पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावां ३५३ घेवोंघेवों येसी ॥ ८३ ॥ पैं जळायनाचिया अवगणिया । कां मत्स्य कूर्म इया मिरवणिया । खेळु सरलिया तूं गुणिया । सांठविसी जेथ ॥ ८४ ॥ उपनिषदें जें गाती । योगिये हृदयीं रिगोनि पाहाती । जयातें सनकादिक आहाती | पोटाळुनियां ॥ ८५ ॥ ऐसें अगाध जें तुझें । विश्वरूप कानीं ऐकिजे । तें देखावया चित माझें । उतावीळ देवा ।। ८६ ।। देवें फेडूनियां सांकड । लोभें पुसिली जरी चाड । तरि हेचि एकी वाड । आर्ती जी मज ॥ ८७ ॥ तुझें विश्वरूप आघवें । माझिये दिठीसि गोचर होआवें । ऐशी थोर आस जीवें । बांधोनि आहें ॥ ८८ ॥ मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो । योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् ॥ ४ ॥ सम० - पाहावें म्यां जरि असें समर्था मानिसी तरी । अव्यया आपणातें तूं दाव योगेश्वरा मज ॥ ४ ॥ आर्या- योग्य असें कीं तुज मी पहावयाला मनांत भावावें । मग योगेशा मजला अव्यय ईशस्वरूप दावावें ॥ ४ ॥ ओवी - जरी मज दाखवू येईल । पहावें ऐसें असेल । तरी तें अपूर्व नवल । दाखवीं अव्यय रूप तुझें ॥ ४ ॥ परि आणीक एक एथ शाङ्गी । तुज विश्वरूपा देखावयालागीं । पैं योग्यता माझिया आंगीं । असे कीं नाहीं ॥ ८९ ॥ हें आपलें आपण मी । तें कां नेणसी जरी देव म्हणे | तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचें ॥ ९० ॥ आणि जी आतचेनि पडिभरें । आर्तु आपुली टाकी पैं विसरे । जैसा तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज ॥ ९९ ॥ ऐशा सचाडपणाचिये भुली | न सांभाळवे समस्या आपुली । यालागीं योग्यता देवांची संकटें वारण्याकरितां द्विभुज, चतुर्भुज, इत्यादि नाना प्रकारची रूपें तुम्हीं धारण करतां. ८३ पण जळशयनाच्या निमित्ताचें किंवा मत्स्य, कूर्म, इत्यादि रूपाने फिरण्याचे नाटक संपलें म्हणजे तुमचें सगुणपण ज्या ठिकाणी लीन होतें, ८४ उपनिषदें ज्याला गातात, योगी दृष्टीला अंतर्मुख करून ज्याला पाहतात, आणि सनकादिक भक्त ज्याला कंटाळून राहतात, ८५ असें जें तुमचें अनंत विश्वस्वरूप कानांनी ऐकतो, तेंच एकदां डोळ्यांनीं पाहण्याला, हे प्रभो, माझें मन फार उतावीळ झालें आहे. ८६ देवा, आपण माझें संकट दूर करून मोठ्या प्रेमानें आतांपर्यंत माझी प्रत्येक हौस पुरी केली, तर आतां ही एकच हौस माझ्या मनाची राहिली आहे. ८७ तुमच्या विश्वरूपाचें दर्शन माझ्या या डोळ्यांना घडावें, अशी मोठी उत्कंठा धरून मी राहिलों आहें. ८८ परंतु, हे नारायणा, या विषयांत एक शंका आहे. तुमच्या विश्वरूपाचें दर्शन घेण्याला माझ्यां अंगीं पात्रता आहे कीं नाहीं, हे माझे मलाच कळत नाहीं. ' तें कळत नाहीं कां ? ' म्हणून जर, 'देवा, आपण विचारलें, तर मी विचारतों, कीं, रोगी कधीं आपल्या रोगाचे स्वतांच निदान करतो का ? ८९, ९० आणि माझ्या या इच्छेच्या उत्सुकतेचा जोर एवढा आहे, कीं, त्या इच्छेला पुरेशी माझी योग्यता आहे कीं नाहीं, हेंही मी विसरतों. ज्याप्रमाणे एखाद्या तान्हेलेल्यापुढे समुद्रच ठेवावा, पण तो 'पुरे' कांहीं म्हणत नाहीं, त्याप्रमाणें या प्रबळ इच्छेच्या भुलावणीनं मला आपला तोल १ अंगीकार करण्याचा. ४५