पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० सार्थ श्रीज्ञानेश्वरी आहाती ।। ९६ ।। वळें प्रौढी पौरुपें । जे भीमार्जुनासारिखे । ते सांगेन कौतुकें । प्रसंगेंचि ॥ ९७ ॥ एथ युयुधानु सुभटु | आला असे विराटु | महारथी श्रेष्ठु । द्रुपदु वीरु ।। ९८ । धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् । पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः ॥ ५ ॥ युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् । सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ ६ ॥ सम० — धृष्टकेतु चेकितान काशिराजा पराक्रमी । पुरुजित्कुंतिभोजाख्य शैब्याख्य पुरुषर्षभ ॥ ५ ॥ महावीर युधामन्यु उत्तमौजा पराक्रमी । अभिमन्यु द्रौपदीचे पुत्र सर्व महारथी ॥ ६ ॥ आर्या- तो धृष्टकेतु आहे काशीश्वर आणि चेकितान असे । दिसती वीर पहा हे पुरुजित्सह शैब्य कुंतिभोज असे ५ अतिवीर्य उत्तमौजा विक्रमशाली तसा युद्धामन्यू । सर्वहिं महारथी ते पांचाळीचे कुमार अभिमन्यू ॥ ६ ओव्या - धृष्टकेतु चेकितान । काशिराज वीर्यवान । पुरुजित् अतितीक्ष्ण । कौंति शैव्य नराधिप ॥ ५ ॥ युधामन्यु पराक्रमी बहुत । उत्तमौजा वीर्यवंत। सौभद्र आणि द्रौपदीचे सुत | हे सर्वही महारथी ॥६॥ 1 1 चेकितान धृष्टकेतु । काशिराज वीर विक्रांतु । उत्तमौजा नृपनाथु । शैव्य देख ॥ ९९ ॥ हा कुंतिभोज पाहें । एथ युधामन्यु आला आहे । आणि पुरुजितादि राय है । सकळ देख ॥ १००॥ हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवा अर्जुनु । तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु | देखें द्रोणा ॥ १ ॥ आणी कही द्रौपदी- कुमरु | हे सकळही महारथी वीरु । मिती नेणिजे अपारु | मीनले असती ॥२॥ अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ ७ ॥ भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः । अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ ८ ॥ सम० - आमचे थोर जे त्यांत आईक ब्राह्मणोत्तमा । सैन्याचे जे धनी माझ्या त्यांतें संज्ञार्थ सांगतों ॥ ७ ॥ तूं भीष्म आणखी कर्ण कृप जो विजयी रणीं । अश्वत्थामा विकर्णाख्य तोही भूरिश्रवा तसा ॥ ८ ॥ आर्या - ऐकावें द्विजवर्या नायक माझ्या विशिष्ट सैन्यातें । संज्ञार्थच मी वदतों जाणावें लोकमान्य मान्यातें ॥७ एक तुम्ही आणि भीष्म प्रौढ कृपाचार्य आणि हा कर्ण। तो सौमदत्ति आणिक अश्वत्थामा गुणाकर विकर्ण ८ ओव्या-आम्हांमध्ये जे विशिष्ट । ते तूं ऐक गा द्विजश्रेष्ठ । माझिया सैन्यांत सुभट । ते तुजलागीं सांगतों ॥७॥ तूं आणि भीष्म कर्ण । कृपाचार्य नीति संपूर्ण । अश्वत्थामा विकर्ण । सोमदत्ती ऐसे हे ॥ ८ ॥ आतां आमुच्या दळीं नायक । जे रूढवीर सैनिक । ते प्रसंगें आइक । सांगिजती ॥ ३ ॥ उद्देशें एक दोनी । जाइजती बोलोनी । तुम्ही आदि- धर्मांतही पुरे आहेत, ९६ जे बळांत, अभिमानांत, व पराक्रमांत अगदीं भीमार्जुनाच्या तोलाचे आहेत, त्यांची नांवें आतां प्रसंग आला आहे म्हणून, सहज सांगतों. ९७ या सैन्यांत महायोद्धा युयुधान व विराट, आणि महारथी वीरश्रेष्ठ द्रुपदही आला आहे. ९८ चेकितान, धृष्टकेतु, पराक्रमी वीर काशिराज, उत्तमौजा, नृपश्रेष्ठ शैव्य, हेही येथे आहेत पहा. ९९ तसाच हा पहा येथे कुंतिभोज, येथे गुधामन्यु, आणि हे इकडे पुरुजितादि इतर राजे.” १०० दुर्योधन द्रोणास सांगतो, " हा पहा सुभद्रेच्या अन्तःकरणाला आनंद देणारा व दुसरा तरुण अर्जुनच असा भासणारा अभिमन्यु. १ याशिवाय हे द्रौपदीचे पुत्र व इतर सारे वीर महारथी येथे इतके जमले आहेत, कीं, त्यांच्या गणतीला पारच नाहीं. २ आतां आमच्या सेनेतील पुढारी व घटलेले- दृढावलेले-शूर वीर यांचीही नांवें प्रसंगपरत्वें सांगतों, तीं ऐका. ३ तुमच्यासारखे जे जे पहिल्या प्रतीचे मुख्य वीर आहेत त्या एक दोघांचा केवळ १ मुरलेले, अनुभविक, रुळलेले, घटलेले,