पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जेविं माउली | वाळकाची जाणे ।। ९२ ।। तयापरी श्रीजनार्दना । विचारिजो माझी संभावना । मग विश्वरूपदर्शना । उपक्रम कीजे ॥ ९३ ॥ तरि ऐसी ते कृपा करा । ए-हवीं नव्हे हें म्हणा अवधारा । वायां पंचमालापें बधिरा । सुख केउतें देणें ॥ ९४ ॥ एन्हवीं येकले वापियाचे तृपे । मेघ जगापुरतें काय न वर्खे | परी जहालीही वृष्टि उपखे । जन्ही खडकीं होय ॥ ९५ ॥ चकोरा चंद्रामृत फावलें । येरां आण वाहूनि काय वारिलें । परी डोळ्यांवीण पाहलें । वायां जाय ॥ ९६ ॥ म्हणोनि विश्वरूप तूं सहसा । दाविसी कीर हा भरवसा । कां जे केडाडां आणि गहिंसां । माजीं नित्य नवा तूं कीं ॥ ९७ ॥ तुझें औदार्य जाणों स्वतंत्र । देतां न म्हणसी पात्रापात्र । पैं कैवल्य ऐसें पवित्र | जें वैरियांही दिधलें ॥ ९८ ॥ मोक्षु दुराराध्य कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय । म्हणोनि धाडिसी तेथ जाय । पाईक । जैसा ॥ ९९ ॥ तुवां सनकादिकांचेनि मानें। सायुज्यीं सौरेंसु दिधला पूतने । जे विषाचेनि स्तनपानें । मारूं आली ॥ १०० ॥ हां गा राजसूय यागाचिया सभासदीं | देखतां त्रिभुवनाची मदी । कैसा शतधा दुर्वाक्य- शब्द | निस्तेजिलासी ॥ १ ॥ ऐशिया अपराधिया शिशुपाळा । । राखतांच येत नाहीं. म्हणून, आपल्या लहान बाळाची योग्यता काय आहे हें जसें आई जाणंत ९१, ९२ त्याप्रमाणे, हे जगदीशा, तुम्हीच माझ्या योग्यतेचा विचार करा आणि मग मला विश्वरूपदर्शन घडविण्याला आरंभ करा. ९३ देवा, एवढी तुम्हीं कृपा करावीच. नाहीं तर, हें घडणार नाहीं, म्हणून तरी सांगा. बहियापुढें उगीच गाण्याचे पंचमालाप काढले, तर त्यापासून त्याला काय सुख होईल बरें ? ९४ अहो, एकट्या चातकाची तहान भागविण्याचे मिषानें, मेघ सर्व जगाला पुरेल इतका जळवर्षाव करतोच कीं नाहीं ? परंतु, जर हा वर्षाव खडकावर झाला तर तो फुकटच गेला. ९५ चंद्र चकोरालाच तेवढे चांदणे वाढतो, आणि इतरांना टाळा देतो, असें नाहीं, पण डोळेच जर नसतील, तर तो चंद्रप्रकाश व्यर्थच होय. ९६ म्हणून तुम्हीं आपलें विश्वरूप मला दाखवाल, असा माझ्या मनाचा पूर्ण विश्वास आहे; कारण जाणत्यानेणत्या अशा सर्वानाच तुमचें स्वरूप नेहमींच अद्भुत - अलौकिक आहे. ९७ तुमचें उदारपण अगदीं निराळें, स्वयंसिद्ध, व अनिर्बंध आहे. तुम्हीं देऊ लागलां म्हणजे योग्यायोग्याचा विचारही करीत नाहीं. अहो, मोक्षासारखी पवित्र वस्तू तुम्हीं आपल्या कट्टया शत्रूंनाही देऊन टाकली आहे. ९८ मोक्ष खरोखर मिळण्याला किती कठिण आहे बरें ? पण तोही तुमच्या चरणी लागतो, म्हणून तर तो तुम्हीं धाडाल तिकडे निमूट चालता होतो ! ९९ तुम्हांला विषारी दूध पाजून मारण्यास आलेल्या पूतना असुरीलाही सनकादि सनत्कुमारांप्रमाणेच सायुज्यमुक्तीची गोडी तुम्हीं चाखविली. १०० अहो, त्या आमच्या राजसूय यज्ञांत, त्रिभुवनांतील सभासद मंडळासमक्ष ज्यानें शेंकडों प्रकारचीं दुष्ट वचनें बोलून तुमचा पाणउतारा केला, १ अशा महादुष्ट अपराधी शिशुपाळालाही, १ ज्ञास्यांना २ अज्ञांना ३ दास. ४ आनंद, गोडी. ५ गर्दी.