पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३३९ होऊनि जनीं । चोरून नेली माझी भगिनी । तन्ही विकल्प नुपजे मनीं । मी तूं दोन्ही स्वरूप एक ॥ ९४ ॥ मुनींआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो । कवीश्वरांमाजीं धैर्या ठावो । उशनाचार्य तो मी ।। ९५ ।। दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् । मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ ३८॥ सम० - दंड मी दंडकत्यांत जिंकणारांत नीति मी । परेचें मौन गुह्यांत ज्ञान मी ज्ञानियांमधे ॥ ३८ ॥ आर्या - मी नीति जगीं त्यांतहि दंडहि कत्यांत जाण मी दंड । गुह्यांत मौन मी हे ज्ञान्याचे ज्ञान जाण ऊदंड ॥ ३८ ॥ ओवी - दंडकत्यांत मी दंड । जयांत जयवंत निवड । ज्ञानवंतांत ज्ञानमुंड । गुह्यांमाजी मौन मी ॥ ३८ ॥ अगा दमितयांमाझारीं । अनिवार दंडु तो मी अवधारीं । जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं । नियमित पावे ॥ ९६ ॥ पैं सारासार निर्धारितयां । धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां । सकळशास्त्रांमाजीं ययां । नीतिशास्त्र तें मी ॥ ९७ ॥ आघवियाचि गूढां । माजीं मौन तें मी सुंहाडा । म्हणोनि न वोलतयां पुढां । स्रष्टाही नेण होय ॥ ९८ ॥ अगा ज्ञानियांचिया ठायीं । ज्ञान तें मी पाहीं । आतां असो हैं ययां कांहीं । पार न देखों ॥ ९९ ॥ यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन । न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ ३९ ॥ नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप । एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतविस्तरो मया ॥ ४० ॥ सम० - जें नित्य सर्व भूतांचं बीज तें मीच अर्जुना । न घडे कीं मजविणें कांहीं होय चराचर ॥ ३९ ॥ माझ्या दिव्यां विभूतींला अंत नाहीं परंतपा । हा तों विभूतिविस्तार म्यां संक्षेपेंचि वर्णिला ॥ ४० ॥ आर्या - जे सर्वां भूतांचे बीज असे तेंहि अर्जुना हें मी । मजविण भूत चराचर न एकही जेविं होय नग हेमीं ॥ ३९ ॥ नहीं कदापि माझ्या दिव्य विभूतींस अंत निष्पापा। उद्देश कथिला तुज म्यां हा विस्तर विभूतिंचा बापा ॥४०॥ ओव्या - सर्व भूतांचे बीज असें मी जाण । मजवेगळें नाहीं स्थान । चराचरीं झालें जाण । ऐसें जाण अर्जुना ॥३९॥ माझ्या दिव्य विभूति अर्जुना । अंत नाहीं यांसी जाणा । ही सांगितली खुणा । संक्षेपें तुला ॥ ४० ॥ पैं पर्जन्याचिया धारा - वरी लेख करवेल धनुर्धरा । कां पृथ्वीचिया तृणांकुरां । होईल ठी ॥ ३०० ॥ पैं महोदधीचिया तरंगां । व्यवस्था धरूं न माझी बहीण जी सुभद्रा, तिला पळवून नेलीस, तरी पण तुझ्याबद्दल माझ्या मनांत विपरीत भावना उत्पन्न झाली नाहीं; कारण मी व तूं असे आपण दोघे एकस्वरूपच आहों. " ९४ पुढें यादवश्रेष श्रीकृष्ण म्हणाले, “अर्जुना, सर्व मुनिगणांत व्यास मीच आहे, आणि कविवर्यात शुक्रही मीच आहें." ९५ अरे, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वाना आळा घालणारा जो दंड, तोच सर्व शासनकर्त्यात मी आहे. ९६ वाटाचा निर्णय करणाऱ्या व धर्मज्ञानाचा कैवार घेणाऱ्या सर्व शास्त्रांत मी नीतिशास्त्र आहे. ९७ मित्रा अर्जुना, सर्व गूढांत मौन तें मी आहें, कारण मौन धरणाऱ्यापुढें ब्रह्मदेवाचीही मात्रा चालत नाहीं. ९८ अरे, ज्ञानिजनांच्या ठिकाणीं जें ज्ञान असतें, तेंही मीच. पण हे विभूतिकथन किती करावे ? याला अंतच नाहीं. ९९ धनुर्धरा अर्जुना, या पावसाच्या धारांची गणना करवेल, किंवा पृथ्वीवरील गवताच्या संख्येचा निर्णय करतां येईल; ३०० पण ज्याप्रमाणे समुद्रांतील लाटांचें कांहींच प्रमाण बांधतां येत नाहीं, १ गुदा, सख्या २ गणना. ३ व्यवस्था, निर्णय, मोजदाद.