पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३२९ असे ॥ २ ॥ तुवां स्वमुखें जें बोलिलें । हें आम्हीं नादासि रूप देखिलें । आजि चंदनतरूची फुलें | तुरंवीत आहों मां ॥ ३ ॥ तया पार्थाचिया वोला । सर्वांगें श्रीकृष्ण डोलला । म्हणे भक्तिज्ञानासि जाहला । आगरु हा ॥ ४ ॥ ऐसा पतिकराचिया तोपाआंतु । प्रेमाचा वेग उचंबळतु । तो सायासें सांवरूनि अनंतु । काय वोले ॥ ५ ॥ श्रीभगवानुवाच - हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः । प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९ ॥ सम० - हर्षे कृष्ण म्हणे दिव्या विभूती आपुल्या तुतं । सांगेन परि मुख्यत्वें अंत ज्या विस्तरा नसे ॥ १९ ॥ आर्या-त्या मुख्य आपुल्याही दिव्य विभूती दया अकूपार । मी संक्षेप कथितों विस्तारा माझिया नसे पार ॥ १९ ॥ ओवी - कृष्ण म्हणे अर्जुनाप्रती माझ्या दिव्य विभूती बहुत असती । त्यांमाजी सांगेन श्रेष्ठ तुजप्रती । येरां पाहतां अंत नसे ॥ १९ ॥ मी पितामहाचा पिता । हें आठवितांही नाठवे चित्ता । कीं म्हणतसे वा पांडुसुता । भलें केलें || ६ || अर्जुनातें वा म्हणे एथ कांहीं । आम्हां विस्मो करावया कारण नाहीं । आंगें तो लेकरू काई | नव्हेच नंदाचें ॥ ७ ॥ परि प्रस्तुत ऐसें असो । हें करवी आवडीचा अतिसो | मग म्हणे आइकें सांगतों । धनुर्धरा ॥ ८ ॥ तरि तुवां पुसिलया विभूति । तयांचें अपारपण सुभद्रापती । ज्या माझियाचि परि माझिये मती । आकळती ना || ९ || आंगींचिया रोमा किती । जयाचिया तयासि न गणवती । तैसिया अग्नीला कधीं 'हा ओंवळा झाला, म्हणून म्हणतां येईल का ? किंवा निरंतर वाहणाऱ्या गंगा- जळाच्या अंगीं पारोसेपणाचा दोष लावतां येईल काय ? २ तुम्हीं आपल्या मुखानें परमामृतवचनाचा आम्हांला लाभ करून दिलात, तेव्हां असें वाटलें कीं, शब्दब्रह्म आज प्रत्यक्ष मूर्तिमंतच अवतरलें, किंवा चंदनवृक्षाला फुलें येऊन त्यांचा सुवास आम्ही उपभोगीत आहों !" ३ हें अर्जुनाचें भाषण ऐकून श्रीकृष्णांचं सर्व अंग समाधानप्रेमानें डोलूं लागलें. ते मनांत म्हणूं लागले, " हा अर्जुन म्हणजे भक्तिज्ञान पिकविण्याचा मळाच झाला आहे ! " ४ अशा प्रकारें, ज्याचा पत्कर श्रीकृष्णांनी घेतला होता, त्या अर्जुनाच्या परम संतोषामुळे श्रीकृष्णांना प्रेमाचा उभंडा आला, पण तो मोठ्या प्रयत्नाने आवरून ते काय म्हणाले, तें ऐका. ५ 96 , " आपण स्वतः ब्रह्मदेवाचे जनक आहों, या गोष्टीची जणूं काय आपल्यास स्मृतीच नाहीं, अशा भावानं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, "बा अर्जुना, तूं फारच उत्तम बोललास. ६ या प्रसंगीं श्रीकृष्णांनी अर्जुनाला 'बा, बापा, ' म्हटले याबद्दल आम्हांला आश्चर्य वाटण्याचं कारणच नाहीं, कारण ते स्वतः नंद गवळ्याचे पुत्र झाले होतेच कीं नाहीं ? ७ प्रस्तुत प्रसंगीं अशा प्रकारचे शब्द प्रेमाच्या अतिरेकानंच उमटले होते. असो. पुढे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, “हे धनुर्धरा, आतां तें श्रवण कर. ८ हे सुभद्रानाथा अर्जुना, तूं माझ्या विभूतींसंबंधं प्रश्न केलास खरा, परंतु या माझ्या विभूति अपार आहेत. त्या विभूति माझ्या खऱ्या, पण त्यांचंही माझ्या मतीला आकलन होऊं शकत नाहीं. ९ आपल्या अंगावर किती केंस आहेत, त्याची मोजदाद जशी ज्याची त्यालाही होत १ हुँगल, ४२