पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी एन्हवी वेगळालिया विभूति । कायिएक परिससी किती । म्हणोनि एकिहेळां महामति । सर्व मी जाण ।। ६३ ।। मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्यांती किरीटी । ओतप्रोत पटीं । तंतु जेवीं ॥ ६४ ॥ ऐसिया व्यापका मातें जाणावें । तैं विभूतिभेदें काय करावें । परि हे तुझी योग्यता नव्हे । म्हणोनि असो ॥ ६५ ॥ कां जे तुवां पुसिलियानिति । म्हणोनि तिया आईक सुभद्रापती । तरी विद्यांमाजी प्रस्तुतीं । अन्यात्मविद्या ते मी ॥ ६६ ॥ अगा बोलतयांचिया ठायीं । वातो मी जो सकलशास्त्रसंमतें कहीं । सरेचिना ॥ ६७ ॥ जो निर्वचूं जातां वाढे एकतया उत्प्रेक्षे सछु चढे । जयावरी बोलतयांची गोडें । वोलणीं होती ॥ ६८ ।। ऐसा प्रतिपादनामाजी वादु । तो मी म्हणे गोविंदु | अक्षरांमाजी विशदु । अकारु तो मी ॥ ६९ ॥ पैं गा समासांमाझारीं । द्वंद्र तो मी अवधारीं । मशकालागोनि ब्रह्मावेरी । ग्रासिता तो मी ॥ २७० ॥ मेरुमंदरादिकीं सवीं । सहित पृथ्वीतें विरवी । जो एकार्णवातेंही जिरवी । जेथींचा तेथ ॥ ७१ ॥ जो प्रळयतेज देत मिठी । सगळिया पवनातें गिळी किरीटी । आकाश जयाचिया पोटीं । सामावलें ॥ ७२ ॥ ऐसा अपार जो काळु । तो मी म्हणे लक्ष्मीली । मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ॥ ७३ ॥ सम - मृत्यु मृत्युः सर्वहरचाहमुद्भवश्च भविष्यताम् । कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ३४ सर्व जो नाशी जन्मती त्यांत जन्म मी । नारींत कीर्ति श्री वाणी स्मृति प्रज्ञा धृति क्षमा ॥३४॥ हर्ता जम्मति जे यांत जन्म मी पाहें । नारींत स्मृति धृति मति वाणी कीर्ति क्षमा दया पाहे ॥३४॥ " मरण । जन्मकाळींचें जनन । कीर्ति, श्री, वाणी नारींत जाण । स्मृति, प्रज्ञा, धृति, क्षमा मी ३४ आर्या - मी मृ ओवी - सर्वहरु अशी इ संल, तर माझें निर्दोष व्यापक स्वरूपच जाणलें पाहिजे. ६२ नाहींतर, माझ्या वेगवेगळ्या विभूति किती म्हणून सांगाव्या ? म्हणून, मीच सर्व कांहीं आहे, असें एकदमच समज. ६३ ज्याप्रमाणें वस्त्रामध्यें आदिमध्यांती - म्हणजे उत्पत्ति, स्थिति, व नाश, अशा तीन्ही अवस्थांत - तंतूच असतो, तसा या सृष्टीमध्यें तीन्ही अवस्थांत मीच ओतप्रोत भरलेला आहे. ६४ असें माझें व्यापकपण जर कळलें, तर मग या एकेक विभूतीचें काय प्रयोजन आहे ? परंतु हे व्यापकपण जाणण्यापुरतं तुझं सामर्थ्य नाहीं, म्हणून हे विवेचन इतकेच पुरे. ६५ पण तूं ज्याअथीं माझ्या विभूतीसंबंधं प्रश्न केला आहेस, त्याअर्थी त्याच सांगतों, ऐक. सर्व विद्यांमध्ये प्रस्तुत प्रकरणींची अध्यात्मविद्या ही माझी प्रधान विभूति आहे. ६६ अरे, बोलणारांमध्ये, जो बाद सर्व शास्त्रांची एकवाक्यता होऊन कधीही संपत नाहीं, तो वाद मी आहे; जो वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असतां अधिकच जोरांत येतो, ऐकणारांच्या मनांत, ज्याच्या मुळें, उत्प्रेक्षेनें ईर्ष्या वाढते, आणि वक्त्यांच्या भाषणांस माधुर्य येतें. तो बाद माझी विभूति आहे. अक्षरांमध्ये पहिला जो ' अ ' - कार तो मी आहे. ६७,६९ समासांमधला द्वंद्वसमास मी. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना गिळणारा काळ मी. २७० मेरुमंदरादि पर्वतांसह सगळ्या पृथ्वीला जो पचवून टाकतो, प्रलयकालीं विश्वाला जलमय करणाऱ्या अमर्याद सागरालाही जो जेथल्या तेथेच जिरवून टाकतो, आकाश ज्याच्या उदरांत सांठवते, ७२ असा जो अनंत काळ, तो मी. तसाच पुन्हां सृष्टि उत्पन्न करणाराही मीच. ७३