पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३५५ आपण ठावो दिधला गोपाळा । आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदीं चाड ॥ २ ॥ तो वना आला याचिलागीं । जे वैसावें पितयाचिया उत्संगी । कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं । श्लाघ्य केला ॥ ३ ॥ ऐसा वनवासियां सकळां । देता एकचि तूं धसाळा | पुत्र आळवितां अजामिळा । आंपणपें देसी ॥ ४ ॥ जेणें उरीं हाणितलासि पांपरां । तयाचा चरण वाहासी दातारा । अझुनी वैरियाचिया कलेवरा | विसंवसी ना ॥ ५॥ ऐसा अपकारियां तुझा उपकारु | तूं अपात्रीही परि उदारु । दे दान म्हणोनि दावठेकरू | जाहलासी वळीचा || ६ || तूंतें आराधी ना आयके । होती पुंस बोलवीत कौतुकें । तिये वैकुंठीं तुवां गणिके । सुरवाडु केला ॥ ७ ॥ ऐसीं पाहूनि वायाणीं मिलें । आपण देवों लागसी वानिवसें । तो तूं कां अनारसें । मजलागीं करिसी ॥ ८ ॥ हां गा दुभतयाचेनि पवाडें । जे जगाचें फेडी सांकडें । तिये कामधेनूचे पाडे । काय भुकेले ठाती ॥ ९ ॥ म्हणोनि मियां जें विनविलें कांहीं । तें देव न दाखविती हैं कीर नाहीं । परि देखावयालागीं देई । पात्रता मज ॥ ११० ॥ तुझें अहो गोपाळकृष्ण, तुम्हीं आपल्या आत्मस्वरूपांत मिळविलें. त्या उत्तानपादराजाच्या मुलाला काय ध्रुव ( अक्षय ) पदाची इच्छा होती ? २ तो जो वनांत आला तो इतक्याच हेतूनें कीं बापाच्या अंकावर बसण्याची योग्यता आपल्या अंगी यावी; पण तुम्हीं त्याला प्रत्यक्ष ध्रुवपद देऊन चंद्रसूर्यादिकांपेक्षाही श्रेष्ठ करून ठेवलें ! ३ अशा प्रकारें दुःखग्रस्तांना मागचा पुढचा विचार न करितां कृपादान उदारपणे देणारे तुम्हींच एकटे आहां. अहो, नारायण नांवानें मुलाला ममतेनें हांक मारणाऱ्या अजामिळालाही, त्या नुसत्या नामोच्चारासाठींच, त्याचें पापी चरित्र लक्षांत न घेतां, तुम्ही मुक्तिपद देतां झालां. ४ ज्या भृगुऋषीनें तुमच्या छातीत लाथ मारली, त्याच्या लाथेचें चिह्न तुम्हीं अजूनही भूषणासारखें मिरवितां, आणि तुमचा शत्रु शंखासुर त्याचें शरीर जो शंख त्याला अद्याप तुम्ही आपल्या हातांत मोठ्या आदराने धारण करतां. ५ याप्रमाणें तुम्ही अपकारकर्त्यावरही उपकार करतो. अयोग्यालाही औदार्य दाखवितां. बळिराजाजवळ दान मागून अखेर उलट त्याचेच द्वारपाळ झालां. ६ जी वेश्या तुमची भक्ति करीत नसे, नांवही ऐकत नसे, पण नुसत्या करमणुकीसाठी पोपटाला 'राम राम' म्हणण्यास शिकवत असे, तिला त्या नामोच्चारानिमित्त तुम्हीं वैकुंठांत सुखाचा सुकाळ दिलात. ७ अशी खोटींच निमित्तें शोधून काढून, तुम्ही स्वेच्छेने बळेंच मुक्तिपदाचे दान पुष्कळांच्या पदरीं बांधतां; मग तेच तुम्ही माझ्या संबंधें हा आपला उदारपणा सोडून निराळें वर्तन कसे कराल ? ८ अहो, जी कामधेनु आपल्या दुभत्याच्या प्रभावाने सर्व जगाचें संकट वारिते, तिचे स्वतांचेच पाडे कधीं भुकेनें गांजलेले राहतील काय ? ९ म्हणून, मी जें ' दाखवा' अशी विनंति केली आहे, तें, देवा, आपण मला दाखवाल यांत शंकाच नाहीं; पण तें पाहण्याची पात्रता मात्र माझ्या अंगीं प्रथम आणा. ११० तुमचें १ दुःखग्रस्तांना २ मुक्तिपद. ३ लाथा. ४ शरीराला, शंखाला, ५ द्वारपाळ, ६ पोपट ७ व्यर्थ. ८ स्वेच्छेनें,