पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३३१ जीवचि करूनि श्रवण । आइकोनि आइक ॥ १९ ॥ याहीवरतिया विभूति । सांगणें ठेलें सुभद्रापती । सांगेन म्हणितलें तुजप्रती । त्या प्रधाना आइकें २२० आदित्यानामहं विष्णुज्योतिषां रविरंशुमान् । मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ २१ ॥ सम० - विष्णू अदितिपुत्रांत दृश्यज्योतींत सूर्य मी । मरीचि नाम महर्ती नक्षत्रांमाजिं चंद्र मी ॥ २१ ॥ आर्या - अदितिसुतीं मी विष्णू पार्था ज्योतिर्गणांत मीच रवी । मरुतांमाजिं मरीची भगणांमार्जी शशी तनू बरवी २१॥॥ ओवी - अदितिपुत्रांत मी विष्णु । तेजांत मी अर्से भानु । मरुद्रणांमाजी मरीचि होऊनु । नक्षत्रांत शशी मी ॥२१॥ हें बोलोनि तो कृपावंतु । म्हणे विष्णु आदित्यांआंतु । रवी मी रश्मिवंतु | सुप्रभांमाजी || २१ || मरुद्गुणांच्या वर्गी | मरीचि म्हणे मी शार्ङ्ग । चंदु मी गगनरंगीं । तारांमाजी ॥ २२ ॥ वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः । इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ १२ ॥ सम० - सवां वेदीं सामवेद इंद्र देवांत मी असें । इंद्रियांमाजिं मन मी भूतांमाजिं प्रतीति मी ॥ २२ ॥ आर्या - इंद्रियांमार्जी मन मी पार्था वेदांत जाण सामातें । भूतांत चेतना मी सुरांत मी इंद्र जाण या मातें ॥२२॥ ओवी - वेदांमध्ये सामवेद । देवांत इंद्र मी प्रसिद्ध । इंद्रियांत मनसंबंध । जीवांचे चैतन्य मी ॥ २२ ॥ वेदांआंत सामवेदु । तो मी म्हणे गोविंदु | देवांमाजी मरुबंधु | महेंद्र. तो मी || २३ || इंद्रियांमाजी अकरावें । मन तैं मी हें जाणावें । भूतांमाजी स्वभावें । चेतना ते मी ॥ २४ ॥ रुद्राणां शंकरचास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् । वसूनां पावकञ्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ १३ ॥ सम० - रुद्रांत शंकर असें यक्षादिकिं कुबेर मी । वसूंमध्यें पावक मी शिखराद्रीत मेरु मी ॥ २३ ॥ आर्या - पावक वसूंमधे मी राक्षस यक्षांत मीच वैश्रवण । मी पर्वतांत मेरू शंकर रुद्रांत मी करीं श्रवण ॥ २३ ॥ ओंवी — रुद्रांमध्ये मी शंकर । यक्षांमाजी धनेश्वर । वसूंमध्ये वैश्वानर । पर्वतांत मेरु मीच ॥ २३ ॥ अशेषांही रुद्रांमाझारीं । शंकर जो मदनारी । तो मी येथ न धरीं । भ्रांति कांहीं ॥ २५ ॥ यक्षरक्षोगणांआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु । तो कुवेरु मी हें अनंतु | म्हणता जाहला || २६ || मग आठांही वसुंमाझारी । पावकु तो मी अवधारीं । शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ॥ २७ ॥ श्रवणेंद्रियांत एकवटून, ऐक. १९ आतां तुला विभूति कथन करावयाच्या आहेत, आणि, अर्जुना, ज्या विभूति सांगण्याचे मी तुला वचन दिलें आहे, त्या मुख्यमुख्य विभूति श्रवण कर. २२० असें बोलून, ते कृपाळू श्रीकृष्ण नंतर म्हणाले, “ बारा आदित्यांत विष्णु ही माझी प्रधान विभूति आहे. प्रकाशवंतांत मी सूर्य आहें, २१ एकूणपन्नास मरुद्गणांत मी नारायणच मरीचि आणि तारागणांत मी चंद्र आहे. २२ मी वेदांत सामवेद, देवांत मरुद्वंधु इंद्र, इंद्रियांत अकरावें जें मन तें, आणि भूतमात्रांत जी स्वाभाविक चेतनाशक्ति तीही सर्व मी आहें. २३, २४ चौदा रुद्रांत मदनशत्रु शंकर, यक्षराक्षसांत शंभूचा मित्र कुबेर, आठ वसूंत अग्नि, आणि सर्व पर्वतांत अत्यंत उंच असा मेरु, हे सर्व मी आहे. २५, २६, २७