पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी एक आणि आम्हीं । सांडावा तरी ॥ १९ ॥ हां हो सूर्य म्हणे काय जगातें । हें आंधारें दवडा कां परौतं । तेवं धसाळ म्हणों देवा तूतें । तरी अधिक हा वोलु ॥ ३२० ॥ तुझें नामचि एक कोण्ही वेळे । जयांचिये मुखासि कां काना मिळे | तयांचिया हृदयातें सांडूनि पळे | भेदु जी सा ॥ २१ ॥ तो तूं परब्रह्मचि सकें । मज देवें दिधलासि हस्तोदकें । तरी आतां भेदु कायसा कें । देखावा कवणें ॥ २२ ॥ जी चंद्रविंवाचा गाभारां । रिगालियावरीही उबारा । परि राणेपणें शार्ङ्गधरा । बोला हें तुम्ही ॥ २३ ॥ तेथ सावियाचि परितोपोनि देवें । अर्जुनातें आलिंगिलें जीवें । मग म्हणे तुवां न कोपावें । आमुचिया बोला ॥ २४ ॥ आम्हीं तुज भेदाचिया वोहाणी | सांगितली जे विभूतींची कहाणी । ते अभेदें काय अंतःकरणीं । मानिली की न मने ॥ २५ ॥ हेंचि पाहावयालागीं । नावेक बोलिलों बाँहिरसवडिया भँगी । तंव विभूति तुज चांगी । आलिया वोधा ॥ २६ ॥ तेथ अर्जुन म्हणे देवें । हें आपुलें आपण जाणावें । परि देखतसें विश्व आघवें । तुवां भरलें ॥। २७ ।। पैं राया तो पांडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला वरितु । या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे ॥ २८ ॥ कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें | म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणें । हा जीवें धडसा आहे मी हा एक भेदभाव साफ सोडून द्यावा. १९ परंतु सूर्यानें जसें जगाला सांगावें, कीं, 'अरे, हा अंधार पार झाडून टाका, ' त्याप्रमाणेंच तुमचें हें वोलणं अविचाराचं आहे, असें म्हणावें तर तें माझें भाषण उपमर्दकारक ठरेल. ३२० अहो, तुमचें नुसतं नांवच एकादे वेळीं कोणाच्या मुखीं अगर कानीं आलें, तर भेदभावना त्याच्या हृदयाला सोडून तत्काळ दूर जाते. २१ असे तुम्ही, प्रत्यक्ष परब्रह्मच, सुदैवाने आमच्या हातीं लाभलां आहां, मग येथें भेदभाव कसला आणि कोणाला बाधक होणार ? २२ अहो, चंद्रत्रिंवाच्या गाभ्यांत शिरल्यावरही उकाड्याची वार्ता राहील का? पण, महाराज श्रीकृष्ण, तुम्ही आपल्या थोरपणाच्या भरांत अशीच गोष्ट बोललां आहां. " २३ हें ऐकून श्रीकृष्णांना संतोष झाला, व ते अर्जुनाला जीवाभावानें आलिंगन देऊन म्हणाले, " अर्जुना, आमच्या भाषणाचा राग मानूं नकोस. २४ अरे, मी भेदाचा अंगीकार करून ज्या ज्या निरनिराळ्या विभूति कथन केल्या, त्यांचें अभिन्नपण तुझ्या अंतःकरणांत वाणले आहे कीं नाहीं, हें पारखून पाहण्यासाठींच जरासें बाह्यात्कारी वचन बोललो. तो लागलंच, तुला विभूतींचा बोध उत्तम झाला आहे, हे आमच्या अनुभवास आलें. "२५,२६ तेव्हां अर्जुन म्हणाला, “देवा, हें तुमचें तुम्हांला माहीत; पण मी मात्र खरोखरच हें सर्व विश्व तुमचेच स्वरूप आहे, असे पाहातों. "२७ परंतु, 'राजा, अर्जुन या प्रकारें आत्मरूपाचा अनुभव उपभोगता झाला, ' हे संजयाचे वचन राजा धृतराष्ट्र अगदीं संथपणे ऐकत होता. २८ तेव्हां संजयाच्या अंतःकरणाला वाईट वाटून, तो मनांत म्हणाला, " अहो, असं सुंदैव फळफळलें असतां दूर लोटणं म्हणजे आश्चर्यचं नव्हे काय ? मला वाटत होतें, कीं, याची बुद्धि तरी नीट घड असेल; १ द्वारें, मार्गानें. २ बाह्यात्कारी. ३ वचनें, तें