पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५० सार्थ श्रीज्ञानेश्वरी जगचि आघवें बुडावें । वरि आकाशही तुटोनि पडावें । परि झुंजणें न घडावें । गोत्रजेंशीं मज ॥ ५७ ॥ ऐसिया अहंकाराचिये वोढी । मियां आग्रहजळीं दिली होती बुडी | चांगचि तूं जवळां एन्हवीं काढी । कवणु मातें ॥ ५८ ॥ नाथिलें आपणपां एक मानिलें । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें । थोर पिसें होतें लागलें । परि राखिलें तुम्हीं ॥ ५९ ॥ मागां जळत काढिलें जोहरीं । तैं तें देहासी भय अवधारीं । आतां हे जोहरवाहर दूसरी । चैतन्यासकट ॥ ६० ॥ दुराग्रह हिरण्यार्थे । माझी बुद्धि वसुंधरा सूली काखे । मग मोहार्णव वा । रिघोनि ठेला ॥ ६१ ॥ तेथ तुझेनि गोसावीपणें । एकवेळ बुद्धीचें या ठाया येणें । हें दुसरें वराह होणें । पडिलें तुज ॥ ६२ ॥ ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी वोलें । परि पांचही पालव मोर्केलिले । मजप्रती ॥ ६३ ॥ तें कांहीं न वचेचि वायां । भलें यश फावले देवराया | जे साद्यंत माया । निरसिली माझी | ६४ || आजी आनंदसरोवरांची कमळें । तैसे हे तुझे डोळे । आपुलिया प्रसादाचीं राउळें । जयालागीं करिती ॥ ६५ ॥ हां हो तयाही आणि मोहाची भेटी । हे कायसी पॉवळी गोठी । केउती मृगजळाची वृष्टि । वडवानळेंसीं ॥ ६६ ॥ आणि मी तंव एकमेकांत मिसळून उसळोत, ५६ हें सारे जगच प्रळयजळांत बुझ्न जावो, किंवा हे आभाळही तुटून खालीं पडो, परंतु या आपल्या कुटुंबीयांबरोबर युद्ध म्हणून करावयाचंच नाहीं, ५७ प्रकारच्या अहंमन्यतेच्या तोऱ्याने मी आग्रहाच्या डोहांत बुडालोंच होतों, आणि तुमच्यासारखा समर्थ गडी जवळ नसता तर मला कोणी बरें बाहेर काढून बचाविलें असतें ? ५८ जे मूळांतच नव्हतें, तें बळेंच 'आहे' असें मी मानिल; जें नाहीं, त्यालाच गोत्र हें नांव दिलें. असें मला विलक्षण भ्रमाचे वेड लागलें होतें. परंतु तुम्हीं माझें रक्षण केलें. ५९ मागें तुम्हीं आम्हांला जळत्या लाक्षागृहांतून बाहेर सुखरूप काढले; परंतु त्या वेळीं आमच्या केवळ शरीरालाच भय होतें. परंतु या दुसऱ्या भ्रमाच्या अग्निपीडेंत आमच्या चैतन्याला आत्म्यालाही भय होते. ६० हिरण्याक्ष असुरानें जशी पृथ्वी खाकोटीस मारली, त्याप्रमाणें दुराग्रहानं माझी बुद्धि आपल्या खाकेंत घातली, आणि मग दुराग्रहाने बुद्धि उपटल्यामुळे जे भगदाड पडले, त्यांतून मोहाचा समुद्र आंत लोटून तुडुंब भरून राहिला. ६१ अशा कठीण प्रसंगी तुमच्या सामर्थ्यानें बुद्धि पुन्हां एकदां पूर्ण ठायीं आली. हा तुम्हांला दुसरा वराह अवतारच घ्यावा लागला ! ६२ तुमची कृति अशी अमर्याद आहे, तेव्हां मी या एका जिव्हनें तिचं किती वर्णन करावें ? पण एवढं खरें कीं, तुम्ही माझे पंचप्राणच आज मला परत आणून दिलेत. ६३ महाराज, इतकें पुण्यकृत्य कधीं फुकट जाईल का ? तुम्हांला, देवा, उत्तम यशःप्राप्ति घडली आहे, कारण तुम्हीं माझी माया समूळ झाडून टाकिली आहे. ६४ देवा, आनंदसरोवरांतल्या कमळासारखे हे जे तुमचे डोळे, ते ज्याला आपल्या प्रसादाचें स्थान करतात, त्या जीवाची आणि मोहाची गांठ पडेल, ही किती वेडगळ कल्पना आहे ! अहो वडवानळापुढें अशा १ आगीचा उपद्रव बाहर - पीडा, २ घातली. ३ भगदाडांतून. ४ सामर्थ्यानें. ५ कृति. ६ पंचप्राणच दिले. ७ वेडगल,