पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३४१ तो निर्धन या भाषा नेण । काय कामधेनूसवें सर्वस्व हन । चालत असे ॥ ९ ॥ तियेतें जें जेधवां जो मागे । तें ते एकसरेचि प्रसवों लागे । तेविं विश्वविभव तया आंगें । होऊनि असती ॥ ३१० ॥ तयातें वोळखावया हेचि संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा । ऐसे आथी ते जाण प्राज्ञा । अवतार माझे ॥ ११ ॥ आणि सामान्य विशेष । हें जाणणें एथ महादोष । कां जे मीचि एक अशेष । विश्व हें म्हणोनि ॥ १२ ॥ तरी आतां साधारण आणि चांगु । ऐसा कैसेनि पां कल्पाचा विभागु । वायां आपुलिये मती वंगुं । भेदाचा लावावा || १३ || एन्हवीं तूप कासया घुसळावें । अमृत कां रांधूनि अर्धे करावें । हां गा वायूसि काय पांडावें । उजवें आंग आहे ॥ १४ ॥ पैं सूर्यविंवासि पोटपाठी । पाहतां नासेल आपुली दिली । तेविं माझ्या स्वरूपीं गोठी । सामान्यविशेषाची नाहीं ॥ १५ ॥ आणि सिनांना इहीं विभूतीं । मज अपारातें मविसील किती । म्हणोनि किंबहुना सुभद्रापती । असो हें जाणणें ॥ १६ ॥ आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे । यालागीं भेदु सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥ १७ ॥ ऐसें विबुधवनवसंतें | तेणें विरक्तांचेनि एकांतें | बोलिलें जेथ श्रीमंतें | श्रीकृष्णदेवें ॥ १८ ॥ तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुलें हें रहस्य बोलिलें तुम्हीं । जे भेदु सर्व प्रकारचा वस्तुसंग्रह कामधेनूच्याबरोबर चालत असतो काय ? नाहीं. ९ परंतु तिच्याजवळ जो कोणी ज्या वस्तूची मागणी करील, ती वस्तू ती कामधेनु तत्काळ प्रसवूं लागते, तद्वत् त्या एकट्या विश्ववीजाच्या अंगांतच विश्वाचीं सर्व ऐश्वर्ये भरलेलीं असतात. ३१० त्याला ओळखण्याची खूण एकच, कीं, सर्व जग त्याच्यापुढे नम्र होते व त्याची आज्ञा पाळितें. असें लक्षण ज्यांत आढळेल, ते माझे अवतार होत. ११ आणि हा अवतार सामान्य आणि हा विशेष उत्कृष्ट, असा भेदभाव करणें, हें पापच होय, कारण सर्व विश्व म्हणजे मीच आहें. १२ तेव्हां साधारण आणि उत्तम, असा भेद कोणत्या दृष्टीनें कल्पावा ? असें करणें म्हणजे आपल्या बुद्धीला उगीचच्या उगीच डाग लावून घेण्यासारखें आहे. १३ उगाच तूप कशाला घुसळावें ? अमृताला कढवून अर्धे आटवण्यांत काय मतलच आहे ? अरे, वाऱ्याला कांहीं डावें उजवें अंग असतें का ? १४ सूर्याच्या बिंबाला पाठपोट असेल म्हणून पाहण्यास कोणी लागेल, तर त्याच्या दृष्टीचा मात्र नाश होईल. याप्रमाणेंच माझ्या स्वरूपांतही साधारण- विशेष अशा भेदकल्पनेचा गंधही नाहीं. १५ तेव्हां, एकेक निरनिराळ्या विभूति घेऊन, तूं माझ्या अमर्याद स्वरूपाची मापणी किती म्हणून करणार ? म्हणून, अर्जुना, मला जाणण्याचे असले प्रयत्न आतां पुरत. १६ अरे, माझ्या एकाच अंशानें हैं जग भरपूर व्यापून टाकलं आहे, म्हणून सर्व भेदकल्पना सोडून समबुद्धीनें माझी उपासना कर. १७ ज्ञानिजनरूप वनाला फुलविणारा वसंत व विरक्तजनांचें संपूर्ण ध्येय असे ते ऐश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण याप्रमाणें बोलले. १८ तेव्हां अर्जुन म्हणाला, " महाराज, तुम्हीं एवढें एक रहस्य सांगितलें, कीं, आम्हीं १ डाग, कलंक, २ निरनिराळ्या. 22