पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३० सार्थ श्रीज्ञानेश्वरी माझिया विभूति । असंख्य मज ॥ २९० ॥ एन्हवीं तरी मी कैसा केवढा । म्हणोनि आपणपयांही नव्हेचि फुडा । यालागी प्रधाना जिया रूढा । तिया आइ ॥ ११ ॥ जिया जाणितलियासाठीं । आघविया जाणवतील किरीटी । जैसें बीज आलिया मुठीं । तरूचि आला होय ॥ १२ ॥ कां उद्यान हाता चढिन्नलें । तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें । तेवं देखिलिया जिया देखवलें । विश्व सकळ || १३ || एन्हवीं साचचि गा धनुर्धरा । नाहीं शेवटु माझिया विस्तारा । पैं गगना ऐशिया अपारा । मजमाजी लपणें ॥ १४ ॥ अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः । अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २० ॥ सम - विभूती मुख्य मी आत्मा सर्वांच्या आशयीं स्फुरें । जडाचा आदिमध्यांत घटाला मृत्तिका जसी ॥ २० ॥ आर्या - सकळां भूतांच्या मी हृदयीं आत्मा असें गुडाकेशा । मी आदि-मध्य-अंतहि भूतांचा जाण मज हृषीकेशा ॥२०॥ भवी - पार्था ! गा ! अवधारीं । मी आत्मा सर्व भूतांचे शरीरीं । मी आदि मध्य निर्धारीं । मीच अंत सर्व भूतांचा २० आईकें कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंवका । मी आत्मा असे एकैका । भूतमात्राच्या ठायीं ॥ १५ ॥ आंतुलीकडे मीचि यांचे अंतःकरणीं । भूतांबाहेरी माझीच गवसणी | आदि मी निर्वाणीं । मध्यही मीचि ॥ १६ ॥ जैसें मेघां या तळी वरी । एक आकाशचि आतबाहेरी । आणि आकाशींचि जाले अवधारी । असणेंही आकाशीं ॥ १७ ॥ पाठीं लया जे वेळीं जाती । ते वेळी आकाशचि होऊनि ठाती । तेविं आदि स्थिति गति । भूतांसि मी ॥ १८ ॥ ऐसें बहुवस आणि व्यापकपण । माझें विभूतियोगें जाण । तरी नाहीं, तशा माझ्या विभूतीही मला गणवत नाहींत. २१० तेव्हां मी स्वतः किती मोठा व व्यापक याच मला स्वतःलाच स्पष्ट ज्ञान होत नाहीं, या कारणास्तव मी आपल्या मुख्य मुख्य प्रसिद्ध विभूति सांगतों, तेवढ्या ऐक. ११ ह्या प्रसिद्ध विभूति जाणल्या म्हणजे, अर्जुना, त्यांच्या द्वारें इतर गौण विभूतींचंही ज्ञान होऊं शकेल. अरे, जसें बीज हातांत आलें म्हणजे झाडच आपले हातीं आल्यासारखे होते; १२ किंवा सर्व बाग आपल्या कबजांत आली, कीं फळें फुलें आपोआपच लाभतात; त्याप्रमाणेच या विभूति पाहिल्या म्हणजे सर्व विश्वच आपण पाहू शकतों १३ नाहीं अर्जुना, माझा विस्तार, माझ्या अखिल विभूति, केवळ अपरंपार आहेत. अरे, हें गगन एवढे निःसीम आहे, पण तेही माझ्याठायीं कोठच्या कोठें गडप होऊन जाते. १४ तर, कुरळे केश मस्तकावर असणाऱ्या व धनुर्विद्यंत दुसरा शंकरच अशा अर्जुना, ऐक. मी प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणीं आत्मरूपामें वसतों. १५ भूतांच्या अंतर्यामीं मीच असतों, बाहेरही माझेंच आवरण आहे, त्यांचा आदि, मध्य, अंत, सर्व मीच आहें. १६ ज्याप्रमाणे मेघांना तळाला व शिखराला, आंत व बाहेर, सर्वत्र आकाशच आहे; ते आकाशरूपच असतात आणि त्यांना आधारही आकाशच आहे; १७ नंतर ते ज्या वेळीं विलयाला जातात, त्या वेळीं ते जसे आकाशरूपच होऊन राहातात; त्याप्रमाणे या भूतांनाही उत्पत्ति, स्थिति, व गति, मीच आहें. १८ अशा प्रकारें मी विभूतींच्या द्वारे नानाविध व व्यापक झालेलों आहे. म्हणून, आपल्या सर्व चैतन्यशक्तीला