पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला संजय उवाच:- दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा । आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ २ ॥ पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् । व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ ३ ॥ सम० - रचलें पांडवदळ ते दुर्योधन देखुनी । राजा वचन है बोले द्रोणाजवळ येउनी ॥ २ ॥ पार्श्वे ही पांडवी सेना आचार्या थोर जे बहू । तुझ्याच शिष्यै रचिली शाहण्या द्रुपदात्मजे ॥ ३ ॥ आर्या-तेव्हां पांडुसुतांची पाहुन सव्यूह सैन्यरचना ते । वेगीं द्रोणाजवळी येउनि बोले नृपाळ वचनात ॥२॥ हे आचार्या स्वामी पांडवसेना पहावया ज्ञानें । धृष्टयुम्ने व्यूहा रचिलें शिष्यें तुझ्याच सुज्ञानें ॥ ३ ॥ ओंव्या—संजय म्हणे रायासी | पांडवसैन्य परियेसीं । राजा सांगे द्रोणापाशीं । तयाजवळी येऊनी ॥ २ ॥ 'आचार्या ! पांडवसैन्य पाहें । द्रुपदपुत्रै रचना केली आहे । तुझाच शिष्य होय । बुद्धिबळें अधिक ॥ ३ ॥ तिये वेळीं तो संजय बोले । म्हणे पांडवसैन्य उचललें | जैसे महा- प्रळयीं पसरलें । कृतांतमुख ॥ ८८ ॥ तैसें तें घनदाट । उठावले एकवाट । जैसे उसळलें कालकूट । धरी कवण ॥ ८९ ॥ ना तरी वडवानलु सांकला । प्रलय- वातें पोखँला । सागर शोषूनि उधवला | अंबरासी ॥ ९० ॥ तैसे दळ दुर्धर । नाना व्यूहीं परिकर । अवगमले भयासुर । तिये काळीं ॥ ९१ ॥ तें देखो- नियां दुर्योधनें । अव्हेरिलें कवणें मानें । जैसें न गणिजे पंचाननें । गजघटांतें ॥ ९२ ॥ मग द्रोणापासीं आला । तयातें म्हणे हा देखिला । कैसा दळभारु उचलला । पांडवांचा ॥ ९३ ॥ गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह भंवते । रचिले आथि बुद्धिमतें । द्रुपदकुमरें ॥ ९४ ॥ जो कां तुम्हीं शिक्षा- पिला । विद्येसी वसौटा केला । तेणें हा सैन्यसिंधु पौखरिला । देखदेख ॥ ९५ ॥ अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि । युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ ४ ॥ सम० - येथे भीमार्जुनातुल्य शूर थोर धनुर्धर । युयुधान विराटाख्य द्रुपदाख्य महारथी ॥ ४ ॥ आर्या - भीमार्जुनसम येथें दिसती धन्वी समग्र शूर रथी । सात्यकि विराट आणिक द्रुपदादिक हे महारथातिरथी ४ ओवी - पांडव सेनेत वीर जाण । युद्ध करणार भीमार्जुन । यांसम विराट युयुधान। द्रुपद ऐसे महारथी ॥ ४ ॥ आणीकही असाधारण । जे शस्त्रास्त्री प्रवीण । क्षात्रधर्मी निपुण । वीर तेव्हां संजय म्हणाला, विश्वप्रलयाच्या वेळीं जसा काळाचा जबडा पसरावा, तसं पांडवांचं सैन्य खवळलें आहे दिसले. ८८ जसे काळकूट उसळावे, तसें तें घनगर्द सैन्य एकजुटीने उसळलें. त्याला कोण प्रतिबंध करूं शकणार ? ८९ किंवा पेटलेला वडवानळ प्रयवायूनं बळावून व समुद्राला शुष्क करून, जणूं काय आकाशापर्यंत उसळावा, ९० त्याप्रमाणें नानापरींच्या व्यूहरचनांनी सुघटित असें तें अनावर सैन्य त्या काळीं फारच भेसुर वाटलें. ९१ परंतु हत्तींच्या कळपांचा जसा सिंहाला कांहींच हिशेब वाटू नये, तसेंच दुर्योधनानें तें सैन्य पाहून त्यास तुच्छ मानिलें. ९२ नंतर तो द्रोणाजळ आला व त्याला म्हणाला, “पांडवांच्या सैन्यभाराने कसा उठाव केला आहे. तें आपण पाहिलें काय ? ९३ त्यांच्या सैन्याचे निरनिराळे व्यूह म्हणजे जणूं काय हालतेचालते डोंगरी किल्लेच ! हे व्यूह, बुद्धिवान द्रुपदपुत्र जो धृष्टद्युम्न, त्यानें रचिले आहेत. ९४ अहो आचार्य, ज्याला तुम्हीं शिकविलें, युद्धविद्येने मंडित केलं, त्याच धृष्टद्युम्न्नानें, पहा, पहा, हा पांडवांचा सेनासागर कसा पसरून टाकला आहे ! ९५ या सैन्यांत आणखीही असे अलौकिक वीर आहेत, कीं ते शस्त्रास्त्रविद्येत पारंगत असून, क्षात्र- १ भडकला. २ पोसला, वाढला. ३ उसळला, उंचावला. ४ शिकविला ५ स्थान, निवास, आश्रयस्थल, ६ पसरला. २