पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीज्ञानेश्वरी एथ वस्तुसामर्थ्यशक्ती । नवल कायी ॥७८॥ जयातें कामधेनु ऐसी माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे । म्हणऊनि मी प्रवर्तों लाहें । ग्रंथीं इये ॥ ७९ ॥ तरी न्यून तें पुरतें | अधिक तें सरतें । करूनि घ्यावें हें तुमतें । विनवितु असें ॥ ८० ॥ आतां देइजे अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन । जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥ ८१ ॥ तैसा मी अनुगृहीतु । साधूंचा निरोपितुं । ते आपुलिया परी अलंकरितु । भैलतैसा ॥ ८२ ॥ तंव श्रीगुरु म्हणती राहीं । हें तुज बोलावें न लगे कांहीं । आतां ग्रंथा चित्त देईं । झडकरी गा ॥ ८३ ॥ या बोला निवृत्ति- दासु । पावोनि परम उल्हासु । म्हणे परियेसा मना अवकाशु | देऊनियां ॥ ८४ ॥ धृतराष्ट्र उवाच:- धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥ १ ॥ समश्लोकी - धर्मक्षेत्रों कुरुक्षेत्रीं मिळाले युद्धकामुक | माझे आणीक पांडूचे संजया वर्तले कसे ॥ १ ॥ आर्या - धर्मक्षेत्रीं कुरुच्या क्षेत्रीं मिळुनी करावया समर । माझे आणि पांडूचे करिती तें सांग संजया कुमर ॥ १ ॥ ओवी - धृतराष्ट्र म्हणे 'संजया ! | धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राच्या ठायां । कौरव पांडव मिळोनियां । तेथे काय कारेताती ?११ तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु । म्हणे संजया मांगें मातु । कुरुक्षेत्रींची ॥। ८५ ॥ जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । जुंझाचेनि ॥ ८३ ॥ तरी तेंहीं येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं । तें झडकरी कथन करीं । मजप्रती ॥ ८४ ॥ तेव्हां एका एका वस्तूचे ठायीं असें विशिष्ट सामर्थ्य असतें, म्हणून तदनुसार परिणाम घडून आला असतां, आश्चर्य करण्याचे कारण नाहीं. ७८ कामधेनूप्रमाणे ज्याची आई आहे, त्याला कसली वाण पडणार? म्हणून मी हा ग्रंथ रचण्यास सिद्ध झाली आहे. ७९ तेव्हां, “यांत कांहीं उणें असल्यास तें पुरे करून व कांहीं अधिक असल्यास तें प्रसंगोचित करून घ्यावें, " अशी माझी तुम्हांस विनंति आहे. ८० तरी आतां इकडे लक्ष द्यावें, कारण, तुम्हीं मला बोलावयास लाविलें तरच मी बोलणार आहे. ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुलीचे चलनवलन तीस हालविणाऱ्या सूत्रावर अवलंबून असतें. ८१ त्याप्रमाणेच मी साधुसंतांचा अनुगृहीत- त्यांच्या कृपेचा आश्रित आहें. मी सर्वस्वी त्यांनाच वाहिलेला असल्यामुळे त्यांनी आपल्यास रुबेल त्याप्रमाणे मला अलंकारमंडित करावे. ८२ इतक्यांत श्रीगुरु म्हणाले, "पुरे, हें सांगण्याची तुला कोणतीच आवश्यकता नाहीं. आतां त्वरा करून तूं आपलें चित्त ग्रंथाकडे वळीव . " ८३ ह्या गुरुवचनाने निवृत्तिदास ज्ञानदेवास फार उल्हास झाला व तो म्हणाला, आतां स्वस्थ चित्ताने सावकाशपणे श्रवण करावे. " ८४ " पुत्रप्रेमानं मोह पावलेला धृतराष्ट्र विचारता झाला, " हे संजया, कुरुक्षेत्राची वार्ता मला सांग. ८५ ज्या क्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचं स्थान असें म्हणतात, तेथें पांडव व माझे मुलगे युद्धाच्या निमित्ताने गेले आहेत. ८६ तर त्यांनी आपआपसांत एवढ्या काळांत काय केलें तें मला लवकर सांग. ८७" १ मान्य, प्राप. २ कळसूत्री लांकडी बाहुली. ३ स्वाधीन केलेला, ४ वाढेल तसा.