पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३५१ दातारा । ये पेये रिघोनि गाभारां । घेत आहें चारा । ब्रह्मरसाचा ॥ ६७ ॥ तेणें माझा जी मोह जाये । एथ विस्मो कांहीं आहे । तरी उरलों कीं तुझे पाये । शिवतले आहाती ॥ ६८ ॥ भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया । त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥ २ ॥ सम० - सृष्टिसंहार भूतांचे विस्तार तुजपासुनी । ऐकिलें पद्मपत्राक्ष दिव्य माहात्म्य हैं तुझें ॥ २ ॥ आर्या- उद्भवलय भूतांचे अध्यय-माहात्म्यही सुराध्यक्षा । हे दोन्ही ऐकियले तुजपासुनि विस्तरेंच कमलाक्षा ॥ २ ॥ ओंवी—भूतांची उत्पत्ति प्रलयो । तो तुम्हांपासोनि ऐकिला अनुभवो । तूं कमलपत्राक्ष देवो । माहात्म्य आइकिलें तुझें २ 1 पैं कमलायतनडोळसा । सूर्यकोटितेजसा । मियां तुजपासोनि महेशा । परिसिलें आजी ॥ ६९ ॥ इयें भूतें जयापरी होती । अथवा लया न जैसेनि जाती । ते मजपुढां प्रकृति । विवंचिली देवें ॥ ७० ॥ आणि प्रकृति कीर उगाणा दिधला । र पुरुषाचाही ठावो दाविला । जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौतो वेदु ॥ ७१ ॥ जी शब्दराशी वाढे जिये । कां धर्माऐशिया रत्ना विये । ते एथींचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणोनि ॥७२॥ ऐसें अगाध माहात्म्य । जें सकळमार्गेकगम्य । जें स्वात्मानुभवरम्य । तें इयापरी दाविलें ॥ ७३ ॥ जैसा के फिटलिया आभाळीं । दिठी रिंगे सूर्यमंडळीं । कां हातें सारूनि वाबुळी | जळ देखिजे ॥७४॥ ना तरि उकलतेयां भृगजळाची कथा काय आहे ? ६५, ६६ आणि माझ्याविषयीं म्हणाल तर मी तुमच्या कृपाप्रसादाच्या प्रत्यक्ष गाभाऱ्यांतच शिरून ब्रह्मरसावर खुशाल चरत आहे ! ६७ मग त्याने माझा मोह नम्र झाला, तर त्यांत आश्चर्य तें कसलें ? देवा, तुमच्या चरणांच्या स्पर्शानें आज आमचा खरोखरच उद्धार झाला. ६८ कमलासारखे विशाळ डोळे ज्याचे आहेत आणि कोटिसूर्याचें तेज ज्याचे अंगी आहे अशा परमेश्वरा, मी आज तुम्हांपासून ज्ञानबोध ऐकिला ६९ हें भूतमात्र जिच्यापासून उत्पन्न होतें व लयाला जाते, त्या मायेचे स्वरूप तुम्हीं मला स्पष्ट करून सांगितलें. ७० आणि मग मायेला झाडून तुम्हीं मला परब्रह्माचें स्थान दाखविलेत, ज्या परब्रह्माचें गौरव अंगावर पांघरून वेद जगांत मिरवीत असतात. ७१ आणि हा जो वाङ्मयाचा सागर वाढत आहे, व टिकून राहात आहे, आणि धर्मसिद्धांतांचीं रत्नमोत्यें उत्पन्न करीत आहे, तोही या परमात्म्याचा तेजाच्या लाभाचाच परिणाम होय. ७२ अशा प्रकारचें जें सर्व साधनमार्गाचं एकच ध्येय, आणि ज्याची गोडी आत्मानुभवानेंच केवळ कळणारी आहे, असें में परमात्म्याचें अनंत व अपार माहात्म्य, तें तुम्हीं मला स्पष्ट करून दाखविले. ७३ ज्याप्रमाणें आकाशांतलीं ढगांची जळमटें झाडून गेलीं म्हणजे सूर्यबिंबाचें दर्शन व्हावं, किंवा पृष्ठभागावरची शेवाळ हातानें दूर सारली म्हणजे पाणी दृष्टीस पडावें, ७४ किंवा १ वस्त्रयुक्त. २ आश्रय करिते. ३ ढग. ४ शेवाळ.