पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३४९ केली ॥ ४६ ॥ तें तुम्हीं आजि आपुलें । मजपुढां 'हियें फोडिलें । जया अध्यात्मा वोंवाळिलें । ऐश्वर्य हेरें ॥ ४७ ॥ ते वस्तु मज स्वामी । एकिहेळां दिधली तुम्हीं । हें वोलों तरि आम्ही । तुज पासोनि भिन्न कैचे ॥ ४८ ॥ परि साचाच महामोहाचिये पुरी । बुडालेया देखोनि सीसवरी । तुवां आपणपें घोलोनि श्रीहरी । मग काढिलें मातें || ४९ || एक तूंवाचूनि कांहीं । विश्वीं दुजियाची भाप नाहीं । कीं आमुचें कर्म पाहीं । जे आम्ही आथी म्हणीं ॥५०॥ मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहे अभिमानु । आणि कौरवांतें इया स्वजनु । आपुले म्हणें ॥ ५१ ॥ याहीवरी यांतें मी मारीन । म्हणें तेणें पापें कें रिगेन । ऐसें देखत होतों दुःस्वप्न । तों चेवविला प्रभु ॥ ५२ ॥ देवा गंधर्वनगरा वस्ती । सोडुनि निघालों लक्ष्मीपती । होतों उदकाचिया आत । रोहिणी पीत ॥ ५३ ॥ जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें । ऐसें वायां मरतया जीवाचें श्रेय तुवां घेतलें ॥ ५४ ॥ आपुलें प्रतिबिंब नेणतां । सिंह कुहां घालील देखों आतां । ऐसा धरिजे तेविं अनंता । राखिलें मातें ॥। ५५ || एहवीं माझा तरी येतुलेवरी । एथ निश्चय होता अवधारीं । जे आतांचि सातांही सागरीं । एकत्र मिळिजे ॥ ५६ ॥ हें वेदांनाही मागमूस लागला नाहीं; ४६ तेंच आपल्या हृदयींचं रहस्य तुम्हीं आज माझ्यापुढें उघडें केलें आहे. ज्या अध्यात्मरहस्यावरून सर्व ऐश्वर्य केवळ ओंवाळून श्रीशंकरांनीं टाकून दिलें, ४७ महाराज, तेंच रहस्य तुम्हीं मला आज एकदम दिलें. परंतु जर आम्हीं या गोष्टीचा उल्लेख केला, तर मग आम्ही तुमच्या व्यापक स्वरूपाला पावलों ते कसले ? ४८ परंतु महामायेच्या अपरंपार लोंढ्यांत मला डोक्यापर्यंत बुडालेला पाहून, श्रीकृष्णा, तुम्हीं स्वतःच उडी घालून त्या पुरांतून बाहेर काढलें आहे. ४९ आतां एका तुम्हांवाचून या विश्वांत दुसरी गोष्टच राहिली नाहीं; पण आमचें दैव असें खडतर आहे, कीं, "आम्हीं म्हणून कोणी तरी वेगळे आहों " अशी भाषा अजून आमच्या तोंडाला येते ! ५० 'या जगांत मी एक अर्जुन नांवाचा पुरुष आहे,' असा देहाभिमान अद्याप मला चिकटून होता, आणि या कौरवांना अजूनही मी 'स्वजन' म्हणत होतों. ५१ इतकेंच नव्हे, तर, 'मी यांना मारीन, आणि तसे केल्यानें मी पापानं लडबडेन,' असें दुष्ट स्वप्न मला पडत होते. इतक्यांत तुम्हीं मला जागे केलें. ५२ देवा, लक्ष्मीनाथा, खरी वस्ती सोडून मी खोट्या गंधर्वनगरीतच शिरत होतों, पाण्याच्या हांवेनें मृगजळ पीत होतों; ५३ अहो कापडाचा साप खोटा खरा, पण तोच आपल्यास चावला आहे, अशा खोट्याच भावनेनें खन्यखन्यच विषाच्या लहरी येऊन हा जीव फुकट मरत होता, पण त्याला वाचवण्याचे श्रेय तुम्हीं मिळविले. ५४ आपलेच प्रतिबिंब विहिरीच्या पाण्यांत पाहून, हा दुसराच कोणी प्रतिस्पर्धी सिंह आहे, अशा भ्रमानें कोणीएक सिंह आतां विहिरीत उडी घालणार, तोच त्याला धरून आत्मघातापासून वांचवायें, तसे, देवा, तुम्हीं मला आज वांचविले. ५५ नाहीं तर, देवा, मी तर असा अगदीं पुरापुरा एक निश्चय केला होता, कीं, हे साती समुद्र आजच १ हृदय, अंतःकरण. २ श्रीशंकराने ३ मस्तकापर्यंत ४ उडी घालून ५ शिरलों. ६ विहिरींत.