पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३४५ माझेनि केलें ॥ ८ ॥ तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मन्हाटिया शब्दसोपानें । रचिलीं धर्मनिधानें | श्रीनिवृत्तिदेवें ॥ ९ ॥ म्हणोनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें । येतुलेनि संसारास द्यावें । तिळोदक ॥ १० ॥ हें असो ऐसे सावयव । एथ सोसिनले आथी रसभाव । तेथ श्रवणसुखाची राणीव | जोडली जगा ॥ ११ ॥ जेथ शांतादभुत रोकडे । आणि येरां रसां पडप जोडे । हें अल्पचि परी उघडें । कैवल्य येथ ॥ १२ ॥ तो हा अकरावा अध्यावो । जो देवाचा आपण विसंवता ठावो । परि अर्जुन सदैवांचा रावो । जे एथही पातला ॥ १३ ॥ एथ अर्जुनचि काय म्हणों पातला । आजि आवडतयाही सुकाळ जाहला । जे गीतार्थ हा आला । महाटिये ॥ १४ ॥ याचिलागीं आतां माझें । विनविलें तें आइकिजे । तरी अवधान दीजे । सजनीं तुम्हीं ॥ १५ ॥ तेवींचि तुम्हां संतांचिये सभे । ऐसी सलगी कीर करूं न लभे । परि मानावें जी तुम्हीं लोगें । अपत्या मज ॥ १६ ॥ अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे । कां करविलेनि चोजें न रिझे । बाळका माय ॥ १७ ॥ तेविं मी जें जें बोलें । तें प्रभु तुमचेंचि शिकविलें । म्हणोनि अवधारिजे आपुलें । आपण देवा दात्या श्रीनिवृत्तिनाथांनी केली आहे, असें ज्ञानदेव म्हणतो. ८ या संगमतीर्थाची संस्कृत भाषात्मक त उतरण्यास फार कठीण आहेत, म्हणून श्रीनिवृत्तिदेवांनीं तीं फोडून, ज्यांवर धर्माचे ठेवे सहज लाभतील असे मराठी शब्दांचे घाट बांधले आहेत. ९ म्हणून या ठिकाणी कोणाही श्रद्धाळू जनानें स्नान करावें, आणि या प्रयागावरील विराट्स्वरूपी माधवाचें दर्शन घ्यावें, आणि जन्ममरणाच्या परंपरेस खुशाल तिळांजळी द्यावी ! १० एकंदरीत ज्या या अध्यायांत रसांचे भाव असे भर घोसांत आले आहेत, कीं जगाला श्रवणानंदाचें साम्राज्यच लाभले आहे; ११ ज्या या अध्यायांत शांत व अद्भुत रस ठळक असून इतर रसांचेंही महत्त्व राखलें आहे; किंबहुना ज्या या अध्यायांत प्रत्यक्ष केवल ब्रह्मच स्पष्ट केलें आहे; १२ तो हा अकरावा अध्याय होय. हा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण देवांच्या आरामाची जागा आहे, पण सर्व सुदैवी पुरुषांत अर्जुन खरोखरच श्रेष्ठ होय, कारण त्याचा येथेही प्रवेश झाला आहे. १३ परंतु एकटा अर्जुनच येथे प्राप्त झाला असें कां म्हणावें ? येथें वाटेल त्याचा रिघाव होऊन चंगळ उडाली आहे, असेंच म्हणणें आज योग्य, कारण येथे गीतेचा अर्थ मराठी भाषेच्या रूपाने प्रकट झाला आहे. १४ म्हणून, श्रोते हो, माझी विनंति ऐका, कीं आपण सज्जनांनी इकडे ध्यान द्यावें. १५ तसेंच मी तुम्हां संतजनांच्या सभेबरोबर अशी लगटपणाची भाषा बोलूं नये, पण तुम्हीं मला ममतेनें आपलेच बालक मानावें. १६ अहो, आपण पोपटाला बोलायला शिकवावें, आणि तो शिकून बोलूं लागला म्हणजे आपण आनंदाने मान डोलवावी, किंवा मुलाला कांहीं विनोदाची गोष्ट करावयाला लावून, ती त्यानें केली म्हणजे आई त्या मुलावर खूष होत नाहीं का ? १७ म्हणून, महाराज, मी जें जें बोलतों, तें तें सर्व तुम्हींच १ भरत आले. २ साम्राज्य. ३ डोलवावी. ४४