पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३३७ आणि सृजिलिया भूतांतें मीचि धरीं । सकळां जीवनही मीचि अवधारीं । शेखीं सर्वांत या संहारीं । तेव्हां मृत्युही मीचि ॥ ७४ ॥ आतां स्त्रीगणांच्या पैकीं । माझिया विभूति सात आणिकी । तिया ऐक कवतिकीं । सांगिजतील ॥७५॥ तरी नित्य नवी जे कीर्ति । अर्जुना ते गा माझी मूर्ति । आणि औदायसीं जे संपत्ति । तेही मीचि जाणें ॥ ७६ ॥ आणि ते मी वाचा । जे सुखासनीं न्यायाच्या । आरूढोनि विवेकाच्या । मार्गी चालें ॥७७৷৷ देखिलेनि पदार्थे । जे आठवून दे मातें तें स्मृतिही पैं एथें । त्रिशुद्धी मी ॥ ७८ ॥ पैं स्वहिता अनुयायिनी । मेधा ते गा मी इये जनीं । धृति मी त्रिभुवनीं । क्षमा ते मी ॥ ७९ ॥ एवं नारींमाझारी । या सातही शक्ति मी अवधारीं । ऐसें संसारकेसरी | म्हणता जाहला ॥ २८० ॥ बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् । मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५ ॥ सम० - सामवेदीं बृहत्साम छंदीं गायत्रि नाम मी । मासांमध्ये मार्गशीर्ष ऋतूंमाज वसंत मी ॥ ३५ ॥ आय - सामांत बृहत्सामहि गायत्री मीच अवधियां छंदीं । मासांत मार्गशीर्षहि कौंतेया मी वसंत ऋतुदीं ॥ ३५ ॥ ओवी - बृहत्साम सामवेदांत । आणि छंद तो गायत्रींत । मार्गशीर्ष मी मासांत । ऋतूंमध्ये वसंत मी ॥ ३५ ॥ वेदराशीचिया सामा- | आंत बृहत्साम जें प्रियोत्तमा । तें मी म्हणे रमा- | प्राणेश्वरु ॥ ८१ ॥ गायत्री छंद जें म्हणिजे । तें सकळां छंदामाजी माझें । स्वरूप हें जाणिजे । निभ्रांत तुवां ॥ ८२ ॥ मासांत मार्गशीरु । तो मी म्हणे शार्ङ्गधरु । ऋतूंमाजीं कुसुमाकरु | वसंतु तो मी ॥ ८३ ॥ घृतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् । जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥३६॥ वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः । मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥३७॥ सम० - द्यूत मी कपट्यांमाजीं तेजस्त्र्यांमाजिं तेज मी । जय निश्चय दोन्ही मी सववंतांत सत्व मी ॥ ३६ ॥ वृष्णिवंश वासुदेव पांडवांत धनंजय । मुनींमध्येहि मी व्यास कवींत कवि शुक्र मी ॥ ३७ ॥ मी सर्व भूतांना उत्पन्न करतों, त्यांचें मीच पालन करतों, आणि शेवटी मीच त्यांचा संहार करतो, तेव्हां मृत्यूही मीच आहें. ७४ आतां, स्त्रीसमूहांत माझ्या सात विभूति आहेत, त्या तुला सहज कौतुकाने सांगतों, ऐक. ७५ अर्जुना, जी कीर्ति कधीही विटत नाहीं ती मीच, आणि औदार्याची जिला साथ लाभली आहे, ती संपत्तीही मीच. ७६ आणि न्यायाचा आधार सुखानें घेऊन जी विवेकाच्याच रस्त्यानें नेहमीं जाते, ती वाणीही मीच. ७७ दृष्टीस पडणाऱ्या वस्तूबरोबर जी आठवण करून देते, ती स्मृतीही मीच. ७८ त्याप्रमाणेच आत्महित साधणारी बुद्धि, धैर्याची वृत्ति, आणि सर्वत्र आढळणारी क्षमा, या सर्व माझ्याच प्रधान विभूति आहेत. ७९ अशा प्रकारें, स्त्रीसमुहांत या सात शक्ति म्हणजे मीच. " असं संसाररूपी हत्तीचा नाश करणारे सिंह जे श्रीकृष्ण, ते अर्जुनाला म्हणाले. २८० नंतर लक्ष्मीपति श्रीकृष्ण आणखी म्हणाले, “वेदत्रयींतील सामवेदांत जें बृहत्साम, तेंही, हे सख्या अर्जुना, मीच आहे. ८१ सर्व छंदांत गायत्रीनामक छंद मीच आहे; याबद्दल तुला तिळमात्र शंका नको. ८२ बारा मासांत मार्गशीर्ष आणि सहा ऋतूंत वसंत, हे मीच आहे. ८३ ४३