पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३३५ ॥ ५३ ॥ जेणें देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धार केला । सूर्यवंशी उला । सूर्य जो कां ॥ ५४ ॥ तो हातियेरुपरजितयाआंतु । रामचंद्र मी सीताकांतु । मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजीं ॥ ५५ ॥ पैं समस्तांही वोघां । मध्यें जे भगीरथे आणितां गंगा । जन्हनें गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली ॥ ५६ ॥ ते त्रिभुवनैकसरिता । नान्हवी मी पांडुसुता । जळप्रवाहां समस्तां । माझारीं जायें ॥ २५७ ॥ ऐसेने वेगळालां सृष्टीपैकीं । विभूती नाम सूतां एकेकी । सगळेन जनमसहस्रे अवलीं । अर्ध्या नव्हती ५८ ि सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन । अध्यात्मविद्या दः प्रवदतामहम् ॥ ३२ ॥ अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च । अहमेवाक्षय. कालो धाताहं विश्वतोमुखः ॥३३॥ सम० - आद्यंततत्व सृष्टीचा तेव्हां मध्यहि मीच कीं । अध्यात्मविद्या विद्यांत तस्ववाक्यांत तत्व मी ॥ ३२ ॥ अकार मी अक्षरांत समासीं द्वंद्वनाम मी । मी स्वयें नित्य जो काळ मी सर्वाधार सर्व मी ॥ ३३ ॥ आर्या-वादांत तत्ववादहि परि मी आद्यंतमध्य सृष्टींत । विद्येत आत्मविद्या बरवें हें जाण आत्मसृष्टींत ॥ ३२ ॥ मी अक्षरी अकार द्वंद्व समासांत हें विदित सुज्ञां । मी अक्षय काळ असें धाता मी सर्व सन्मुख प्रज्ञा ॥ ३३॥ ओव्या-सृष्टीचें आदि अंत मध्यस्थान । विद्यांत अध्यात्मविद्या जाण । वादांतं तवकथन । सर्व जाण मीच असें ३२॥॥॥ अक्षरांमाजी अकार देख । समासीं द्वंद्वसमासक । मी अक्षयी काळ देख । ब्रह्माविष्णु मीच असें ॥ ३३ ॥ जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जैं जीवीं । तैं गगनाची बांधावी । लोथे जेवीं ॥ ५९ ॥ कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलुचि काखे सुवावा । तैसा विस्तारु माझा पा । तरि जाणावें मातें ॥ २६० ॥ जैसें शाखांसी फूल फळ । एकिहेळां बेटा तरी उपडूनियां मूळ | जेविं हातीं घे ॥ ६१ ॥ तेवीं माझे जरी जाणों पाहिजेती अशेष । तरी स्वरूप एक निर्दोष । जाणिजे (सकर "विशेष | ६२ ॥ जयजयकाराचा घोष करणाऱ्या भूतांच्या हातांवर बळी म्हणून टाकली, ५३ त्या रामानं देवांचा मान राखला व धर्माचा जीर्णोद्धार केला, खरोखरच तो सूर्यवंशाचा सूर्यच झाला. ५४ तेव्हां सर्व शस्त्रधरांमध्ये तो सीतापति राम मी होय. ज्यांना पुच्छ आहे अशा जळचर प्राण्यांत मी मकर आहे. ५५ भगीरथ राजा पृथ्वीतलावर आणीत असतां ज्या गंगेला जन्तु राजानें गिळलें व जी त्या जन्हूनें आपली मांडी विदारून पुन्हां मोकळी सोडली, ती तीन्ही भुवनांत वाहणारी नदी जाह्नवी सर्व जलप्रवाहांत माझी प्रधान विभूति आहे. ५६, ५७ पण अर्जुना, अशा प्रकारें सर्व सृष्टीतील एकेक विभूति नांव घेऊन सांगूं लागल्यास, शेंकडों जन्मही अर्ध्या विभूति सांगण्यास पुरणार नाहींत. ५८ सर्व नक्षत्रे एकत्र गोळा करण्याची इच्छा झाली असतां जशी आकाशाची मोट बांधली पाहिजे; ५९ किंवा पृथ्वीवरील अणुरेणूंची मोजदाद करण्याची उकळी आली, तर सर्वच पृथ्वी खाकोटीस मारावी लागेल; त्याप्रमाणेंच जर माझ्या सर्व विभूति पाहणें असेल, तर प्रत्यक्ष माझंच ज्ञान झाले पाहिजे. २६० शाखांसकट फुलें फळें एकदम सारी कंवटाळावी अशी हौस असेल, तर वृक्षच उपटून हातीं ध्यावा लागेल, ६१ तद्वत् जर माझ्या झाडून साऱ्या विभूति समजाव्या १ मोट. २ मोजदाद, हिशोब, ३ घालावा. ४ फांयांसकट. ५ एकदम.