पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी विश्वरूप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे | तरि आतीचे डोहळे | पुरवीं देवा ॥११॥ ऐसी ठायेंठावो विनंति । जंव करूं सरला सुभद्रापति । तंव तया पड्गुणचक्रवर्ती | साहवेचिना ॥ १२ ॥ तो कृपापीयूपसजछु । आणि येरु जवळां आला वर्षाकाछु । नाना श्रीकृष्ण कोकिळु | अर्जुन वसंतु ॥ १३ ॥ ना तरि चंद्रबिंब वाटोळें । देखोनि क्षीरसागर उचंबळे । तैसा दुहीवरी प्रेमवळें । उल्लसितु जाहला ॥ १४ ॥ मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें । गाजोनि म्हणितलें सकृपें । पार्था देख देख अमूपें । स्वरूपें माझीं ॥ १५ ॥ एक विश्वरूप देखावें । ऐसा मनोरथ केला पांडवें । कीं विश्वरूपमय आघवें । करूनि घातलें ॥ १६ ॥ वाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु । असे सहस्रवरी देतु । सर्वस्व आपुलें ॥ १७ ॥ अहो शेपाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागीं झकविले | लक्ष्मीयेही राहविलें । जिव्हार जें ॥ १८ ॥ तें आतां प्रगटुनि अनेकधा । करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा। बाप भाग्या अगाधा । पार्थाचिया ॥ १९ ॥ जो जागता स्वप्नावस्थे जाये । तो जेवीं स्वप्नींचं आघवें होये । तेविं अनंत ब्रह्मकटाह आहे । आपणचि जाहला ॥ १२० ॥ ते सहसा मुद्रा विश्वरूप पाहण्याचे या माझ्या डोळ्यांना सामर्थ्य आहे, असें तुम्हांला वाटत असेल, तर माझी हौस तुम्हीं पुरवावी. " ११ अशी रोखठोक साफासाफीची विनंति जेव्हां अर्जुनानं केली, तेव्हां त्या षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्णांना धीर धरवेच ना. १२ श्रीकृष्ण म्हणजे केवळ दयामृताचे ओथंबलेले मेघ आणि अर्जुन म्हणजे जसा काय जवळ येऊन ठेपलेला आगोडीचाच वेळ ! किंवा श्रीकृष्णांना कोकिळ म्हटलें, तर अर्जुन त्यांना वसंतकाळच होता ! १३ किंवा पूर्णिमेच्या चंद्राचें संपूर्ण वाटोळे बिंब पाहतांच क्षीरसागर जसा आवेशानें उचंबळून येतो, त्याप्रमाणें श्रीकृष्ण दुप्पटीपेक्षांही अधिक प्रेमभरानें उल्लासित झाले. १४ मग त्या चित्तप्रसन्नतेच्या उकळींत त्या दयामय श्रीकृष्णांनी गंभीर आवाजानें म्हटलें कीं, "अर्जुना, पहा, पहा माझीं असंख्य, अपार स्वरूपं ! " १५ श्रीकृष्णांचे केवळ एकटेंच विश्वरूप पहावें असा अर्जुनाचा मनोदय होता, पण श्रीकृष्णांनी सर्व विश्वच त्या विश्वरूपांत बिंबविले. १६ सामर्थ्यवान् देवाचं उदारपण केवळ अपरिमित आहे. कोणी आपल्या स्वेच्छेने मागण्यास मात्र सिद्ध झाला पाहिजे. मग तो त्या याचकाला त्याच्या मागणीच्या सहस्रपट असे आपले सर्वस्वच अर्पण करतो. १७ अहो, ज्या गुप्त रहस्याचें दर्शन शेषाच्या सहस्र डोळ्यांनाही होऊं दिलें नव्हतें, जं वेदांनीही प्रकट केलें नव्हतें, ज्याचा सुगावा लक्ष्मीलाही लागू दिला नव्हता, १८ तेंत्र रहस्य आतां नानाप्रकारी प्रकट करून, विश्वरूपदर्शनाचा खटाटोप त्या महाभाग्यवान् अर्जुनासाठी श्रीकृष्णांनी आज केला. १९ ज्याप्रमाणें जागणारा पुरुष स्वप्नावस्थेत गेला, म्हणजे स्वप्नांतलाच होऊन राहतो, तद्वत् ते श्रीकृष्ण स्वतांच अनंत ब्रह्मांडं होऊन राहिले आहेत. १२० त्यांनी आपले कृष्णरूप एकदम नाहींसें करून, १ रूप.