पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी उत्तरांसवें । दावी विश्वरूप आघवें । झाडा देउनी ॥ ३९ ॥ अहो वांसरूं देख लियाचिसाठीं । धेनु खडवडोनि मोहं उठी । मग स्तनामुखाचिये भेटी | काय पान्हा धरे ॥ ४० ॥ पाहा पां तया पांडवांचेनि नांवें । जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धांवे । तयातें अर्जुनें जंव पुसावें । तंव साहील काई ॥ ४१ ॥ तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण । आणि येरू स्नेहा घातलें आहे मोजवण । ऐसिये मिळवणी वेगळेपण | उरे हेंचि बहु ॥ ४२ ॥ म्हणोनि अर्जुनाचिया बोलासरिसा | देव विश्वरूप होईल आपेसा । तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजे तरी ॥ ४३ ॥ अर्जुन उवाच - मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् । यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥ १ ॥ सम० - अनुग्रहार्थ जे माझ्या गुह्य अध्यात्म केवळ । तुवां बोलिलें तेणें माझा हा मोह नासला ॥ १ ॥ आर्या - अध्यात्म गुह्य उत्तम जें वचन अनुग्रहार्थ मज कथिलें । तेणें मोह निमाला ज्ञानामृत हैं स्वयेंचि त्वां मथिलें ॥ १ ॥ ओवी - अर्जुन म्हणे चक्रपाणी । अध्यात्म निरूपिलें कृपेंकरूनी । जें बोलिलेति तुम्ही आपुल्या वचनीं । तेणें मोह गेला माझा १ मग पार्थ देवातें म्हणे । जी तुम्हीं मजकारणें । वाच्य केलें जें न बोलणें | कृपानिधे ॥ ४४ ॥ जें महाभूतें ब्रह्मीं आटती । जीवमहदादीचे ठाय फिटती । तैं जें देव होऊनि ठाकती । तें विसंवणें शेषींचें ॥ ४५ ॥ होतें हृदयाचिये पैरिवरीं । रोविलें कृपणाचिये परी । शब्दब्रह्मासिही चोरी | जयाची भीतभीत आरंभ केला. ३८ पण तेंच भीतभीत बोलणें असें खुबीचें होतें, कीं, एकदोन शब्द ऐकिल्याबरोबरच श्रीकृष्णानीं आपल्या संपूर्ण विश्वरूपाचें दर्शन त्याला घडवावें. ३९ हो, वासराचें दर्शन झाल्याबरोबरच गाय खडबडून उठते, मग त्या वासरानें आंचळाला प्रत्यक्ष तोंड लावलें असतां, तिला पान्हा फुटल्यावांचून राहील काय ? ४० अहो, त्या पांडवांकरितां कृष्ण रानावनांतही त्यांच्या संरक्षणासाठीं धांवले; मग अर्जुनाने इतकी विनवणी केली असतां, त्यांना स्वस्थ राहवेल काय ? ४१ श्रीकृष्ण म्हणजे प्रेमाचे प्रत्यक्ष अवतार, आणि अर्जुन तर प्रेमाचा चांगलाच खुराक; मग असा योग जुळून आला असतां, त्यांनी वेगवेगळं असावें हेंच मुळीं अद्भुत आहे. ४२ म्हणून, अर्जुनाच्या मुखांतून शब्द निघाल्यावरोवर, श्रीकृष्णदेव आपण होऊनच एकदम विश्वरूप होतील. हाच पहिला प्रसंग आहे, तरी त्याकडे लक्ष द्यावें. " ४३ मग अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, “ अहो दयासागरा देवा, जे शब्दांनीं सांगतां येत नाहीं, तेंही तुम्ही माझ्यासाठीं वाणीनं समजेल असें केलें. ४४ जेव्हां भूतमात्र ब्रह्मस्वरूपांत मिळून जातें आणि जीव व माया यांचं नांवही राहात नाहीं त्या वेळीं परब्रह्म ज्या स्वरूपाने उरतें तें त्याचें शेवटचें रूप होय. ४५ जे स्वरूप हृदयाच्या तळघरांत लोभ्याच्या धनाप्रमाणं पुरून ठेविलें होते; प्रत्यक्ष ज्याचा १ खाद्य, खुराक, २ घरांत,