पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४० सार्थ श्रीज्ञानेश्वरी ये जेविं गा । तेविं माझिया विशेपलिंगां । नाहीं मिती ॥ १ ॥ ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूति सांगितलिया तुज अर्जुना । तो हा उद्देश जो गा मना । आहाच गमला || २ || येरां विभूतिविस्तारांसि कांहीं । एथ सर्वथा लेख नाहीं । म्हणोनि परिससी तूं काई । आम्ही सांगों किती ॥३॥ यालागीं एकिळां तुज । दाऊं आतां वर्म निज । तरी सर्वभूतांकुरें वीज | विरूढत असे तें मी ॥ ४ ॥ म्हणोनि सानें थोर न म्हणावें । उंच नीच भाव सांडावे । एक मीचि ऐसें मानावें । वस्तुजाता ॥ ५ ॥ तरी यावरी साधारण । आईक पां आणिकही खुण । तरी अर्जुना ते तूं जाण । विभूति माझी ॥ ६ ॥ द्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजॉऽशसंभवम् ॥ ४१ ॥ सम० - आतां जो कां भाग्यवंत प्राणी श्रीमंत ऊर्जित । तो तो तूं जाण कीं माझ्या तेजांशाचाचि संभव ॥ ४१ ॥ आर्या - जो जो प्राणी श्रीनें विभूतिनें युक्त ऊर्जितें गमतो। तो तो माझ्या अंश संभवला जाण जो सुख रमतो ॥४१॥ ओवी - जे ऐश्वर्यवंत सत्त्ववंत देखसी । लक्ष्मी आहे जयांपासीं । अथवा जय असे ज्यांपासीं । ते जाण अंश माझे ॥४१॥ जेथे जेथ संपत्ति आणि दया | दोन्ही वसती आलिया ठाया । ते ते जाण धनंजया । विभूति माझी ॥ ७ ॥ अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥ ४१ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः । सम० - आतां या बहुहि ज्ञानें जाणसी किति अर्जुना । जें अधिष्छूनि उरलों एकांशींही न हें जग ॥ ४२ ॥ आर्या-अथवा बहुतां ज्ञानें काय तुला अर्जुना सुधीरा हैं। जग सकळहि मी बापा एक्या अंशेचि व्यापुनी राहें ४२ आँखी - अर्जुना ऐक ज्ञान । बहु सांगितलिया काय कारण । विश्व झालें मजपासून एक अंशें जाण पां तूं ॥ ४२ ॥ अथवा एकलें एक विंव गगनीं । परी प्रभा फांके त्रिभुवनीं । तेविं एकाकियाची सकळ जनीं । आज्ञा पाळिजे ॥ ८ ॥ तयातें एकलें झणीं म्हण | त्याप्रमाणे माझ्या प्रधान विभूतींनाही सीमाच नाहीं. १ यांपैकीं ज्या पांच सात मुख्य विभूति तुला सांगितल्या, त्या, अर्जुना, केवळ वरवर सूचक म्हणूनच आहेत. २ माझ्या बाकी राहिलेल्या विभूतींच्या विस्ताराला मर्यादाच नाहीं, म्हणून तूं ऐकणार तरी काय आणि आम्हीं सांगावें तरी काय ? ३ तेव्हां तुला एकदमच आम्ही आपलें रहस्य दाखवितों. अरे, या सर्व भूतरूपी अंकुरांनी जें विस्तार पावतें तें बीजच मी आहे. ४ म्हणून कशालाही लहान मोठें म्हणूं नये; उंच, नीच, हा भेदभाव सोडावा; आणि सर्व वस्तुजात म्हणजे एक मीच आहें, असें मानावें. ५ तरीपण आतां तुला एक सर्वसाधारण खूण सांगतों ती ऐक; तिच्यावरून तूं माझ्या विभूतीला ओळखावेंस. ६ हे अर्जुना, ज्या ज्या भूताच्या ठायीं ऐश्वर्य व दयाळूपणा हे गुण एकत्र झालेले आढळतील, ती ती माझी विभूति आहे, असं तूं समज. ७ अरे, सूर्याचं विंत्र एकटेच एक आकाशांत असतें, पण त्याची प्रभा त्रिभुवनांत फांकते, त्याप्रमाणेंच ज्या एकुलत्या एकाची आज्ञा सर्वजण पाळतात, ८ त्याला तूं एकटा किंवा निर्धन म्हणूं नयेस. अरे, १ मुख्य विभूतींना,