। एकै जनलीलाविलासें । एके पालनशीलें मायाहटीचा आडपडदा दूर सारला, किंबहुना त्यांनी आपले योगसर्वस्वच उघडें केलें. २१ परंतु, ह्या अर्जुनाला हें पाहण्याची योग्यता आहे कीं नाहीं यात्रा विचार करण्याची श्रीकृष्णांना आठवणच राहिली नाहीं. ते प्रेमानें उताविळ होऊन एकदम म्हणाले, "बरें, हें पहा विश्वरूप ! २२ श्रीकृष्ण म्हणाले, “ अर्जुना, तूं ' एकटें विश्वरूप दाखवा, ' असें म्हटलेंस; पण तेवढेच तुला दाखविलें तर त्यांत काय मोठेसें आहे ? आतां माझ्या विश्वरूपांत काय काय भरलें आहे, तेंच सर्व पहा. २३ यांत किती नानाप्रकारचे आकार व रूपं आहेत पहा. कांहीं किरकोळ, तर कांहीं लठ्ठ; कोणी आंखूड, तर कोणी लांबलचक; कांहीं पसरट, तर कांहीं सरळ, आणि कांहीं तर केवट अमर्याद. २४ कांहीं बेफाम, तर कांहीं गरीब; कित्येक चंचल तर कित्येक निश्चळ कोणी विरक्त, कोणी ममता, तर कोणी अत्यंत कडक; २५ कित्येक धुंद तर कित्येक सावध; कांहीं उथळ, कांहीं खोल; कांहीं उदार, कांहीं चिकट, तर कांहीं कोपि. २६ कोणी शांत, तर कोणी माजोरी; कोणी निर्विकार, तर कोणी आनंदितः कोणी गाजणारे, कोणी मौनी, तर कोणी मनमिळाऊः २७ कोणी आशाळभूत तर कोणी विषयी कोणी जागे, तर कोणी निजसुंर; कोणी संतुम, कोणी लोभट, तर कोणी समाधानीः २८ कोणी सशस्त्र, तर कोणी शस्त्ररहितः कोणी अतिभयंकर, तर कोणी अतिस्नेहाळ, कोणी भ्यासुर, कोणी विलक्षण, तर कोणी समाधिमग्न. २९ कोणी प्रजाजननाच्या कामांत गुंतलेली, कोणी प्रेमानं प्रजापालन करणारी, कोणी रागावेगाने प्रजासंहार करणारी, तर कोणी १ पडदा. २ योगबळ. ३ बेसावध, मूच्छित ४ उथळ, उघडी, ५ माजोरी. ६ समाधिस्थ.