पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् । सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ २४ ॥ महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् । यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५ ॥ सम० - पुरोहितांस जो मुख्य तो मी जाण बृहस्पति । सेनापतींत मी स्कंद मी समुद्र सरोवरीं ॥ २४ ॥ महर्षी भृगू वेद वाणत प्रणवाक्षर । जपयज्ञ मि यज्ञांत अचलांत हिमाचल ॥ २५ ॥ आर्या - मीच उपाध्यायांतहि बृहस्पती मुख्य ज्यास इंद्र नमी । सागर सरोवरीं मी सेनापाळांत तो षडानन मी ॥ २४ ॥ प्रणवाक्षर वार्णित मी जाण भृगू मी महर्षिसुज्ञांत मी स्थावरीं हिमालय मी जपयज्ञ प्रशस्त यज्ञांत ॥ २५ ॥ ऑव्या - पुरोहितांत बृहस्पती । सेनापतींत स्वामी कार्तिक म्हणती । सरितांत सागरपति । सर्व मीच जाण ॥ २४ ॥ ऋषमाजी भृगु ऋषीश्वर । वाचांमाजी एकाक्षर । यज्ञांत जपयज्ञेश्वर । स्थावरीं मी हिमालय || २५ || जो स्वर्गसिंहासना सौवावो । सर्वज्ञते आदीचा ठावो । तो पुरोहितांमाजीं रावो । बृहस्पति मी ॥ २८ ॥ त्रिभुवनींचिया सेनापती - | आंत स्कंदु तो मी महामति । जो हरवीर्ये अग्निसंगतीं | कृत्तिकाआंतु जाहला ॥ २९ ॥ सकळिकां सरोवरांसी । माजीं समुद्र तो मी जळराशी । महर्षींआंतु तपोराशी । भृगु तो मी || २३० ॥ अशेषांही वाचा - | माजीं नटनाच सत्याचा । तें अक्षर एक मी वैकुंठींचा । वेल्हाळु म्हणे ॥ ३१ ॥ समस्तांही यज्ञांच्यापैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं । जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे ॥ ३२ ॥ नामजपयज्ञ तो परम । वाधूं न शके स्नानादि कर्म । नामें पावन धर्माधर्म | नाम परब्रह्म वेदार्थे || ३३ || स्थावरां गिरींआंतु । पुण्यपुंज जो हिमवंतु । तो मी म्हणे कांतु । लक्ष्मियेचा ॥ ३४ ॥ अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः । गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः॥ २६॥ उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् । ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ २७ ॥ सम॰—अश्वत्थ सर्व वृक्षांत देवषमाजिं नारद । गंधवीं मी चित्ररथ सिद्ध कपिल जो मुनी ॥ २६ ॥ अश्वांत उच्चैःश्रवा मी जो झाला क्षीरसागरीं। ऐरावत गजेंद्रांत नरांत नरराज मी ॥ २७ ॥ आर्या- वृक्ष अश्वत्थहि मी देवर्षीमाजि जाण नारद मी । गंधवि चित्ररथ मी सिद्ध कपिल रत सदा शमदमीं मी ॥२६॥ ऐरावत द्वीपांतहि जाण नरांमाजिं तो नराधिप मी । उच्चैःश्रव अश्वांतहि जाण रसांमाजिं तेंच अमृत मी ॥२७॥ ओष्या - वृक्षांत अश्वत्थ प्रसिद्ध । देवर्षीमाजी नारद । गंधवीं चित्ररथ । सिद्धांत कपिल महामुनि मी ॥ २६ ॥ अश्वांमाजी उच्चैःश्रवा वारू । गजांत ऐरावत कुंजरू । मनुष्यांत राजा नरू । मीच असें ॥ २७ ॥ सर्व पुरोहितांत, जो स्वर्गाधिपतीचा आधार व सर्व ज्ञानाचें मूलस्थान बृहस्पति, तो मीच, २८ या त्रिभुवनांतील सेनापतींमध्ये, कृत्तिकांत शंकरापासून जन्मलेला जो महाज्ञाता कार्तिकस्वामी, तो मी. २९ सरोवरांमध्ये, जळाचा अपार सांठा असा सागर आणि महर्षींमध्यें महान तपस्वी असा भृगु, हेही मी होय. २३० अखिल वाङ्मयांत सत्याचें क्रीडास्थान असें जें एकाक्षर 'ॐ' तें मीं आहे. ३१ कर्मकांडाचा त्याग करून ॐकारादिकांनीं ज्याची सांगता होते तो जपयज्ञ सर्व यज्ञांत माझी प्रधान विभूति आहे. ३२ नामजपयज्ञ तर अत्यंत श्रेष्ठ आहे. याला स्नानादि नित्यकर्माचीही अपेक्षा नाहीं. धर्म व अधर्म हे दोन्ही नामघोषानें पावन होतात. वेदार्थानंच नाम हें परब्रह्म ठरतें. ३३ अढळ पर्वतांमध्ये मी पुण्यराशि हिमालय पर्वत आहे. " असें लक्ष्मीपति श्रीकृष्ण म्हणाले. ३४ १ मित्र, आधार.