पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी या सापाचे वेढे । जैसें चंदना खेंव देणें घडे । अथवा विवेसी पळे मग चढे । निधान हाता ॥ ७५ ॥ तैसी प्रकृति है आड होती । ते देवेंचि सारोनि परौती । मग परतत्त्व माझिये मती | शेजार केलें ॥ ७६ ॥ म्हणोनि इयेविषयींचा मज देवा | भरंवसा कीर जाहला जीवा । परि आणीक एक हेai | उपनला असे ॥ ७७ ॥ तो भिड जरी म्हणों राहों । तरी आना कवणा पुसों जावों । काय तुजवांचोनि ठावो । जाणत आहों आम्ही ॥ ८८ ॥ जळचरु जळाचा औभारु धैरी । वाळक स्तनपानी उपरोधु करी । तरी तया जिणया श्रीहरी । आन उपाय असे ॥ ७९ ॥ म्हणोनि भीडसांकडी न धरवे । जीवा आवडे तेंही तुजपुढां बोलावें । तंव राहें म्हणितलें देवें । चाड सांगें ॥ ८० ॥ एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्वर । द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥ ३ ॥ सम० – बोलसी आपणातें हें असेंच परमेश्वरा । विश्वरूप तुझें पाहों इच्छितों पुरुषोत्तमा ॥ ३ ॥ आर्या - यापरि बोलसि जैसे इच्छितसे पाहयासि रूप तसें । पाहों इच्छितसें मी तूझें दृश्य स्वरूप अद्भुत ॥ ३ ॥ ओवी - परम ऐश्वर्य सांगितलें । तें उत्तम म्यां आइकलें । आतां मन उपजलें । जें पाहावें रूप तुझें ॥ ३ ॥ मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्हीं केली जे गोठी । तिया प्रतीतीची दिठी । निवाली माझी ॥ ८१ ॥ आतां जयाचेनि संकल्पें । हे लोकपरंपरा होय हारपे । जया ठायातें आपणपें । मी ऐसें म्हणसी ॥ ८२ ॥ तें मुद्दल रूप तुझें । जेथूनि इयें द्विभुजें हन चतुर्भुजें । सुरकार्याचेनि व्याजें चंदनाच्या झाडाला वेंटोळें घालून बसलेल्या सापाचे वेढे सोडवून काढले म्हणजे चंदनाची टभेट व्हावी, किंवा पिशाच पळून गेलें म्हणजे जमिनींत पुरलेला द्रव्याचा ठेवा हातीं यावा, ७५ त्याप्रमाणें आडवी असलेली ही माया देवांनीं बाजूला सारून, माझी मति तत्त्वनिष्ठ केली आहे. ७६ म्हणून, देवा, या विषयांत माझ्या मनाची आतां पक्की खात्री झाली आहे, पण मनाला आतां एक नवीच हुक्की आली आहे. ७७ आतां संकोचामुळे तिचा उल्लेख तुमच्याजवळ करूं नये, तर मग आम्ही दुसन्या कोणाला विचारायला जावें ? तुम्हावांचून आम्हांला दुसऱ्या कोणाचा आश्रय आहे ? ७८ पाण्यांत राहणाऱ्या प्राण्याने जर पाण्याला त्रास देण्याचा संकोच धरला, किंवा बाळकानें जर स्तनपानाची याचना भिडेनें केली नाहीं, तर त्यांना वांचण्याचा दुसरा कांहीं मार्ग आहे का ? ७९ म्हणून आतां आम्हांला कांहींही भीडभाड धरतां येत नाहीं. जें मनांत येईल, तेंच तुम्हांला उघड उघड सांगितलें पाहिजे. " तेव्हां श्रीकृष्ण मध्येच म्हणाले, “अर्जुना, आतां हा विस्तार पुरे. तुझी आवड काय आहे, तें सांग पाहूं " ८० मग अर्जुन म्हणाला, “देवा, तुम्हीं जो ज्ञानोपदेश केलात, त्याने मला अनुभवाचें समाधान लाभले आहे. ८१ आतां ज्याच्या आद्य संकल्पाने हे विश्व निर्माण होतें व यथाकाल लयालाही जातं, ज्याला तुम्हीं स्यतः 'मी' असें म्हणतां ८२ तें तुमचें मूळचें स्वरूप ज्या मूळस्वरूपापासून १ भूत, पिशाच, २ शय्यागार, सेजघर ३ हुक्की. ४ आश्रय घेण्याला संकोच करील. ५ भीड.