पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३४३ म्हणें । तंव आंतुही आंधळा ॥ २९ ॥ परि असो हें तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवितसे मानु । कीं याहीवरी तया आनु । वेिसा उपनेला ॥ ३३० ॥ म्हणे हेच हृदयातली प्रतीती । बाहेर अवतरो का डोळ्यांप्रती । इये आतचिया पाउलीं मति । उठती जाहली ||३१|| मियां इहींच दोहीं डोळां । झवावें विश्वरूपा सकळा । एवढी हांव तो देवाआगळा । म्हणऊनि करी ॥ ३२ ॥ आजि तो कल्पतरूची शाखा । म्हणोनि वांझोळें न लगती देखा। जें जें येईल तयाचिया मुखा । तें तें साचचि करितसे येरु ॥ ३३ ॥ जो प्रादाचिया बोला । विपाहीसकट आपणचि जाहाला । तो सद्गुरु असे जोडला । किरीटीसी ॥ ३४ ॥ म्हणोनि विश्वरूप पुसावयालागीं । पार्थ रिगता होईल कवणें भंगीं । तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥ ३३५॥ पण, नाहीं; तर हा जसा चर्मचक्षूंनी बाहेर आंधळा आहे, तसा अंतश्चक्षूंनीही आंधळाच आहे!” २९ असो; तो अर्जुन यानंतरही आपल्या आत्मकल्याणाचे प्रमाण अधिक वाढवीत होता, कारण, आतां त्याच्या अंतःकरणांत दुसऱ्या एका गोष्टीबद्दल उत्कंठा उत्पन्न झाली. ३३० तो म्हणाला, "देवा, माझ्या अंतःकरणांत जो आत्मस्वरूपाचा अनुभव चिंवला आहे, तो वाह्य जगांत प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावा, अशा उत्कंठेनें माझें मन चळवळ करूं लागले आहे. " ३१ अर्जुन मोठा दैववान् असल्यामुळें, " याच माझ्या दोन डोळ्यांनी सगळ्या विश्वाचं मी आकलन करावें, " अशी आकांक्षा त्यानें केली. ३२ श्रोते हो, तो अर्जुन म्हणजे प्रत्यक्ष कल्पतरूचाच फांगाडा होता, त्यामुळे तो वांझ (म्हणजे फलहीन ) असणें शक्यच नव्हतें. म्हणून त्याच्या तोंडांतून जें जें निघे, तें तें श्रीकृष्ण खरेंच करीत होते. ३३ जो भक्त प्रहादाच्या वचनासाठीं विपरूपही धारण करता झाला, तोच नारायण या अर्जुनाला सद्गुरु लाभला होता. ३४ तेव्हां तो अर्जुन 'मला विश्वरूप दाखवा, ' ही विनंति कशा शब्दांनीं करता झाला, तें पुढील अध्यायांत श्रीनिवृत्तीचा शिष्य ज्ञानदेव श्रोत्यांस विदित करील. ३३५ १ उत्कंठा, सोस. २ उपजला.