पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३४ सार्थ ज्ञानेश्वरी होती । भोगनियम जे ॥ ४५ ॥ तयां नियमितयांमाजि यमु । जो कर्मसाक्षी धर्मु । तो मी म्हणे आत्मारामु । रमापति ।। ४६ ।। प्रह्रादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् । मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३० ॥ सम-प्रहाद दैत्यांत असे चाळणारांत काळ मी । श्वापदांमाजिं मी सिंह पक्ष्यांत विनतासुत ॥ ३०॥ आर्या-पक्ष्यांमाजि गरुड मी असुरी प्रहाद मी सगुण बाळ । मी केसरी मृगांतहि आकळणारांत मी असे काळ ॥ ३० ॥ ओंवी - प्रहाद मी दैत्यांत । काळ मी महाकाळांत सिंह मी श्वापदांत पक्ष्यांत मी गरुड जाण ॥ ३० ॥ अगा दैत्यांचिया कुळीं । प्रादु तो मी न्याहाळीं । म्हणोनि दैत्यभावादिमेळीं । लिंपेचिना ॥ ४७ ॥ पैं कळितयांमाजीं महाकाळ । तो मी म्हणे गोपाळु । श्वापदांमाजीं शार्दछु । तो मी जाण ॥ ४८ ॥ पक्षिजातीमाझारीं । गरुड तो मी अवधारीं । यालागीं जो पाठीवरी । वाहों शके मातें ॥ ४९॥ पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् । झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ॥ ३१ ॥ सम-उडती त्यांत मी वायू शस्त्रधत्यांत राम मी । मत्स्यांमधे मकर मी जान्हवी मी नद्यांमधे ॥ ३१ ॥ आर्या-मी धांवत्यांत पवनहि मत्स्यांमाजीं असें महा मकर । सरितांत जान्हवी मी शस्त्रधरांमाजि राम सौख्यकर ॥३१॥ ओवी - चाळकांमाजी पवन। शस्त्रधरांत मी दशरथनंदन । झषांमाज मगर होऊन । सरितांमाजी जान्हवी ॥ ३१ ॥ पृथ्वीचिया पैसारा । माजीं घडी न लगतां धनुर्धरा । एकेचि उड्डाणें सातांहि सागरां । प्रदक्षिणा कीजे ॥ २५० ॥ तयां वहिलियां गतिमंतां । आंत पवनु तो मी पांडुसुता । शस्त्रधरां समस्तां । माजीं श्रीराम तो मी ॥ ५१ ॥ जेणें सांकडलिया धर्माचे कैवारें । आपणपयां धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मये एक मोहरें । केलें तीं ॥ ५२ ॥ पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं । प्रतापलंकेश्वराचां सिसळीं । गगनीं उदो म्हणतया हस्तेवळी । दिधली भूतां टिपून ठेवून व सर्वाच्या अंतःकरणाचा झाडा घेऊन, त्यांना कर्मानुसार फळ भोगण्यास लावणारे जे नियंते ( नियमनाधिकारी ) आहेत; त्या सर्वाचें कर्म निरंतर पाहणारा जो यम, तो माझी प्रधान विभूति आहे. ४६ दैत्यांमध्ये प्रहाद हा माझी प्रधान विभूति होता, म्हणून तर त्याला दैत्यपणाची बाधा झाली नाहीं, ४७ ग्रासून नाश करणाऱ्यांत महाकाळ, व वनपशूंत सिंह मी आहें. ४८ पक्षिवर्गात गरुड माझी प्रधान विभूति आहे, म्हणून तर तो मला पाठीवर घेऊन वाहू शकतो. ४९ अर्जुना, पृथ्वीच्या या अफाट पसाऱ्यांत एक घटकाही न लागतां, जे एकाच उडीसरसे साती समुद्रांना प्रदक्षिणा घालूं शकतात, २५० त्या सर्व वेगवंतांत पवन तो मी. अर्जुना, सर्व शस्त्रधरांत श्रीराम मी आहें, ५१ कां कीं त्या श्रीरामानें संकटांत पडलेल्या धर्माच्या कैवारासाठी केवळ एक धनुष्य आपल्या बरोबर साह्यास घेऊन त्रेतायुगांत विजयलक्ष्मीला आपल्या एकट्यालाच वरूं लाविलें. ५२ नंतर लंकेजवळच्या सुवेळपर्वतावर उभे राहून त्या रामानें लंकाधिपति रावणाची मस्तकपंक्ति आकाशांत १ आपल्याला. २ सोबती. ३ एकच वाट ४ मस्तकें. ५ हातावर ठेवलेला बळी,