पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ફેષ્ઠદ્ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ १८ ॥ हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड | तरी आतां अवधानामृतें वाड | सिंपोनि कीजे ॥ १९ ॥ मग हें रसभावफुल फुलेल | नानार्थ फळभारे फळा येईल | तुमचेनि धर्मे होईल । सुरवाडु जगा ॥ २० ॥ या बोला संत रिझले । म्हणती तोपलों गा भलें केलें । आतां सांगें जें बोलिलें । अर्जुनें तेथ ॥ २१ ॥ तंव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनाचें बोलणें । मी प्राकृत काय सांगों जाणें । परि सांगवा तुम्ही ॥ २२ ॥ अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणें करविलें लंकेश्वरा । एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई || २३ || म्हणोनि समर्थ जें जें करी । तें न हो कैसें चराचरीं । तुम्ही संत तयापरी । वोलवा मातें ॥ २४॥ आतां वोलिजतसें आइका । हा गीताभाव निका । जो श्रीवैकुंठनायका । मुखौनि निघाला ॥ २५ ॥ बाप ग्रंथ गीता । जो वेदीं प्रतिपाद्य देवता । तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथीं || २६ || तेथींचें गौरव कैसें वानावें । जें श्रीशंभूचिये मती नागवे । तें आतां नमस्कारिजे जीवभावें । हेंचि भलें ॥ २७ ॥ मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपीं दिटी । पहिली कैसी गोठी । करिता जाहला ॥। २८ || हैं सर्वही सर्वेश्वरु । ऐसा प्रतीतिगत जो यावर शिकविलें आहे, म्हणून, स्वामीजी, आपण आपलेच शिकविलेले ऐकावें. १८ महाराज, हें वाङ्मयाचं गोड झाड तुम्हींच आपल्या हाताने लाविलें आहे, तर आतां याला अवधानरूपी अमृतजलाचें शिपणें करून ते वाढीस आपणच लावावें. १९ तुम्हीं असें कराल, तर मग हें रसभावांच्या फुलांनीं डवरून येईल, अनेक अर्थरूपी फळांच्या बहाराने भरून जाईल, आणि तुमच्या पुण्याईनं जगाला सुखसोयीचा सुकाळ होईल. २० या भाषणाने संत श्रोत्यांना संतोष झाला, आणि ते म्हणाले, की, “वाहवा ! तूं चांगलें केलें. आतां त्या प्रसंगीं अर्जुन काय बोलला तें सांग. " २१ श्रीनिवृत्तिशिष्य ज्ञानदेव म्हणतो, “महाराज, कृष्णार्जुनांचा तो गहन संवाद म्यां निर्बुद्धानें काय कथन करावा ? परंतु तुम्हींच तो माझ्याकडून बोलवाल. २२ अहो, रानच्या पालाखाऊ वानराच्या हातूनही लंकानाथ रावण तिरस्कारपात्र करविण्यांत आला, अगदी एकटा अर्जुन, पण तोही अकरा अक्षौहिणी सेनेचा भंग करूं शकला नाहीं काय ? २३ म्हणून, समर्थ जें जें करतील, तें तें चराचरांत घडून येतेच. याच रीतीनें तुम्हीं संत मला आज बोलण्यास लावीत आहां. २४ श्रीवैकुंठपतीच्या मुखांतून निघालेल्या गीतेचा भावार्थ आतां सांगतों, तो ऐका. २५ अहो, काय या गीताग्रंथाची थोरवी ! वेदांच्या प्रतिपादनाची जी मुख्य देवता, तोच हा श्रीकृष्णदेव या ग्रंथांतील वक्ता आहे. २६ या ग्रंथाचें अर्थगौरव एवढे आहे, कीं, तें प्रत्यक्ष शंकरालाही आकलन करतां येत नाहीं. तेव्हां त्याला आतां मनःपूर्वक वंदन करावें, हेंच योग्य. २७ मग तो अर्जुन प्रभूच्या विश्वस्वरूपावर कटाक्ष ठेवून कसें बोलूं लागला, तें श्रवण हें सर्व विश्वच करा. २८ १ तिरस्काराचें पात्र.