पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३४७ पतिकरु । तो बाहेरी होआवा गोचरु | लोचनांसी ॥ २९ ॥ हे जिवाआंतुली चाड । परि देवासि सांगतां सांकड । कां जें विश्वरूप गूढ | कैसेनि पुसावें ॥ ३० ॥ म्हणे मागां कवणीं कहीं । जें पढ़ियंतेनें पुसिलें नाहीं । तें सहसा कैसें काई । सांगा म्हणों ॥ ३१ ॥ मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहूनि अंतरंगु । परि तेही हा प्रसंगु । बिहाली पुसों ॥ ३२ ॥ माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरि काय होईल गरुडाचिया येतुली । परि तोही हे वोली । करीचिना ॥ ३३ ॥ मी काय सनकादिकांहूनि जवळा । परि तयांही नागवेचि हा चाळा । मी आवडेन काय प्रेमळां । गोकुळींचियां ऐसा ॥ ३४ ॥ तयांतेंही लेंकुरपणें झकविलें । एकाचे गर्भवासही साहिले । परि विश्वरूप हैं राहविलें । न दावीच कवणा ।। ३५ ।। हा ठायवरी गुज । याचिये अंतरींचें हैं निज | केविं उरोउरी मज । पुसों में पां || ३६ || आणि न पुसेंचि जरी म्हणें । तरी विश्वरूप देखिलियाविणें । सुख नोहेचि परि जिणें । तेंही विपायें ॥ ३७ ॥ म्हणोनि आतां पुसों अळुमाळसें । मग करूं देवा आवडे तैसें । येणें प्रवर्तला सौध्वसें । पार्थ वोलों ॥ ३८ ॥ परि तेंचि ऐसेनि भावें । जे एका दों परमेश्वर आहे, असा जो सिद्धांत आपल्या मनाच्या प्रत्ययास आला आहे, तो प्रत्यक्ष चर्मचक्षूंच्याही प्रत्ययास यावा, ही अर्जुनाच्या मनींची मोठी हांव होती, पण ती देवाजवळ उघडी करणें मोठें संकटाचें होतें, कारण विश्वरूपासारखें गूढ रहस्य उघड कसें विचारावें ? २९, ३० अर्जुन मनांत विचार करूं लागला, कीं, "देवाच्या कोणत्याही आवडत्या भक्तानें यापूर्वी जें कधींच कोठेही विचारलें नाहीं, तें मी एकदम कसे आणि कां म्हणून विचारावें ? ३१ मी या श्रीकृष्णाचा अगदीं जिवलग सखा आहें, ही गोष्ट खरी; तरी पण माझा जिवलगपणा प्रत्यक्ष आईच्यासारखा असेल काय ? आणि ती आईसुद्धां हा विश्वरूपाचा प्रश्न विचारण्यास भ्याली. ३२ मी याची अगदीं मनाजोगी पाहिजे तशी सेवा केली, तरी ती काय गरुडाच्या सेवेची सर पावेल ? पण तो गरुडसुद्धां विश्वरूपाची गोष्ट कधींच काढीत नाहीं. ३३ मी काय सनकादिकांपेक्षां देवाच्या अधिक जवळचा आहे? पण ते सनकादिकही या विश्वरूपदर्शनाचा छंद कधींही घेत नाहींत. मी काय या कृष्णाला गोकुळांतील प्रेमळ बाळगोपाळांपेक्षां अधिक आवडता आहे ? पण त्यांनाही यानें बाळभावानंच खूब केले; अंबरीषादि कित्येक भक्तांकरितां यानें गर्भवासही सहन केले; परंतु आपलें विश्वरूप त्यांच्यापासून गुप्तच ठेवलें, तें कोणालाही दाखविलें नाहीं. ३४, ३५ हें गूढ रहस्य यानें आजपर्यंत आपल्या अंतरंगांत तसेच जपून गुप्त ठेवलें आहे; मग मीं तें असें एकाएकीं कसें विचारावें ? ३६ बरें, हें विचारू नये, असे म्हटलें, तर विश्वरूपाच्या दर्शनाशिवाय मला सुख होणार नाहीं, इतकेंच नव्हे, तर मी जिवंत तरी राहीन कीं नाहीं याचीच शंका आहे. ३७ म्हणून आतां हळूच जरासें विचारूं, मग देवांनीं आपल्यास रुचेल तसें करावें. " असा निश्चय करून अर्जुनाने बोलण्याला १ सिद्धांत, २ झटपट, ३ संशयित, अनिश्चित. ४ हळूच थोडेंसें, ५ भीतभीत,