पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आर्या —तेजस्त्रियांत तेजहि द्यूतचि मी जाण कपटकश्यांत । जय मीं आणिक निश्वय मी सध्वहि सश्ववंत जे त्यांत ॥ ३६ ॥ वृष्णींत वासुदेवहि कौंतेया मी मुनमधे व्यास मी पांडवांत अर्जुन कविमाजी कविस जाण शुक्रास ॥ ३७ ॥ ओव्या - छलकांमाजी द्यूत । तेजस्वियांत तेज दीप्त। व्यवसायांमाजी जयो समस्त । सववंतांमध्ये सत्वगुण मी ॥ ३६ ॥ यादवांमाजी वासुदेव पांडवांमाजी धनंजय । मुनींमध्ये मी व्यासदेव । कवींमाजी शुक्र मी ॥ ३७ ॥ छळितयां विंदाणा | माजीं जूं तें मी विचक्षणा । म्हणोनि चोहटा चोरी परि कवणा । निवारूं नये ॥ ८४ ॥ अगा अशेषांही तेजसां । आंत तेज तें मी भरंवसा | विजयो मी कार्योद्देशां । सकळांमाजीं ॥ ८५ ॥ जेणें चोखाळत दिसे न्याय । तो व्यवसायांत व्यवसाय । माझें स्वरूप हैं राय । सुरांचा म्हणे ||८६|| सत्त्वाथिलियांआंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु । यादवांमाजी श्रीमंतु । तोचि तो मी ॥ ८७ ॥ जो देवकी वसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठीं गोकुळीं गेला । तो मी प्राणासकट पियाला । पूतनेतें ॥ ८८ ॥ नुघडतां बालपणाची फुली । जेणें मियां अदानवी सृष्टि केली । करीं गिरि धरूनि उमाणिली | महेंद्र महिमा ॥ ८९ ॥ कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें । जेणें मियां जळत गोकुळ राखिलें । वासरुवांसाठीं लाविलें । विरंचीस पिसें ॥ २९० ॥ प्रथमदशेोचिये पहांटे। माजी कंसाऐशी अचाटें । महाधेंडीं अवचटें । लीळाचि नासिलीं ॥ ९१ ॥ हें काय कितीएक सांगावें । तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें । तरि यादवांमाजीं जाणावें । हेंचि स्वरूप माझें ॥ ९२ ॥ आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां । माजीं अर्जुन तो मी जाणावा । म्हणोनि एकमेकांचया प्रेमभावा । विघड न पडे ॥ ९३ ॥ संन्यासी तुवां फसवणूक करणाऱ्या कसबांत, बा ज्ञात्या अर्जुना, जुगार हा मीच आहे; आणि म्हणूनच जुगारानें भर चव्हाट्यावर चोरी करून कोणास नागविलें, तरी त्याचें कोणीही निवारण करूं शकत नाहीं. ८४ अरे, सर्व तेजस्वी पदार्थाचें तेज तें मी. सर्व कार्य करण्याच्या संकल्पांत जो विजय, तोही मीच. ८५ सर्व उद्योगांत न्यायाला उजळा देणारा जो व्यवसाय तो मी आहें. ८६ सर्व सत्त्वपूर्ण पुरुषांत मीच सत्त्व आहे; आणि सर्व यादवकुळांत, जो ऐश्वर्यवान्, वसुदेवदेवकीचा मुलगा, पण जो यशोदेच्या मुलीच्या बदला गोकुळांत नेण्यांत आला, आणि ज्यानें पूतनेच्या दुधाचा तसाच प्राणाचाही घोंट घेतला, ज्यानें बाळपणाची कळी उमलली नाहीं तोंच सर्व सृष्टि दैत्यहीन केली व गोवर्धन पर्वत नखाग्रावर सांवरून महेंद्राची थोरवी अजमावून पाहिली; यमुनेच्या डोहांतील कालियारूपी शल्य ज्यानें उपटून काढले, जळणाऱ्या गोकुळाला ज्यानें बचाविलें, आणि गोवत्सांच्या हरणप्रसंगी ज्यानं ब्रह्मदेवास आपल्या मायाकरणीनें केवळ वेडच लाविलें; ज्यानें आपल्या बालवयाच्या उदयकालींच कंसासारखी मोठमोठीं धेंडें सहजासहजी धुळीस मिळविली; पण इतका पाल्हाळ कशाला पाहिजे ? अर्जुना, ज्याचीं हीं पराक्रमाचीं कृत्ये तूं स्वतःच पाहिलीं किंवा ऐकिलीं आहेस, तो श्रीकृष्ण या सर्व यादवांत माझी प्रधान विभूति आहे. ८७, ८८, ८९, ९०, ९१, ९२ आणि चंद्रवंशांत जन्मलेल्या तुम्हां पांडवांमध्यें जो अर्जुन, तो मीच समजावा, म्हणून तर त्याच्या आमच्या प्रेमभावांत कधींच बिघाड होत नाहीं. ९३ अरे, तूं संन्याशाचें सोंग घेऊन, १ जुगार.