पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३३३ कल्पद्रुम हन पारिजातु । गुणें चंदनुही वाड विख्यातु । तरि यया वृक्षजातांआंतु । अश्वत्थु तो मी ।। ३५ ।। देवऋपींआंतु पांडवा । नादु तो मी जाणावा । चित्ररथु मी गंधव । सकळिकांमाजीं ॥ ३६ ॥ ययां अशेपांही सिद्धां । माजि कपिलाचार्य मी प्रबुद्धा | तुरंगजातां प्रसिद्धां । आंत उच्चैःश्रवा मी ॥ ३७ ॥ राजभूषण गजांआंतु । अर्जुना मी गा ऐरावतु | पयोराशि सुरमथितु । अमृतांशु तो मी ॥ ३८ ॥ ययां नरांमाजी राजा । तो विभूतिविशेष माझा । जयातें सकळ लोक प्रजा । होऊनि सेविती ॥ ३९ ॥ आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् । प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८ ॥ अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् । पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ २९ ॥ सम० - आयुधांमाजिं मी वज्र गोधनीं कामधेनु मी । संतानहेतु मी काम मी सर्पांमाजिं वासुकी ॥ २८ ॥ जलजंतूंत वरुण नागजातींत शेष मी । यम निग्रहकत्यांत अर्थमा पितरांत मी ॥ २९ ॥ आर्या - मी आयुधांत वज्रहि मी संतानांत योगि कंदर्प । धेनूंत कामधेनू मी सपांमाजिं वासुकी सर्प ॥ २८ ॥ पितरांत अर्यमा मी शिक्षाकरयांत जाण मीच यम । मी जलचरांत वरुणहि अनंत नामांत मीच हा नेम ॥ २९॥ ओव्या - शस्त्रांत मी वज्र । धेनूंमध्ये कामधेनु परिकर । संतानहेतु काम निर्धार । सर्पांत मी वासुकी ॥ २८ ॥ नागांमाजी अनंत । वरुण मी जलचरांत । अर्थमा पितृगणांत । संयमांत यम मी ॥ २९ ॥ पैं आघवेयां हातियेरां- | आंत वज्र तें मी धनुर्धरा । जें शतमखो- तीर्ण करा । आरूढोनि असे ॥ २४० ॥ धेनूंमध्यें कामधेनु । ते मी म्हणे विष्वक्सेनु । जन्मवितयाआंत मदनु । तो मी जाणें ॥ ४१ ॥ सर्पकुळात अधिष्ठाता । वासुकी गा मी कुंतीसुता । नागांमाजि समस्तां । अनंतु तो मी ॥ ४२ ॥ अगा यादसांआंतु । जो पश्चिम प्रमदेचा कांतु । तो वरुण मी हें अनंतु । सांगत असे ॥ ४३ ॥ आणि पितृगणां समस्तां । माजी अर्यमा जो पितृदेवता । तो मी हैं तत्त्वता । बोलत आहें ॥ ४४ ॥ जगाचीं शुभाशुभं लिहिती | प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती । मग केलियानुरूप श्रीकृष्ण पुढे सांगतात, “पारिजात तर प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे, चंदनाचे गुणही फार प्रसिद्ध आहेत. तरी पण वृक्षकोटींत माझी प्रधान विभूति पिंपळ आहे. ३५ अर्जुना, देवपींमध्यें नारद आणि सर्व गंधर्वामध्ये चित्ररथ, हे मी आहें. ३६ ज्ञात्या अर्जुना, सर्व सिद्ध योग्यांत कपिलाचार्य मी, आणि सर्व अश्वजातींत उच्चैःश्रवा मी. ३७ अर्जुना, राजेलोकांना भूषणासारखे वाटणारे जे हत्ती त्यांमध्यें मी ऐरावत आहे. देवांनी समुद्रमंथन केलें असतां जो अमृतरस लाभला, तो मी. ३८ ज्याची आज्ञा सर्व प्रजाजन शिरसा वंद्य मानतात, तो राजा सर्व जनतेंत माझी प्रधान विभूति समजावा. ३९ शंभर यज्ञ पार पाडणाऱ्या इंद्राच्या हातांत विलसणारे वज्र हें सर्व हत्यारांत माझी प्रधान विभूति आहे. " २४० श्रीकृष्ण म्हणाले, “ गाईमध्ये कामधेनु आणि उत्पादकांत मदन, या माझ्या प्रधान विभूति आहेत. ४१ अर्जुना, सर्पकुळांत सर्पाधिपति वासुकी आणि नागगणांत 'अनंत' नांवाचा नाग, मी आहें. ४२ पश्चिम दिशेचा अधिपति जो वरुण तो सर्व जलचरांत मी आहें. ४३ समस्त पितृगणामध्ये अर्थमा नांवाची पितृदेवता प्रधान विभूति आहे. ४४ जगाचीं शुभाशुभ कर्मों