पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ॐ नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्रीज्ञानेश्वरी अध्याय अकरावा आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोन्ही रसीं । येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥ १ ॥ जेथ शांतांचिया घरा । अद्भुत आला आहे पोहुणेरा । आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ॥ २ ॥ अहो वधूवरांचिये मिळणीं । जैशीं वऱ्हााडियांही लुगडी लेणीं । तैसे देशियेच्या सुखासनीं । मिरवले रस ॥ ३ ॥ परि शांताद्भुत वरवे । जे डोळियांच्या अंजळी घ्यावे | जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंव ॥ ४ ॥ ना तरी अंवसेच्या दिवशीं । भेटलीं विवें दोनी जैशीं । तेवीं एकवळा रसीं । केला एथ ॥ ५ ॥ मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग । म्हणोनि सुस्नात होत जग । आघवें एक ॥ ६ ॥ माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त । यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली बापा ॥ ७ ॥ एथ श्रवणानि दारें । तीर्थी रिघतां सोपारें । ज्ञानदेव म्हणे दातारें । आतां, यानंतर या प्रस्तुत अकराव्या अध्यायांत ज्या कथेमध्यें अर्जुनाला विराट्स्वरूपाचें दर्शन घडविलें आहे, ती कथा दोन रसांनीं ओथंबलेली आहे. १ कां कीं, या कथेंत मूळचा शांतरस असून, त्याच्या घरीं अद्भुतरस पाहुणचारास आला आहे, आणि दुसन्याही रसांना त्याच्या पंक्तीचा चहुमान लाभला आहे २ श्रोते हो, नवरानवरीच्या लग्नांत जसे वन्हाडीही वस्त्रांभूषणांनी नटून मिरवतात, तसेच येथें देशी भाषेच्या आरामशीर आसनावर सर्व रस विलसत आहेत. ३ परंतु हरिहरांप्रमाणे परस्परांस प्रेमभरानें गाढालिंगन देणारे शांत व अद्भुत रस इतके ठसठशीत आहेत, कीं ते प्रत्यक्ष डोळ्यांनींही पहावे ! ४ किंवा अमावास्येच्या पर्वकाळीं जशीं सूर्यचंद्रांची दोन्ही मंडळें एकत्र मिळतात, त्याप्रमाणें येथें या दोन रसांचा मिलाफ झाला आहे. ५ गंगायमुनांच्या ओघांसारखा या दोन रसांचा संगम होऊन येथें प्रयाग क्षेत्रच झालें आहे, म्हणून सर्व जगाने या पवित्र तीर्थी स्नान करून खुशाल निर्मळ व्हावें. ६ या ठिकाणीं गीता ही गुप्त सरस्वती समजावी आणि हे दोन रसप्रवाह मात्र व्यक्त आहेत, तेव्हां, श्रोते हो, हा अध्याय म्हणजे त्रिवेणी संगमच म्हणावा. ७ या त्रिवेणीतीर्थात केवळ श्रवणमार्गानें सहज शिरतां यावें, अशी सोय माझ्या उदार १ पाहुणचाराला, २ पंक्तीस बसलेल्या ३ वस्त्रे ४ भूषर्णे. ५ मराठीच्या ६ गळामिठीस.